वृषाली जोशी ढोके
आजकाल आपला स्क्रीन टाइम फार वाढलेला आहे. सतत मान खाली घातलेली आणि खांदे खाली पडलेले. न कळतच मेंदूला रक्त पुरवठा करणाऱ्या नसादाबल्या जातात. मानेला आणि खांद्याला बाक यायला लागतो आणि शरीराची ठेवण बिघडायला लागते. अशावेळी शरीराला उलट दिशेने ताण देणे गरजेचे आहे. त्यासाठी ऊष्ट्रासन अतिशय उपयुक्त आहे. ऊष्ट्र म्हणजे ऊंट. या आसनामध्ये शरीराची आकृती उंटा सारखी होते.
हे आसन कसे करावे?१. वज्रासनात बसावे. त्यानंतर दोन्ही गुडघ्यावर उभे राहावे पायात थोडे अंतर ठेवावे.२. श्वास सोडत डावा हात गोलाकार फिरवून डाव्या टाचेवर ठेवावा. तसेच उजवा हात गोलाकार फिरवून उजव्या पायाच्या टाचे वर ठेवावा.३. श्वास सोडलेल्या अवस्थेत शरीराची मागच्या बाजूने कमान करून घ्यावी. आसनामध्ये स्थिर झाल्यावर संथ श्वसन चालू ठेवावे.४. आसन स्थिति सोडताना सावकाश पाठीतून सरळ व्हावे.५.. उजवा हात गोलाकार फिरवून जागेवर आणावा तसेच डावा हात गोलाकार फिरवून जागेवर आणावा. दोन्ही हात बैठकी जवळ.६. गुडघे जुळवून वज्रासन पूर्ण करावे.
कालावधी३० सेकंद आसन टिकवता येते.
फायदे१. थायरॉइड ग्रंथीचे कार्य सुधारते.२. पाठ आणि खांद्यांना बळकटी मिळते, पाठीचा कणा लवचीक होतो.३. पचन संस्थेवर ताण निर्माण होतो पचनाचे कार्य सुधारते.४.. पाठीच्या शेवटच्या मणक्यावर दाब निर्माण होतो मणक्य ची कार्यक्षमता सुधारते. लोअर बॅक पेन साठी अतिशय उपयुक्त स्थिती.
दक्षता१. गुडघ्याचे ऑपरेशन झाले असेल तर शक्यतो हे आसन टाळावे.२.झेपेल एवढाच ताण शरीराला द्यावा.३. हर्निया किंवा पोटाचे त्रास असतील तर ही आसन स्थिती टाळावी.४.. शक्यतो तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हे आसन करावे.(लेखिका आयुषमान्यता प्राप्त योग आणि वेलनेस ट्रेनर आहेत.)