अंघोळ करताना लघवी लागल्यासारखे वाटते किंवा स्विमिंग पूलमध्येही लघवी लागली आहे असे वाटते. अशावेळी तुम्ही काय करता? लघवी रोखून धरणे ही तुमची मोठी चूक ठरू शकते. पाण्याच्या संपर्कात बराचवेळ राहिल्यानं शरीराचं तापमान कमी होतं. यामुळे शरीर ही उष्णता बॅलेंन्स करण्यासाठी लघवीद्वारे तरल पदार्थ बाहेर फेकत असतो. या प्रक्रियेला इमरशन ड्यूरेसिस किंवा वॉटर ड्यूरेसिस (Immersion Diuresis or Water Diuresis) असं म्हणतात.
लघवीचे प्रेशर थांबवल्यानं काय होतं?
लघवीत काही बॅक्टेरीया असतात. (Bacteria Present in Urine) ज्यामुळे युरिन प्रेशर कंट्रोल करणं कठीण होतं. पण त्यामुळे युरिन इन्फेक्शन म्हणजेच युटीआय वाढण्याचा धोका असतो. हे संक्रमण ब्लॅ़डरच्या आत जाऊन नुकसान पोहोचवतं.
छातीचा आकार बेढब दिसतो, स्तन ओघळलेत? ४ सोपे व्यायाम; सुडौल, मेंटेन दिसाल
Pubmed Central वर प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात याबाबतचा धोका नमूद करण्यात आला आहे.
अंघोळ करताना लघवी रोखणं शरीराच्या कार्याच्या विरुद्ध जाण्यासारखे आहे. यामुळे हायपोथर्मियाचा धोका वाढू शकतो. यामुळे महिलांमध्ये युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (Urinary Tract Infection in Women) चा धोका वाढतो. यामुळे जळजळही होऊ शकते.
युरिन इन्फेक्शनची लक्षणं
लघवी करताना जळजळ होणं
लघवीतून दुर्गंधी
रक्तामुळे लाल लघवी होणं
पेल्विक मसल्समध्ये वेदना
सतत लघवी येणं.
जर तुम्हाला आंघोळ करताना किंवा पाण्यात लघवी (Urine Pressure) करण्याची इच्छा होत असेल तर शौचायलात जाऊन लघवी करणं योग्य ठरेल. आंघोळ करण्याआधी ब्लॅडर रिकामं करणं हा उत्तम पर्याय आहे. मेडिकल न्यूज टू डेच्या रिपोर्टनुसार दीर्घकाळापर्यंत नियमितपणे लघवी थांबवून ठेवल्याने मूत्राशय ताणू शकतो. यामुळे मूत्राशय आकुंचन पावणे आणि सामान्यपणे मूत्र सोडणे कठीण किंवा अशक्य होऊ शकते.
वजन घटवण्यासाठी भात कशाला सोडता? 'या' पद्धतीनं भात शिजवा, अजिबात वाढणार नाही वजन
जर एखाद्या व्यक्तीचे मूत्राशय ताणलेले असेल तर, कॅथेटरसारखे अतिरिक्त उपाय आवश्यक ठरू शकतात. लघवी धरून ठेवल्याने लघवीमध्ये खनिज प्रमाण जास्त आहे अशा लोकांमध्ये किडनी स्टोन तयार होऊ शकतात. लघवीमध्ये अनेकदा युरिक ऍसिड आणि कॅल्शियम ऑक्सलेट सारखी खनिजे असतात.