Workout Tips: रोज जिममध्ये किंवा घरी वर्कआउट करणं अनेकांच्या जगण्याचा भाग झालं आहे. वर्कआउट करताना भरपूर घाम जातो, ज्यामुळे भरपूर पाणी पिण्याचा सल्ला एक्सपर्ट देत असतात. पण बरेच लोक असेही असतात जे वर्कआउट दरम्यान किंवा त्यानंतर थंड पाणी पितात. मात्र, अनेकांना हा प्रश्न पडतो की, वर्कआउटनंतर थंड पाणी प्यावं की नाही? याच प्रश्नाचं उत्तर आम्ही देणार आहोत.
एक्सपर्टनुसार, वर्कआउटनंतर थंड पाणी पिणं शरीरासाठी नुकसानकारक ठरू शकतं. कारण वर्कआउट दरम्यान शरीराचं तापमान वाढत असतं. अशात वर्कआउटनंतर लगेच जेव्हा तुम्ही थंड पाणी पिता तेव्हा शरीराचं तापमान एकएकी कमी होतं. अशात तुम्ही जिममध्ये केलेली अनेक तासांची वर्कआउटची मेहनत पूर्णपणे वाया जाते. यासोबतच सर्दी होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे वर्कआउटनंतर नेहमीच नॉर्मल पाणी प्यावं. यानं शरीराचं वजन कमी होईल. सोबतच तुम्हाला नुकसान होण्याचा धोकाही कमी असेल.
वजनही वाढू शकतं
जेव्हा तुम्ही वर्कआउटनंतर थंड पाणी पिता तेव्हा तुमचं वजनही वाढू शकतं. खासकरून बेली फॅट वाढण्याची शक्यता अधिक असते. अशात जर तुम्ही वर्कआउटने वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर थंड पाणी अजिबात पिऊ नका.
हार्ट रेटवर प्रभाव
वर्कआउटनंतर थंड पाणी प्यायल्यानं हृदयाच्या गतिवरही प्रभाव पडतो. वर्कआउट दरम्यान तुमच्या नसांमध्ये वेगानं ब्लड सर्कुलेशन होतं आणि अचानक थंड पाणी प्यायल्यास नसा थंड होतात. अशात हृदयाची गति आणि ब्लड सर्कुलेशन स्लो होतं. कधी कधी ही स्थिती गंभीर होऊ शकते. त्यामुळे वर्कआउट केल्यावर लगेच थंड पाणी पिऊ नये.
डोकं दुखेल
वर्कआउटनंतर तुम्ही जर थंड पाणी प्याल तर तुम्हाला डोकेदुखी आणि सायनसची समस्याही होऊ शकते. खासकरून तुम्ही जेव्हा आइस क्यूबवालं पाणी पिता तेव्हा यानं तुमच्या नसा थंड होतात. अशात याचा प्रभाव तुमच्या डोक्यावर पडतो. ज्यामुळे डोकेदुखीची समस्या होऊ लागते.