आता काही दिवसात नवरात्र (Navratri) सुरु होईल. काही महिला उठता-बसता उपवास धरतात. तर काही जण नऊ दिवस उपवास धरतात. या दिवसात काही जण फळोपहार करतात, तर काही साबुदाण्याचे पदार्थ खातात. (Sabudana) साबुदाण्याची खिचडी, साबुदाणा वडा, साबुदाणा टिक्की (Sago) हे पदार्थ खाल्ल्याने पोट तर भरतेच, शिवाय चवीलाही भन्नाट लागतात.
साबुदाणा खाल्ल्याने पोट हलके होते आणि साबुदाणा वजन कमी करण्यास मदत करते असे अनेकांचे मत आहे. पण वजन कमी करण्यासाठी साबुदाणा खरंच गुणकारी आहे का? साबुदाणा खाल्ल्याने वजन वाढते की कमी होते? साबुदाणा खाण्याची नक्की योग्य पद्धत कोणती?(Is Sabudana Good for Weight Loss?).
साबुदाण्यामधील पौष्टीक घटक
हेल्थ शॉट्स या वेबसाईटनुसार, साबुदाण्यामध्ये प्रथिने, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम आढळते. साबुदाणा जरी ग्लूटेन फ्री असले तरी, त्यात कार्बोहायड्रेट्स आणि कॅलरीजचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे वजन वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वजन कमी करायचंय? मग नियमित ५ मिनिटं उड्या मारा, जंपिंग जॅक करण्याचे ४ फायदे पाहा
साबुदाणा खाल्ल्याने वजन वाढते?
साबुदाणा खाल्ल्याने आपले वजन वाढू शकते. अमेरिकेच्या कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १०० ग्रॅम साबुदाणामध्ये ३३२ कॅलरीज असतात. जे नाश्त्यातील एकूण कॅलरीजपेक्षा जास्त असू शकतात. साबुदाण्यातील कार्बोहायड्रेट्समुळे पोट गच्च भरलेले वाटते. पण जास्त कॅलरीजमुळे वजन झपाटयाने वाढू शकते.
साबुदाण्याची खिचडी खाण्याची योग्य पद्धत कोणती?
साबुदाण्यामध्ये कमी पोषक असतात. त्यामुळे साबुदाण्याची खिचडी हेल्दी करण्यासाठी आपण त्यात जास्त प्रमाणात भाज्या आणि शेंगदाणे घालून तयार करू शकता. त्यामुळे त्याचे पौष्टिक मूल्य वाढेल.
साबुदाणा खाण्याचे फायदे
उर्जेचा उत्तम स्त्रोत
साबुदाणा हे उच्च-कार्बचे उत्तम स्त्रोत आहे. साबुदाणा खाल्ल्याने शरीराला दिवसभर काम करण्याची उर्जा मिळते. ज्यामुळे थकवा जाणवत नाही.
वजन कमी करायचे तर ४ पद्धतीने करा पदार्थ, वजन घटेल झरझर
ग्लूटेन फ्री
साबुदाणा खाण्याचा आणखी एक फायदा म्हणजे त्यात ग्लुटेन नसते. यासह साबुदाणा हाडे आणि दात मजबूत करण्यास मदत करते, आणि लोहाची कमतरता टाळण्यासाठी फायदेशीर ठरते.
पचन सुधारते
साबुदाण्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे पचनाचा त्रास होत नाही. यासह बद्धकोष्ठता आणि अपचन यांसारख्या समस्या छळत नाही.