वृषाली जोशी-ढोके
मनावरचा ताण काही केल्या कमी होत नाही. सतत स्ट्रेस. चिडचिड. घरच्यांवर चिडणे, नैराश्य हे सारं आजच्या धकाधकीच्या जगण्यात कुणाला चुकलं आहे. अनेकजण चिडचिडत, धुसमुसतच जगत असतात. जरा काही कारण मिळालं की चिडतात, संतापतात. मनाला शांतताच नाही. हे सारं अनेक महिलांचं तर सतत होतं. त्यामुळे शिकून घ्यायला हवं एक आसन. शशांकासन.ताणतणाव, नैराश्यावर मात करण्यासाठी अतिशय उपयुक्त आसन.
(Image : google)
हे आसन कसे करावे?
१. वज्रासनामध्ये बसावे दोन्ही हात गुडघ्यावर ठेवावे. २. श्वास घेत दोन्ही हात समोरून सावकाश डोक्यावर घेऊन जाणे, दंड कानाला चिकटलेले कोपर ताठ ठेवावे. दोन्ही गुडघ्यात एक ते दीड फूट अंतर घ्यावे.३. श्वास सोडत कंबरेमधून पुढे वाकत डोकं जमिनीवर टेकवावे त्याचवेळी दोन्ही हात सुद्धा जमिनीवर टेकवावे.४. आसन स्थिती पूर्ण झाल्यावर संथ श्वसन चालू ठेवावे.५. आसन स्थिती सोडताना श्वास घेत सावकाश कंबरेतून सरळ व्हावे दोन्ही हात डोक्यावर घेऊन जाणे.६. त्यानंतर दोन्ही हात बाजूने खाली आणून गुडघ्यावर ठेवावे दोन्ही गुडघे जुळवून वज्रासन पूर्ण करून घ्यावे.
(Image : google)
आसनाचे फायदे१. या आसनाच्या नियमित सरावाने मानसिक ताणतणाव, नैराश्य, चिडचिडेपणा, मानसिक आजार दूर होतात.२. नितम्ब, ओटीपोट, कंबरेवरची चरबी कमी व्हायला मदत होते.३. स्मृती वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांनी हे आसन दररोज करावे.४. पोटावर दाब निर्माण झाल्याने पचन संस्थेचे कार्य सुधारते.
कालावधीकिमान 30 सेकंद ते दीड मिनिट पर्यंत कालावधी वाढवता येतो.
दक्षता१. गुडघ्याचे ऑपरेशन झालेले असेल तर हे आसन शक्यतो टाळावे.२. मणक्याचे आजार, स्लिप डिस्क, फ्रोझन शोल्डर असे त्रास असतील तर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हे आसन करावे.३. कंबरेतूनखाली वाकताना श्वास सोडत किंवा श्वास सोडलेल्या अवस्थेत खाली वाकावे. श्वास कुठेही रोखून ठेवू नये.(लेखिका आयुषमान्य योग आणि वेलनेस ट्रेनर आहेत.)