Join us

प्रोटीनसाठी 'हे' पदार्थ खाता पण त्यात प्रोटीन आहे का? आहारतज्ज्ञ सांगतात, कोणत्या पदार्थांत प्रोटीन नसतं..

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 19:00 IST

Indian Meals Lack In The Quality Of Protein : प्रोटीनच्या सेवनानं फक्त हाडं, मसल्स मजबूत होत नाहीत तर वजन कमी होण्यासही मदत होते.

आपल्या आहारात प्रोटीन्सचा समावेश करणं खूप गरजेचं असतं. प्रोटीन्सयुक्त पदार्थांचा आहारात समावेश केल्यानं शरीर निरोगी चांगले राहते. प्रोटीनच्या सेवनानं फक्त हाडं, मसल्स मजबूत होत नाहीत तर वजन कमी होण्यासही मदत होते. पण बरेच लोक शरीराला प्रोटीन्स मिळत नाही अशी तक्रार करतात (Indian Meal Lack In The Quality Of Protein).

कोणत्या पदार्थांच्या सेवनानं शरीराला प्रोटीन मिळत नाही आणि कोणत्या पदार्थांच्या सेवनानं प्रोटीन मिळतं ते समजून घ्यायला हवं.  न्युट्रिशनिस्ट मोहिता यांच्या म्हणण्यानुसार प्रोटीन्स मिळवण्यासाठी तुम्ही काही पदार्थांचा आहारात समावेश करायला हवा. (Nutritionist Tells Which Indian Foods Are Not Good Source Of Protein)

कोणत्या पदार्थांमध्ये प्रोटीन पुरेश्या प्रमाणात नसते?

न्युट्रिशनिस्टच्या म्हणण्यानुसार भारतीयांना वाटतं की १ वाटी डाळ खाल्ल्यानं शरीराला योग्य प्रमाणात प्रोटीन मिळतं. पण असं नाही. फक्त डाळ प्रोटीन्सची कमतरता पूर्ण करू शकत नाही.

सत्तू चण्याच्या डाळीपासून बनवले जाते. प्रोटीन्सच्या स्वरूपात तुम्ही याचे सेवन करू शकता. पण एक ग्लास  सत्तूनं शरीराला फक्त ७ ग्रॅम प्रोटीन मिळतं. जे खूपच कमी आहे.

प्रोटीन्ससाठी मशरूम हा एक चांगला पर्याय आहे. आहारतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार मशरूममधून योग्य प्रमाणात प्रोटीन मिळत नाहीत.

शेंगदाणे-पीनट बटर

शेंगदाणे किंवा पिनट बटर या दोन्हींमध्ये फॅट्स भरपूर असतात. प्रोटीन्सची कमतरता भासल्यास २ चमचे पिनट बटर खा. ज्यामुळे शरीराला २०० कॅलरीज आणि १० ग्रॅम प्रोटीन मिळेल.

बदाम

बदामाला प्रोटीनचा उत्तम स्त्रोत मानले जाते. बदाम तसंच सुक्या मेव्यांमध्ये फॅट्स जास्त असतात आणि प्रोटीन कमीत कमी प्रमाणात असते.

किनोआ आणि मिलेट

खाण्यात या दोन्ही बियांचा  मोठ्या प्रमाणात समावेश केला जातो. पण या दोन्हींमध्ये प्रोटीन्स असतात. १०० ग्राम कच्ची क्विनेआ आणि मिलेट्समधून १३ ग्रॅम प्रोटीन शरीराला  मिळते.

प्रोटीन बार्स

प्रोटीन बार्समध्ये प्रोटीन कमी आणि शुगर मोठ्या प्रमाणात असते. 

चिया सिड्स

२ चमचे कच्च्या चिया सिड्समध्ये ४ ग्रॅम प्रोटीन असते. न्युट्रिशनिस्टच्या म्हणण्यानुसार यापेक्षा जास्त चिया सिड्स तुम्ही भिजवून खाऊ  शकत नाही.

टॅग्स :फिटनेस टिप्सहेल्थ टिप्सआरोग्य