वजन वाढवण्यापेक्षा वजन कमी करणे हा मोठा टास्क मानला जातो. वजन कमी करण्यासाठी फक्त वर्कआउट नाही, तर डाएट देखील तितकेच महत्वाचे आहे. वर्कआउट करून जर आपण जंक फूड खात असाल तर, वजन लवकर कमी होणार नाही. शरीरासाठी दोन्ही समान गोष्टी हव्या. वजन कमी करताना आपल्याला फळे जास्त खा असा सल्ला दिला जातो. सध्या सफरचंद ट्रेण्डींगमध्ये आहे. सफरचंद खाण्याचे अनेक फायदे आहेत. सफरचंदामध्ये कँलरी कमी असतात. यासह विटामिन सी, मिनिरल्सबरोबर फायबरची मात्रा जास्त प्रमाणात आढळते. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
पोषणतज्ञ शवॉन मॉरिसन यांच्या मते, “सफरचंद हे फायबरचा एक उत्तम स्रोत आहे, विशेषतः यातील पेक्टिन इतर प्रकारच्या कर्बोदकांच्या तुलनेत जास्त काळ पोट भरण्यास मदत करते. ज्यामुळे आपल्याला क्रेविंग्सचा सामना करावा लागत नाही, पोट भरलेले जाणवते. अशा स्थितीत शरीरात कॅलरीजचे प्रमाण कमी जाते. जे वजन कमी करण्यासाठी आवश्यक आहे.''
फॉलो करा ५ दिवस डाएट सफरचंद रूटिन
आठवड्याच्या पहिल्या दिवशी सफरचंदाचे सेवन, नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणात करा.
दुसऱ्या दिवशी नाश्ता आणि रात्रीच्या जेवणात सफरचंदापासून बनवलेल्या गोष्टी खा. तर दुपारच्या जेवणात इतर भाज्यांसोबत सफरचंद खा.
तिसर्या दिवसापासून ते पाचव्या दिवसापर्यंत, सफरचंदासह इतर फळांचे रस, वेजीटेबल स्मूदी, यासह दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करा.
सफरचंदाचा आहारात असा करा समावेश-
दिवस १
न्याहारीमध्ये २ सफरचंद
दुपारच्या जेवणात १ सफरचंद
रात्रीच्या जेवणात ३ सफरचंद खा.
दिवस २
न्याहारीमध्ये १ सफरचंद आणि एक ग्लास सोया मिल्क प्या.
दुपारच्या जेवणात १ सफरचंद, दोन गाजर ग्रीन सॅलडसह खा.
रात्रीच्या जेवणात २ सफरचंद खा.
दिवस ३
न्याहारीमध्ये १ सफरचंद, १ स्लाईस मल्टीग्रेन ब्रेड, प्रोटीनयुक्त पदार्थ खा.
दुपारच्या जेवणात १ सफरचंद, बंगाल ग्रॅम सॅलड खा
रात्रीच्या जेवणात १ सफरचंद, ब्रोकोली, गाजर किंवा एक सफरचंद आणि मसूर सूप प्या
दिवस ४
न्याहारीमध्ये १ सफरचंद
दुपारच्या जेवणात १ सफरचंद आणि ग्रील्ड भाज्या
डिनरसाठी १ सफरचंद, बीटरूट आणि सेलेरी स्मूदी प्या
दिवस ५
न्याहारीमध्ये १ सफरचंद आणि प्रोटीनयुक्त पदार्थ
दुपारच्या जेवणात सफरचंद आणि ग्रील्ड भाज्या
संध्याकाळच्या नाश्त्यात एक कप ग्रीन टी आणि एक बिस्किट
रात्रीच्या जेवणात १ सफरचंद आणि राजमाची भाजी खा.