नियमित योगा करणं, जीमला जाणं, चालण्याचा व्यायाम करणं या सोबतच पळण्याचा, धावण्याचा व्यायाम (running exercise) करणारेही खूप आहेत. विशेष म्हणजे या सगळ्या व्यायामापेक्षा पळण्याचा व्यायाम जास्त मेहनतीचा आणि कष्टाचा मानला जातो. एखाद्या व्यक्तीला दररोज ५ किलोमीटर चालण्याची सवय असेल, तरी जी व्यक्ती जेव्हा पळायला, धावायला सुरूवात करते तेव्हा अवघ्या ५ ते १० मिनिटात घामाघुम होऊन जाते. त्यामुळे धावण्याचा व्यायाम करणार असाल तर त्यापुर्वी थोडी शारिरीक तयारी करायला हवी. अन्यथा धावायला निघालात की खूप जास्त दम लागेल, थकून जाल आणि त्यानंतर मग धावण्याचा व्यायाम करावाच वाटणार नाही. असे होऊ नये म्हणून धावण्यापुर्वी या काही गोष्टींची (Follow these rules before start running) नक्कीच काळजी घ्या.
१. धावायचे तर आहार उत्तमच पाहिजे
Focus on your diet
व्यक्तीनुसार आहार वेगवेगळा असतो. मात्र काही नियम सर्वांनाच पाळावे लागतात. धावण्याचा व्यायाम केल्यामुळे भुक वाढते तसेच धावण्यासाठी उर्जाही अधिक लागते. त्यामुळे धावायचा व्यायाम सुरू करायचा असेल, तर त्याच्या आधी काही दिवस तुमच्या आहारावर लक्ष केंद्रित करा. संतुलित आहार घेण्याचा प्रयत्न करा. आहारात दुध, तूप, फळे, सुकामेवा असे पदार्थही असलेच पाहिजे. जर आहार उत्तम न घेता धावायला सुरूवात कराल तर लवकरच थकून जाल. याविषयी असे सांगितले जाते की आरोग्याच्या दृष्टीने ७० टक्के आहार आणि ३० टक्के व्यायाम असावा. या दोन्ही गोष्टी एकमेकांना पुरक आहेत. आहाराकडे दुर्लक्ष करून धावायला सुरूवात कराल तर त्याचा काही उपयोग नाही. त्यामुळे आहार आणि व्यायाम यांचा समतोल राखा.
२. धावण्याआधीचा आहार असा असावा...
Diet before running
धावण्यापुर्वी काही खाणे योग्य की अयोग्य असा प्रश्न अनेक जणांना पडतो. म्हणूनच तुम्ही किती अंतर धावणार आहात, यावरुन तुमचा आहार ठरतो. अधिक अंतर धावणार असाल तर हलका नाश्ता करता येतो. त्यामुळे उर्जा मिळेल. कमी अंतरावर धावायचे असल्यास केवळ लिक्विड स्वरूपातले डाएट घेऊन धावलात तरी हरकत नाही. धावल्यानंतर खूप घाम येतो. त्यामुळे शरीर हायड्रेटेड ठेवणे गरजेचे असते. म्हणूनच धावण्यापुर्वी द्रव पदार्थ घेण्यास प्राधान्य द्या.
३. वार्मअप करा
Warm up before running
कोणताही व्यायाम करताना वार्मअप करणे जसे गरजेचे असते, तसेच ते धावण्याचा व्यायाम सुरु करण्यापुर्वीही करावे. म्हणूनच धावण्यापुर्वी किमान ५ ते १० मिनिटे वॉर्मअप करा. थोडंसं स्ट्रेचिंग करा. यानंतर हळूहळू चालायला सुरूवात करा. चालण्याची गती वाढवत न्या. मग थोडं थोडं पळायला सुरुवात करा आणि त्यानंतर स्पीड वाढवा. असं हळूहळू पुढे गेल्याने त्रास होणार नाही.
४. बॉडीपोश्चर नीट ठेवा
Focus on body posture
धावताना आपले बॉडी पोश्चर योग्य असणे आवश्यक आहे. शरीराचा सैलपणा आणि ताण यांचा समतोल राखला गेला, तर धावताना शरीर दुखावत नाही. त्यामुळे बॉडी पोश्चर सुधारण्यासाठी सगळ्यात आधी ताठ उभे रहा, खांदे- पाठ स्थिर ठेवा, समोर पहा आणि धावताना थोडे पुढे झुका. तसेच धावताना श्वासावर लक्ष केंद्रित करा. त्यामुळे ताण कमी होतो, उर्जा वाढते आणि सहनशक्तीही वाढते. तसेच धावताना स्लो ॲण्ड स्टेडी हा मंत्रही पाळा.