Lokmat Sakhi >Fitness > व्यायाम करायला वेळ नसेल तर फॉलो करा मसाबा गुप्ताचं क्वीक वर्कआऊट रुटीन

व्यायाम करायला वेळ नसेल तर फॉलो करा मसाबा गुप्ताचं क्वीक वर्कआऊट रुटीन

Fitness Tips by Masaba Gupta: व्यायाम करण्यासाठी जेव्हा खूप वेळ नसतो, तेव्हा मसाबा गुप्ता बघा कसं झटपट वर्कआऊट रुटीन फॉलो करते...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2022 05:51 PM2022-11-19T17:51:07+5:302022-11-19T17:52:06+5:30

Fitness Tips by Masaba Gupta: व्यायाम करण्यासाठी जेव्हा खूप वेळ नसतो, तेव्हा मसाबा गुप्ता बघा कसं झटपट वर्कआऊट रुटीन फॉलो करते...

If you don't have time for workout, then follow Masaba Gupta's quick workout session | व्यायाम करायला वेळ नसेल तर फॉलो करा मसाबा गुप्ताचं क्वीक वर्कआऊट रुटीन

व्यायाम करायला वेळ नसेल तर फॉलो करा मसाबा गुप्ताचं क्वीक वर्कआऊट रुटीन

Highlightsपोस्ट शेअर करत ती म्हणाली की घाई- गडबडीत असताना एवढा व्यायाम केला तरी तो तुम्हाला दिवसभर पुरेल एवढी उर्जा देणारा आणि ॲक्टीव्ह ठेवणारा असतो. 

फिटनेससाठी व्यायाम महत्त्वाचा आहे, हे माहिती असतं. पण तरीही व्यायामाचा अनेक जणांना कंटाळा येतो. त्यामुळे मग व्यायाम करणं कोणत्या ना कोणत्या प्रकारे पुढे ढकललं जातं. काही जण असे असतात, ज्यांना व्यायाम करायला खरोखरच  खूप वेळ नसतो. अशावेळी कोणी जर काही झटपट वर्कआऊट रुटीन (Masaba Gupta's quick workout session) सांगितलं तर ते अधिक बरं पडतं. अशा सगळ्या जणांसाठीच मसाबा गुप्ताने तिच्या वर्कआऊटविषयी (Fitness Tips by Masaba Gupta) शेअर केलेली पोस्ट उपयुक्त ठरणारी आहे. 

 

फॅशन डिझायनर तसेच ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता यांची लेक मसाबा गुप्ता तिच्या फिटनेसबाबत अतिशय जागरुक आहे. त्यामुळे व्यायाम, डाएट याविषयीच्या वेगवेगळ्या पोस्ट ती नेहमीच सोशल मिडियावर शेअर करत असते.

मासिक पाळीत खूप पोट दुखतं? मत्स्यासन करा, वाचा मत्स्यासन करण्याचे ५ जबरदस्त फायदे 

नुकतीच तिने अशीच एक पोस्ट सोशल मिडियावर शेअर केली आहे. यामध्ये तिला जेव्हा व्यायाम करायला वेळ नसतो, तेव्हा ती झटपट होईल असं कोणतं वर्कआऊट करते, याविषयी माहिती दिलेली आहे. पोस्ट शेअर करत ती म्हणाली की घाई- गडबडीत असताना एवढा व्यायाम केला तरी तो तुम्हाला दिवसभर पुरेल एवढी उर्जा देणारा आणि ॲक्टीव्ह ठेवणारा असतो. 

 

कसं असतं मसाबा गुप्ताचं झटपट वर्कआऊट सेशन?
१. या पोस्टमध्ये ती म्हणते की कितीही गडबडीत असलं तरी ती १० सुर्यनमस्कार करते. 

२. सुर्यनमस्कार झाल्यानंतर ती काही मिनिटांसाठी कपालभाती प्राणायाम करते. या प्राणायाममुळे कुंडलिनी जागृत होण्यासाठी फायदा होतो.

कोलेस्टरॉल नियंत्रित ठेवतात स्वयंपाक घरातील ५ पदार्थ, कसे आणि केव्हा खायचे? वाचा तज्ज्ञांचा सल्ला

३. त्यानंतर ती काही वेळासाठी अग्निसार क्रिया करते. ही क्रिया चयापचय क्रियेला गती देण्यासाठी आणि पचनक्रिया सुधारण्यासाठी उपयुक्त ठरते. 

४. हे सगळं झालं की त्यानंतर काही मिनिटांसाठी ती श्वासावर लक्ष केंद्रित करून मेडिटेशन करते. 

 

Web Title: If you don't have time for workout, then follow Masaba Gupta's quick workout session

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.