Day Nap Good Or Bad: घरी असणारे किंवा सुट्टी असणारे बरेच लोक दुपारी भरपूर झोप घेतात. खासकरून ज्या महिला गृहिणी आहेत. त्या दुपारी झोपणं पसंत करतात. झोपल्यावर आराम भलेही वाटत असला तरी आयुर्वेदात मात्र दुपारी झोपण्याला नुकसानकारक मानलं जातं. दुपारी झोपण्याचे शरीरावर अनेक नकारात्मक परिणाम होतात. अशात दुपारी झोपणं नुकसानकारक कसं ठरतं किंवा दुपारी कुण झोपावं आणि कुणी झोपू नये हे जाणून घेणं फार महत्वाचं ठरतं.
दिवसा झोपण्याचे नुकसान
आयुर्वेदानुसार, दिवसा झोपणं आरोग्यासाठी चांगलं नाही. अनेक रिसर्चमधूनही समोर आलं आहे की, दिवसा झोपल्यानं शरीरात कफ वाढतो. 10 ते 15 मिनिटांची झोप घेणं चुकीचं नाही, पण दिवसा अनेक तासांची गाढ झोप घेणं आरोग्यासाठी चांगलं नाही.
दुपारी कुणी झोपू नये?
- जर तुम्हाला फिट रहायचं असेल, सोबतच मेंटल हेल्थही चांगली ठेवायची असेल तर दिवसा झोपू नका.
- जे लोक पोटावरील आणि कंबरेची चरबी कमी करण्याचा विचार करत आहेत त्यांनी केवळ रात्री झोपावं.
- जे लोक जास्त तेलकट, तळलेले किंवा मैद्याचे पदार्थ खातात त्यांनी दिवसा अजिबात झोपू नये.
- जे नेहमीच कफ वाढण्याच्या समस्येने वैतागलेले असतात, त्यांनीही दिवसा झोप घेऊ नये.
- डायबिटीस, हायपोथायरॉइड आणि पीसीओएस आजाराने पीडित लोकांनी दिवसा झोपू नये.
दिवसा कोण झोपू शकतात?
- प्रवासामुळे किंवा खूप जास्त मेहनतीचं काम केलं असेल असे लोक दिवसा थोडा वेळ झोप घेऊ शकतात.
- जे लोक फार सडपातळ किंवा कमजोर आहेत, त्यांनीही दिवसा झोपलं तर काही हरकत नाही.
- आजारी असाल किंवा सर्जरी झाली असेल तर डॉक्टर दिवसा आराम करण्यास सांगतात तेव्हाही दिवसा झोप घ्यावी.
- गर्भवती महिलांनाही आरामाची गरज असते, त्यांनीही दिवसा झोप घ्यावी.
- 10 वर्षापेक्षा कमी आणि 70 वयापेक्षा जास्त असलेले लोकही दिवसा आराम करू शकतात.