सध्याच्या स्थितीत वजन वाढणं ही खूपच कॉमन समस्या झाली आहे. प्रत्येकालाच टोन, मेंटेन शरीर हवं असतं. वेट लॉस करण्यासाठी हे खायंच नाही, ते खायचं नाही असं खूपजण बोलतात. भात खाल्ल्यानं वजन वाढतं, पोट बाहेर येतं असं तुम्ही खूपदा ऐकलं असेल. (Weight Loss Tips) भात ताटात घेतल्याशिवाय जेवल्यासारखं वाटत नाही. असेही अनेकजण आहे. तज्ज्ञांच्यामते वजन कमी करण्यासाठी भात खाणं सोडण्याची काहीच गरज नाही फक्त भात खाण्याची योग्य पद्धत माहित असायला हवी. (Is Rice Fattening or Weight-Loss Friendly)
भातात ग्लूटेन असतं?
तज्ज्ञांच्यामते भातामध्ये ग्लूटेन असते. असा एक समज आहे. पांढरा तांदूळ आणि तपकिरी तांदूळ दोन्ही ग्लूटेन-मुक्त धान्य आहे. तांदूळ आणि चपाती यांसारखे मुख्य अन्नपदार्थ भारतातील लोक पिढ्यानपिढ्या खात आले आहेत. वजन कमी करण्यासाठी या पदार्थांना दोष देण्याऐवजी खाण्याच्या पद्धतीकडे लक्ष द्यायला हवं. जर तुम्हाला आरोग्य आणि वजन संतुलित ठेवायचं असेल तर योग्य संयोजन, योग्यवेळी योग्य प्रमाणात खाणं गरजेचं आहे.
अंथरुणावर पडल्या पडल्या शांत झोप लागेल,जेवणानंतर करा ५ गोष्टी! सकाळी पोटही होईल साफ
पांढर्या तांदळापेक्षा ब्राऊन राईस आरोग्यदायी आहे ही सर्वात सामान्य समज आहे. तथापि, असे होत नाही कारण पांढऱ्या तांदळात फायबरचे प्रमाण कमी असते. रात्रीच्या जेवणात तुम्ही पांढरा भात खाऊ शकता आणि वजन वाढण्याची चिंता करू नका. तांदूळ पचायला सर्वात सोपं धान्य आहे.
मिक्स व्हेज खिचडी किंवा डाळ भात यांसारख्या जेवणात तूप घातल्यानं पुरेपूर फायदे मिळतात. या जेवणांमध्ये भरपूर प्रथिने आणि चांगल्या चरबी असतात. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जर तुम्ही ते रात्रीच्या जेवणासाठी भात खात असाल तर रात्रीचे जेवण आणि झोपण्याच्या वेळेत दोन तासांचे अंतर ठेवा.