उन्हाळा म्हटलं की,शरीरातून घामाच्या धारा सुरु होतात.(Benefits of daily cold baths for health) सतत घामाचा वास येणे, खाज लागणे आणि उकडणे यामुळे आपल्या वैताग येतो. कधी एकदा थंड पाण्याने आंघोळ करतो असे अनेकांना वाटत असते. थंड पाण्याने आंघोळ केल्याने आपल्या फ्रेश वाटते तसेच आरोग्यावरही सकारात्मक परिणाम होतो. (How cold baths improve your lifestyle)
ऋतू कोणाताही असला तरी अनेकजण थंड पाण्याने आंघोळ करतात.(6 amazing benefits of cold showers every day) यामुळे त्यांचे शारीरिक मानसिक आरोग्य सुधारते. जर आपल्यालाही रोज थंड पाण्याने आंघोळ करावीशी वाटत असेल तर आधी आरोग्याच्या स्थितीचे नीट मूल्यांकन करा.(How cold baths boost immunity and energy) योग्य पद्धतीने आणि नियमितपणे थंड पाण्याने आंघोळ केल्यास आपल्या शरीरावर काही परिणाम होतो का हे तपासा. थंड पाण्याने आंघोळ केल्यास शरीराला कसा फायदा होतो जाणून घेऊया. (How to start a cold bath routine for health benefits)
रोजच्या 'या' ६ पदार्थांमुळे हाडं होतात ठिसूळ!वाढते कॅल्शियमची कमतरता, पाठ-कंबरेचं दुखणं कायमच...
1. रोगप्रतिकारशक्ती वाढते.
थंड पाण्याने आंघोळ केल्यास रक्ताभिसरण सुधारते. ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. हे शरीराला संसर्ग आणि इतर रोगांशी लढण्यास मदत करते.
2. ताण कमी करते
जर आपल्याला अधिक ताण येत असेल तर थंड पाण्याने आंघोळ करावी. यामुळे शरीरातील एंडोर्फिन आणि इतर चांगले वाटणारे हार्मोन्स सक्रिय होतात. ज्यामुळे तणाव आणि नैराश्याची लक्षणे कमी होतात.
'या' लोकांनी चुकूनही खाऊ नये पपई, उच्च रक्तदाबासह भरभर वाढेल साखरेची पातळी...
3. रक्ताभिसरण सुधारते.
थंड पाण्याने आंघोळ केल्यास आकुंचन पावलेल्या रक्तवाहिना सुरळीत होऊन रक्ताभिसरण सुधारते. हृदयाच्या आरोग्यासाठी थंड पाण्याने आंघोळ करणे फायदेशीर आहे.
4. त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर
गरम पाण्याने त्वचा किंवा केस धुवू नये. यासाठी नेहमी थंड पाण्याचा वापर करावा. थंड पाण्यामुळे त्वचा आणि केसांमधून नैसर्गिक तेल काढून टाकण्यास मदत करते. त्वचेला उजळवून केसांना चमकदार बनवते.
5. चयापचय वाढवते
थंड पाण्याने आंघोळ केल्यानंतर शरीराचे तापमान संतुलित करण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागते, ज्यामुळे चयापचय गतिमान होतो. असे केल्याने वजन कमी होण्यासही मदत होते.
6. स्नायू मजबूत होतात.
खेळाडू आणि शारीरिक व्यायाम करणाऱ्यांसाठी थंड पाण्याने आंघोळ करणे खूप फायदेशीर ठरते. हे स्नायूंचा थकवा कमी करते, तसेच शरीरात होणारी जळजळही दूर करते.
या लोकांनी थंड पाण्याने करु नका आंघोळ
- ज्या लोकांना सर्दी आणि ताप येत असेल त्या लोकांनी थंड पाण्याने आंघोळ करु नका.
- वृद्ध किंवा कमकुवत रोगप्रतिकारशक्ती असणाऱ्यांनी थंड पाण्याने आंघोळ करणे टाळावे.
- जर हृदयाशी संबंधित विकार असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय थंड पाण्याने आंघोळ करु नका.