Join us  

International Yoga Day 2022 : मलायका अरोरा सांगतेय योगा करण्याचे महत्त्व, पाहा व्हिडिओ- make your own yoga flow..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2022 5:51 PM

International Yoga Day 2022 : सोशल मीडियावर मलायकाचे असंख्य फॉलोअर्स असून फिटनेस टिप्ससाठी ते तिला फॉलो करत असल्याचे दिसते.

ठळक मुद्देचला तर मग योगा दिनाच्या निमित्ताने एखादे आसन करुन त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करुया वयाच्या पन्नाशीतही मलायका फिट आणि फाईन असण्याचं सिक्रेट तिचा व्यायाम आणि आहार आहे

मलायका अरोरा अभिनयाच्या बाबतीत जितकी आघाडीवर आहे तितकीच तिच्या फिटनेसबाबतही नेहमी चर्चा होताना दिसते. मलाईका स्वत: वर्कआऊट करतेच पण आपल्या फिटनेसबाबतच्या काही ना काही गोष्टी ती सतत सोशल मीडियावर पोस्ट करत असते. (International Yoga Day 2022) त्यामुळेच तिची फिगर इतकी चांगली असण्यामागे काय राज आहे ते वेगळं सांगायला नको. कधी योगा तर कधी जीम वर्कआऊट, कधी डाएटबाबत तर कधी आणखी काही असं इन्स्टाग्रामच्या माध्यमातून पोस्ट करत ती आपल्या चाहत्यांना तिचे फिटनेस सिक्रेट (Fitness Tips) सांगत असते. सोशल मीडियावर मलायकाचे (Malaika Arora) असंख्य फॉलोअर्स असून फिटनेस टिप्ससाठी ते तिला फॉलो करत असल्याचे दिसते. 

जागतिक योग दिनाच्या निमित्ताने मलायका योगाबाबत एक खास पोस्ट शेअर करत योगाचे महत्त्व सागंते. यामध्ये पिवळ्या रंगाचे कपडे घालून ती योगा मॅटवर कोअर मजबूत करण्यासाठीचा एक व्यायामप्रकार करत असल्याचे दिसते. सर्व योगा स्टुडिओ आणि मलायका अरोरा यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ अपलोड केला आहे. अशाप्रकारचा व्यायाम करायला आपल्याला आवडत असल्याचेही ती या पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हणते. मेक युवर ओन फ्लो म्हणत ती आपल्या चाहत्यांना अशाप्रकारचा कोणताही व्यायामप्रकार करा आणि आम्हाला टॅग करा असे सांगते. 

अवघ्या ५ तासांत मलायकाच्या पोस्टला १८ हजारांहून अधिक जणांनी लाईक केले असून हजारो जणांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या असून मलायका आपले इन्सपिरेशन आहे, आपण तिचे फॅन आहोत असे म्हटले आहे. वयाच्या पन्नाशीतही मलायका फिट आणि फाईन असण्याचं सिक्रेट तिचा व्यायाम आणि आहार आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. लवकरच तिचे फिटनेस आणि डाएट विषयातील एक पुस्तकही प्रसिद्ध होणार असल्याचे काही दिवसांपूर्वी समजले. त्यामुळे स्वत: फिट राहण्याबरोबरच इतरांसाठी प्रेरणा असलेली मलायका खरंच फिटनेससाठी चांगलीच प्रयत्नशील असल्याचे दिसते. चला तर मग योगा दिनाच्या निमित्ताने एखादे आसन करुन त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करुया आणि त्यात मलायकाला टॅग करुया.

टॅग्स :फिटनेस टिप्सयोगासने प्रकार व फायदेमलायका अरोराआंतरराष्ट्रीय योग दिन