Lokmat Sakhi >Fitness > गोड खायला खूप आवडतं पण वजन वाढतं म्हणून तोंडाला कुलूप? ५ टिप्स, गोड खा आणि वजनही नाही वाढणार

गोड खायला खूप आवडतं पण वजन वाढतं म्हणून तोंडाला कुलूप? ५ टिप्स, गोड खा आणि वजनही नाही वाढणार

Is it bad to get dessert if you are trying to lose weight वजन कमी करताना किंवा वाढू नये म्हणून गोड खाणं पूर्णच बंद करायचं की ‌थोडं खाल्लं तर चालतं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2023 12:51 PM2023-02-16T12:51:13+5:302023-02-16T12:52:54+5:30

Is it bad to get dessert if you are trying to lose weight वजन कमी करताना किंवा वाढू नये म्हणून गोड खाणं पूर्णच बंद करायचं की ‌थोडं खाल्लं तर चालतं?

Is it bad to get dessert if you are trying to lose weight | गोड खायला खूप आवडतं पण वजन वाढतं म्हणून तोंडाला कुलूप? ५ टिप्स, गोड खा आणि वजनही नाही वाढणार

गोड खायला खूप आवडतं पण वजन वाढतं म्हणून तोंडाला कुलूप? ५ टिप्स, गोड खा आणि वजनही नाही वाढणार

वजन कमी करत असताना आपल्याला अनेक पदार्थ न खाण्याचा सल्ला दिला जातो. त्यात ग्लुटेनयुक्त यासह तेलकट व गोड पदार्थ न खाण्याचा सल्ला मिळतो. मात्र, अनेकांना या पदार्थांशिवाय जमत नाही. काही लोकांना जेवण झाल्यानंतर अथवा जेवणाआधी गोड पदार्थ खाण्याची सवय असते. कमी गोड खाण्याचे अनेक फायदे आहेत. कमी साखर खाल्ल्याने शरीरात कमी कॅलरीज जातात. ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत मिळते. वजन कमी करत असताना आपल्याला साखर टाळण्याचा सल्ला मिळतो. डाएटमध्ये नैसर्गिक साखरेचा समावेश असतो, ज्यात आपल्याला फळे खाण्यास सांगतात. मात्र, कमी गोड खाल्याने मुड स्विंग्ज, डोकेदुखी, हे तोटे आहेत.

आपल्याला जर साखरेशिवाय जमत नसेल तर, आपण साखरेचा आहारात समावेश करू शकता. आता तुम्ही म्हणाल ते कसे? या संदर्भात आयुर्वेद एक्सपर्ट दिक्षा भावसर यांनी काही टिप्स शेअर केले आहेत, त्यांनी हे टिप्स आपल्या इन्सटाग्राम अकांऊटवर शेअर केले आहेत. त्यांनी त्यात म्हटलं की, ''गोड पदार्थ खाऊन सुद्धा वेट मॅनेज करता येईल. मात्र, वेट मॅनेज करत असताना काही टिप्स फॉलो करूनच या गोड पदार्थाचे सेवन करा.''

वेट मॅनेज करत असताना गोड खा, पण त्यानंतर या टिप्स फॉलो करा

गोड खायची इच्छा होत असेल तर, गोड पदार्थ प्रमाणात खा, गोड पदार्थ खाण्याचे टाईम स्लॉट तयार करा. खाण्याची इच्छा मारू नका, मात्र प्रमाणात खा.

आवडता गोड पदार्थ खाल्ल्यानंतर गरम पाणी प्या. आपल्याला हा उपाय कॉमन वाटत असेल. परंतु, हा उपाय आपल्या शरीरासाठी प्रभावी ठरेल.

गोड पदार्थ खाल्ल्यानंतर पुदिना व आलं याच्यापासून तयार चहा प्या. यासाठी एका भांड्यात पाणी घ्या त्यात कढीपत्ता, पुदिना, किसून घेतलेलं आलं, या सर्व मिश्रणाला उकळून घ्या. उकळी आल्यानंतर हा चहा प्या.

गोड पदार्थ सहसा दुपारच्या जेवणानंतर खा. रात्रीच्या जेवणानंतर गोड पदार्थ खाणे टाळा.

आपण जर दुपारच्या जेवणात आवडता पदार्थ खात असाल तर, रात्रीचे जेवण हलके पदार्थ खाऊन करा. यामुळे शरीरात कॅलरीज प्रमाण बॅलेंसमध्ये राहेल.

Web Title: Is it bad to get dessert if you are trying to lose weight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.