Lokmat Sakhi >Fitness > International yoga day :कंगनानं सांगितला रंगोलीच्या एसिड हल्ल्याचा अनुभव; ५३ सर्जरीजनंतर 'या' उपायानं मिळवली गमावलेली दृष्टी

International yoga day :कंगनानं सांगितला रंगोलीच्या एसिड हल्ल्याचा अनुभव; ५३ सर्जरीजनंतर 'या' उपायानं मिळवली गमावलेली दृष्टी

International yoga day 2021 : रंगोलीची एक प्रेरणादायक योगा स्टोरी आहे. एका रोड साईड रोमिओनं रंगोलीच्या अंगावर एसिड फेकले तेव्हा ती फक्त २१ वर्षांची होती. या हल्ल्यात जवळपास तिचा अर्धा चेहरा जळला आणि एका डोळ्याची दृष्टीही गेली.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 01:25 PM2021-06-21T13:25:34+5:302021-06-21T13:38:57+5:30

International yoga day 2021 : रंगोलीची एक प्रेरणादायक योगा स्टोरी आहे. एका रोड साईड रोमिओनं रंगोलीच्या अंगावर एसिड फेकले तेव्हा ती फक्त २१ वर्षांची होती. या हल्ल्यात जवळपास तिचा अर्धा चेहरा जळला आणि एका डोळ्याची दृष्टीही गेली.

International yoga day : Rangoli's acid attack kangana shares experience Yoga is the answer to her every question | International yoga day :कंगनानं सांगितला रंगोलीच्या एसिड हल्ल्याचा अनुभव; ५३ सर्जरीजनंतर 'या' उपायानं मिळवली गमावलेली दृष्टी

International yoga day :कंगनानं सांगितला रंगोलीच्या एसिड हल्ल्याचा अनुभव; ५३ सर्जरीजनंतर 'या' उपायानं मिळवली गमावलेली दृष्टी

Highlights'डॉक्टरांनी मला सांगितले की, तिला  घडल्या प्रकाराची धडकी भरली आहे. त्यांनी तिला उपचार दिले आणि मनोरुग्णासाठी औषधोपचार केले परंतु त्याची काहीही मदत झाली नाही. योगामुळे मानसिक आरोग्यावरही सकारात्मक परिणाम होतो याबाबत मला कल्पना नव्हती. मला याबाबत कळल्यानंतर मी लगेचच तिच्याशी बोलले आणि माझ्यासह तिलाही योगा क्लासेसमध्ये  घेऊन आले.

आज आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट शेअर केल्या जात आहेत. अभिनेत्री कंगना रणौत नेहमीच सोशल मीडियावर एक्टिव्ह असते. आज योगा दिनानिमित्त (International yoga day 2021)  तिनं बहिण रंगोलीच्या एसिड अटॅकनंतरचा एक अनुभव शेअर केला आहे. एक फेसबुक पोस्ट शेअर करत तिनं याबाबत माहिती दिली आहे.  या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलंय की, 'रंगोलीची एक प्रेरणादायक योगा स्टोरी आहे. एका रोड साईड रोमिओनं रंगोलीच्या अंगावर एसिड फेकले तेव्हा ती फक्त २१ वर्षांची होती. या हल्ल्यात जवळपास तिचा अर्धा चेहरा जळला आणि एका डोळ्याची दृष्टीही गेली.

एका बाजूचा कान आणि छातीला गंभीर जखम झाली. त्यानंतर तिला जवळपास ५३ सर्जरीजमधून जावं लागलं. मग मानसिक आरोग्याचं झालेलं नुकसान न भरून येण्यासारखं होतं. तिला बोलायलाही जमत नव्हतं. त्याआधी  एका एअर फोर्स अधिकाऱ्यासह तिचं लग्न ठरलं होतं. पण तिचा असा चेहरा पाहिल्यानंतर तो पुन्हा कधीच परत आला  नाही. तरीही ती ना रडली ना काही बोलली.'

पुढे ती लिहिते की, 'डॉक्टरांनी मला सांगितले की, तिला  घडल्या प्रकाराची धडकी भरली आहे. त्यांनी तिला उपचार दिले आणि मनोरूग्णासाठी आवश्यक औषधोपचार सुरू केले परंतु त्याची काहीही मदत झाली नाही. त्यावेळी मी फक्त १९ वर्षाचे होते. त्यावेळी मी माझे योगा शिक्षक सुर्या नारायण यांच्यासह योगा करायचे. योगामुळे मानसिक आरोग्यावरही सकारात्मक परिणाम होतो याबाबत मला कल्पना नव्हती. मला याबाबत कळल्यानंतर मी लगेचच तिच्याशी बोलले आणि माझ्यासह तिलाही योगा क्लासेसमध्ये  घेऊन आले.

तिनं योगा करायला सुरूवात केल्यानंतर खूप मोठा बदल घडून आला. तिनं माझ्या विनोदांना प्रतिसाद द्यायला सुरूवात केली. तिची गेलेली दुष्टीही परत मिळाली. योगा हेच माझ्या प्रत्येक प्रश्नाच उत्तर आहे.' #internationalyogaday असं म्हटत कंगनानं आपल्या पोस्टचा शेवट केला आहे. जवळपास ७२ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या  पोस्टवर लाईक्सचा वर्षाव केला आहे. तर १ हजार लोकांनी या पोस्टवर कमेंट्स केल्या असून ६०० पेक्षा जास्त शेअर मिळाले आहेत. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता कंगनासह तिची बहिण रंगोली योगा करताना दिसून येत आहे. 

Web Title: International yoga day : Rangoli's acid attack kangana shares experience Yoga is the answer to her every question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.