Lokmat Sakhi >Fitness > मॉर्निंग वॉकला काही खाऊन जावे की उपाशीपोटीच जाणे योग्य ? तज्ज्ञ सांगतात, नक्की योग्य काय...

मॉर्निंग वॉकला काही खाऊन जावे की उपाशीपोटीच जाणे योग्य ? तज्ज्ञ सांगतात, नक्की योग्य काय...

When to Eat Before Your Morning Walk : सकाळी उठून मॉर्निंग वॉक करण्याआधी थोडाफार हलका ब्रेकफास्ट करावा की हेव्ही नाश्ता करून मॉर्निंग वॉकला जावे असा प्रश्न अनेकांना सतावत असतो...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2023 09:00 AM2023-08-25T09:00:00+5:302023-08-25T09:00:01+5:30

When to Eat Before Your Morning Walk : सकाळी उठून मॉर्निंग वॉक करण्याआधी थोडाफार हलका ब्रेकफास्ट करावा की हेव्ही नाश्ता करून मॉर्निंग वॉकला जावे असा प्रश्न अनेकांना सतावत असतो...

Is it okay to go for morning walks without having breakfast first ? | मॉर्निंग वॉकला काही खाऊन जावे की उपाशीपोटीच जाणे योग्य ? तज्ज्ञ सांगतात, नक्की योग्य काय...

मॉर्निंग वॉकला काही खाऊन जावे की उपाशीपोटीच जाणे योग्य ? तज्ज्ञ सांगतात, नक्की योग्य काय...

मॉर्निंग वॉक करण्याची सवय आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असते. सर्व वयोगटातील लोकांनी सकाळी लवकर उठून किमान मॉर्निंग वॉक (Morning Walk) करण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे अनेक आजारांपासून मुक्तता मिळतो. मॉर्निंग वॉक (Morning Walk) करताना आपण जर वेगाने चालत असाल तर हा एक उत्तम कार्डिओ व्यायाम प्रकार देखील होऊ शकतो. असे केल्याने शरीर केवळ टोनच राहत नाही तर दिवसभर फ्रेशही वाटते. स्वतःच्या उत्तम आरोग्यासाठी प्रत्येकजण हा प्रयत्नशील असतोच. अशावेळी मॉर्निंग वॉक हा एक उत्तम पर्याय ठरतो. निरोगी आणि सुदृढ राहण्यासाठी सकाळी चालणे कायमच फायदेशीर ठरते. मॉर्निंग वॉकमुळे (Morning Walk) आपण चालणंही होतं आणि त्यासोबतच शुद्ध, ताजी हवा आणि सूर्याची किरण अशा अनेक गोष्टी एकाचवेळी शरीराला मिळतात.

मॉर्निंग वॉक करण्यापूर्वी काही खावे की नाही, असा गोंधळ अनेकांच्या मनात असतो. सकाळी उठून मॉर्निंग वॉक करण्याआधी थोडाफार हलका ब्रेकफास्ट करावा की हेव्ही नाश्ता करून मॉर्निंग वॉकला जावे असा प्रश्न अनेकांना सतावत असतो. मॉर्निंग वॉक करण्याआधी खरंच ब्रेकफास्ट करावा का ? ब्रेकफास्ट करायचा असल्यास त्यावेळी नेमकं काय खावं ? याबाबत डाएट एन क्युअरच्या डायटीशियन आणि न्यूट्रिशनिस्ट दिव्या गांधी यांनी अधिक माहिती दिली आहे(Is it okay to go for morning walks without having breakfast first ?).

मॉर्निंग वॉक करण्यापूर्वी काही खाणे योग्य की अयोग्य ?

जर आपण मॉर्निंग वॉक किंवा सकाळी लवकर उठून एक्सरसाइज करत असाल, तर त्यापूर्वी एक तास आधी आपण योग्य प्रमाणांत नाश्ता करू शकता. रात्रीच्या ६ ते ७ तासांच्या झोपेनंतर आपले पोट हे दीर्घकाळ उपाशी असते, आपल्या पोटांत काहीच नसते. अशावेळी सकाळी उठून मॉर्निंग वॉक करण्यापूर्वी काहीतरी खाल्ल्याने आपल्याला सकाळी उठण्यास मदत होईल आणि उत्साही वाटेल. सकाळी मॉर्निंग वॉक किंवा एक्सरसाइज करण्यापूर्वी कार्बोहायड्रेट्सयुक्त ब्रेकफास्ट खाल्ल्याने, आपण केलेल्या एक्सरसाइज सारख्या ऍक्टिव्हिटीजचा शरीराला अधिक फायदा करून देतात. मॉर्निंग वॉकपूर्वी काही खाल्ल्याने जास्त वेळ चालण्यास आणि आपल्या एक्सरसाइजची तीव्रता वाढविण्यात देखील मदत करू शकते.

फॅट टू फिट प्रवासात शहनाज गिल सकाळी प्यायची सिक्रेट ड्रिंक, इतकं स्वस्त की कुणालाही परवडेल...

जाॅगिंग रोज करण्याचा फायदा होतो की तोटा ? ५ गोष्टी जॉगिंग करतानाच काय चालतानाही विसरु नका...

सकाळी काहीतरी खाऊन मगच मॉर्निंग वॉक करण्याचे नेमके काय आहेत फायदे ? 

१. एनर्जी बूस्ट होते (Energy Boost) :- जर आपण काहीतरी खाऊन मॉर्निंग वॉक करत असाल तर आपली एनर्जी लेव्हल सुधारते. खरेतर रात्रीच्या जेवणानंतर सकाळी नाश्त्यापर्यंत बराच वेळ आपण काहीही न खाताच मॉर्निंग वॉकला जातो. अशा परिस्थितीत जर आपण सकाळी उठून फ्रेश होऊन काही न खाताच मॉर्निंग वॉकला गेलात तर आपल्याला अशक्तपणा जाणवू शकतो. याउलट, जर आपण सकाळी काहीतरी खाऊन मग मॉर्निंग वॉक किंवा एक्सरसाइजला सुरुवात करत असाल तर आपल्याला अतिशय उत्साही व फ्रेश वाटेल. 

वजन कमी करण्यासाठी ४ मंत्र विसरुच नका ! तापसी पन्नूच्या न्यूट्रिशनिस्ट मुनमुन गनेरीवालचा सल्ला...

२. मॉर्निंग ऍक्टिव्हिटीजची कार्यक्षमता सुधारते (Improved Performance) :- सकाळी मॉर्निंग वॉक किंवा एक्सरसाइजला सुरुवात करण्यापूर्वी काहीतरी हलके पण पौष्टिक खाल्ल्याने आपल्या ऍक्टिव्हिटीजची कार्यक्षमता सुधारते. वास्तविक, सकाळी काहीतरी खाल्ल्याने आपण उत्साही राहतो आणि याच उर्जेमुळे आपल्या चालण्याचा वेग सुधारतो. जेव्हा आपण मॉर्निंग वॉक वेगवान पावलांनी करतो, तेव्हा आपल्याला त्याचा अधिक फायदा होतो. एवढेच नाही तर नाश्ता केल्यानंतर चालल्यामुळे थकवाही जाणवत नाही.

आपल्या वयानुसार आपण दिवसभरात किती पावले चालावीत ? पहा स्वीडन विद्यापीठाचा अभ्यास काय सांगतो...

३. रक्तातील साखरेची पातळी योग्य राखण्यास मदत (Blood Sugar Regulation) :- जर आपण नाश्ता न करता मॉर्निंग वॉक करतअसाल तर त्यामुळे आपल्या साखरेच्या पातळीत बदल होऊ शकतो, जे आपल्या आरोग्यासाठी योग्य नाही. याउलट, जर आपण काहीतरी खाऊन मग मॉर्निंग वॉक करत असाल तर ते रक्तातील साखरेचे योग्यरित्या नियंत्रण ठेवण्यास मदत करते. आपण सकाळी मॉर्निंग वॉक किंवा एक्सरसाइज करण्यापूर्वी नाश्त्यात काय खात आहात याला खूप महत्त्व आहे. मॉर्निंग वॉकला जाण्यापूर्वी आपण अशा पदार्थांचा समावेश नाश्त्यात करावा, जे आरोग्यदायी आहेत आणि सहज पचतात. यात कार्बोहायड्रेट्स, प्रथिने व हेल्दी फॅट्स असणाऱ्या पदार्थांचा समावेश करावा. उदाहरणार्थ, आपण आहारात ओट्स, नट्स यासारख्या गोष्टी घेऊ शकता.

सकाळी उठल्या उठल्या ढसाढसा पाणी पिणं योग्य की अयोग्य ? आयुर्वेदिक तज्ज्ञ सांगतात, तसे करावे की नाही...

Web Title: Is it okay to go for morning walks without having breakfast first ?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.