Lokmat Sakhi >Fitness > रात्री जेवणच केलं नाही तर खरंच वजन झटकन कमी होते का? तज्ज्ञ सांगतात, फिटनेस हवा तर..

रात्री जेवणच केलं नाही तर खरंच वजन झटकन कमी होते का? तज्ज्ञ सांगतात, फिटनेस हवा तर..

रात्री जेवलंच नाही तर वजन कमी होईल असं वाटून अनेजण रात्री काहीच खात नाहीत पण योग्य की अयोग्य?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2023 06:33 PM2023-01-03T18:33:46+5:302023-01-05T16:54:29+5:30

रात्री जेवलंच नाही तर वजन कमी होईल असं वाटून अनेजण रात्री काहीच खात नाहीत पण योग्य की अयोग्य?

Is it alright to skip dinner when trying to lose weight : Here are 5 side effects of skipping dinner for weight loss | रात्री जेवणच केलं नाही तर खरंच वजन झटकन कमी होते का? तज्ज्ञ सांगतात, फिटनेस हवा तर..

रात्री जेवणच केलं नाही तर खरंच वजन झटकन कमी होते का? तज्ज्ञ सांगतात, फिटनेस हवा तर..

कमी जेवल्यानं किंवा रात्रीचं जेवण सोडल्यानं वजन कमी करण्यास मदत होते  असा अनेकांचा गैरसमज असतो.  बरेचजण वजन कमी करण्याच्या नादात रात्री उपाशीपोटी झोपतात. त्यामुळे पोषक तत्वाची कमतरता भासते तर कधी अशक्तपणा जाणवतो.  नाश्ता, दुपारचं जेवण याप्रमाणेच रात्रीचं जेवणंही तितकंच महत्वाचं आहे. (Can you skip dinner and lose weight by expert)

 रात्रीचं  जेवण नेहमी  हलकं आणि पौष्टीक असावं. जे लो कॅलरीज आणि पाचयला हलकं असेल. रात्रीचं न जेवण वेळेवर न घेतल्यानं तुम्हाला खूपच अस्वस्थ वाटू शकतं गॅस्ट्रीक समस्याही उद्भवू शकता. रात्रीचं जेवणं करण्याची योग्य वेळ पाळायला हवी. जेणेकरून शरीरातील अतिरिक्त चरबी वाढणार नाही. (Is it alright to skip dinner when trying to lose weight)

रात्रीचं जेवण सोडणं कितपत योग्य?

न्युट्रिशनिस्ट लवनीत बत्रा यांच्यमते वजन वेगानं कमी करण्यासाठी रात्रीचं जेवण सोडण्याची काहीच गरज नाही. पोषण तज्ज्ञांच्यामते रात्री झोपण्याच्या ३ तास आधी जेवायला हवं. रात्रीची झोप आणि जेवण यात चांगलं अंतर असेल वजन वाढत नाही. हे रूटीन तुम्ही नियमित फॉलो केलं जेवण स्किप न करता तुम्ही मेटेंन राहू शकता.

१) रात्रीच्या जेवणासाठी खिचडी हा उत्तम ऑप्शन आहे.  खिचडीत फायबर्स असतात. ती पचायलाही  हलकी असते आणि जास्तवेळ पोट भरल्यासारखं वाटतं.

२) रात्रीच्या जेवणात तुम्ही चपाती किंवा चपातीऐवजी भाकरीचा समावेश करू शकता. भाकरी, भाजी आणि एक वाटी सॅलेड खाल्ल्यानंतर पोट भरेल.

३) संध्याकाळी ७ नंतर मीठ, साखरयुक्त पदार्थ खाऊ नका. यामुळे शरीरात वॉटर रिटेंशन वाढतं. यामुळे वजन वाढू शकतं. 

रात्रीचं जेवण न केल्यास काय  होतं?

1) व्यवस्थित झोप लागत नाही.

२) शरीरात व्हिटामीन आणि न्युट्रिशन्सची कमतरता भासते.

३) मेटाबॉलिझ्म कमी होतो. 

४) उपाशीपोटी झोपल्यानं दुसऱ्या दिवशी जास्त खाल्लं जातं

५) दिवसभराच्या थकव्यानंतर रात्री न जेवता झोपल्यानं शांत झोप येत नाही. 

 

Web Title: Is it alright to skip dinner when trying to lose weight : Here are 5 side effects of skipping dinner for weight loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.