Lokmat Sakhi >Fitness > नाश्त्याला इडली खाल्ल्याने खरंच वजन कमी होते का? त्यासाठी कधी आणि किती प्रमाणात इडली खावी?

नाश्त्याला इडली खाल्ल्याने खरंच वजन कमी होते का? त्यासाठी कधी आणि किती प्रमाणात इडली खावी?

Is Idli Good For Weight Loss : वजन कमी करायचं असल्यास इडली सांबार खाणं खरंच फायद्याचं ठरतं का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2023 01:54 PM2023-09-29T13:54:46+5:302023-09-29T13:56:36+5:30

Is Idli Good For Weight Loss : वजन कमी करायचं असल्यास इडली सांबार खाणं खरंच फायद्याचं ठरतं का?

Is Idli Good For Weight Loss? | नाश्त्याला इडली खाल्ल्याने खरंच वजन कमी होते का? त्यासाठी कधी आणि किती प्रमाणात इडली खावी?

नाश्त्याला इडली खाल्ल्याने खरंच वजन कमी होते का? त्यासाठी कधी आणि किती प्रमाणात इडली खावी?

Highlightsइडली खाल्ल्याने खरंच वजन कमी होते का? वजन कमी करण्यासाठी इडली किती व केव्हा खावी?

तांदुळाची, डाळींची, रव्याची इडली (Idli) आपण खाल्लीच असेल. डाळ-तांदुळाची इडली आपण प्रत्येक जण नाश्त्यामध्ये खातोच. इडली खाल्ल्याने पोट तर भरतेच, शिवाय आरोग्याला अनेक फायदे देखील मिळतात. वेट लॉस (Weight loss) जर्नीमध्ये अनेक जण आपल्या आहारात इडलीचा समावेश करतात. इडली हे फायबरयुक्त अन्न आहे. सकाळी नाश्त्यामध्ये इडली खाल्ल्यानंतर पोट बराच काळ भरलेले राहते. ज्यामुळे आपण उलट-सुलट खाणे टाळतो.

इडलीमध्ये कोणत्याही प्रकारचे ट्रान्सफॅट किंवा सॅच्युरेटेड फॅट नसते. ज्यामुळे अतिरिक्त वजन वाढत नाही. पण इडली खाल्ल्याने खरंच वजन कमी होते का? वजन कमी करण्यासाठी इडली किती व केव्हा खावी? याची माहिती पोषणतज्ज्ञ डॉ. सिमरन सैनी यांनी दिली आहे(Is Idli Good For Weight Loss).

वजन कमी करण्यासाठी इडली कशी फायदेशीर ठरते?

कॅलरीजचे प्रमाण कमी

कॅलरीज इनटेकमुळे वजन झपाट्याने वाढते. वजन कमी करण्यासाठी पोषणतज्ज्ञ आहारातून कॅलरीजचे प्रमाण कमी करण्यास सांगतात. त्यामुळे नाश्त्यामध्ये अनेक जण इडली खाण्यास प्राधान्य देतात. इडलीमध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप कमी असते. इडली स्टीम करून केली जात असल्यामुळे, हे खाल्ल्याने वजन कमी होते, सोबत पोटही गच्च भरलेले राहते.

ना जिम - ना डाएट, रोज सकाळी ५ पैकी १ मॉर्निंग ड्रिंक प्या, वजन आणि पोटही होईल कमी

पचनसंस्था सुधारते

ज्यांना पचनाच्या निगडीत त्रास आहे, त्यांचे देखील या कारणामुळे वजन वाढते. अशा वेळी पचनसंस्थेची काळजी घ्यायला हवी. यासह पचनसंस्थेला मजबूत करणारे पदार्थ खायला हवे. इडली पचनक्रिया निरोगी ठेवण्यास फायदेशीर ठरते. इडली पचायला हलकी असते, ज्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते.

फायबरयुक्त इडली

इडलीमध्ये अनेक पौष्टीक असतात. यासह फायबरचे प्रमाणही जास्त असते. फायबर पोटासाठी फायदेशीर मानले जाते. फायबरचे सेवन केल्याने वजन कमी होते, व इतर गंभीर आजारांचा धोकाही कमी होतो. जे लोकं सकाळी नाश्त्यामध्ये इडली खातात, त्यांना लवकर भूक लागत नाही. सकाळी नाश्त्यामध्ये इडली खाल्ल्याने दिवसभर काम करण्याची उर्जा मिळते.

कार्ब्सवर ठेवते कण्ट्रोल

तज्ज्ञांच्या मते, इडली हा एक असा खाद्यपदार्थ आहे, ज्याच्या मदतीने आपण आपले कार्ब्स नियंत्रित करू शकता. यासह शरीरातील अतिरिक्त चरबी बर्न करण्यास मदत मिळते. त्यामुळे वजन कमी करताना कार्ब्सवर कण्ट्रोल ठेवणं गरजेचं आहे. यासाठी आपण नाश्त्यामध्ये इडली खाऊ शकता. इडलीमध्ये कार्ब्सचे प्रमाण खूप कमी असते.

सुटलेले पोट कमी करायचे? ४ पैकी १ डाळ रोज खा, पोट होईल सपाट लवकर

आयर्नने परिपूर्ण

इडली फक्त वजन कमी करण्यास मदत करत नसून, पौष्टिकतेच्या कमतरतेमुळे होणा-या अनेक आजारांपासूनही दूर ठेवते. इडलीमध्ये आयर्नचे प्रमाण जास्त असते. जर आपल्या शरीरात आयर्नचे प्रमाण कमी असेल तर, आहारात इडलीचा समावेश करा. आपण सकाळी नाश्त्यामध्ये एक प्लेट इडली खाऊ शकता. ज्यामुळे आपल्याला दिवसभर काम करण्याची उर्जा मिळेल.

Web Title: Is Idli Good For Weight Loss?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.