बैठी जीवनशैलीमुळे सध्या लठ्ठपणाची समस्या वाढत चालली आहे (Weight Loss). जगभरातील अनेक लोक लठ्ठपणामुळे त्रस्त आहे. याबाबतची माहिती आणि चिंता जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे. डब्ल्यूएचओच्या आकडेवारीनुसार, २०२२साली जगातील ८ पैकी १ व्यक्ती लठ्ठपणामुळे त्रस्त होती (Water Melon). म्हणून डाएट आणि व्यायामाकडे पुरेपूर लक्ष द्यायला हवे. शिवाय काही हंगामी फळे खाऊनही आपण वजन आटोक्यात आणू शकता (Fitness).
वेट लॉससाठी आपण कलिंगड खाऊ शकता. उन्हाळा सुरु आहे, शरीराला गारवा देण्यासाठी आपण कलिंगड खातो. पण यामुळे वजन देखील कमी होते, याची माहिती आपल्याला होती का? पण वेटलॉससाठी कलिंगड कधी आणि कशापद्धतीने खावे? पाहूयात(Is Watermelon Good for Weight Loss).
जास्त प्रमाणात पाणी
कलिंगडामध्ये अधिक प्रमाणात पाणी असते. त्यात सुमारे ९२ टक्के पाणी असते. एक प्लेट कलिंगड खाल्ल्याने आपले शरीर अधिक काळ हायड्रेट राहते. शिवाय पोट देखील भरलेले राहते. ज्यामुळे आपण अधिक प्रमाणात खाणं टाळतो.
लाइकोपीनचा उत्तम स्त्रोत
कलिंगडामध्ये लाइकोपीन आढळते. लाइकोपीन खरंतर एक अँटिऑक्सिडेंट आहे, जे शरीरातील चरबीची निर्मिती कमी करण्यास मदत करते. ज्यामुळे वजन करण्यास मदत होते, आणि कलिंगड हे अँटीऑक्सिडंटचा उत्तम स्त्रोत आहे.
कॅलरीजचे प्रमाण कमी
कलिंगडामध्ये पाणी जास्त आणि कॅलरीजचे प्रमाण कमी असते. ज्यामुळे कलिंगड खाल्ल्याने कॅलरीज वाढत नसून, कमी करण्यास मदत होते. शिवाय त्यात पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे पोट अधिक काळ भरलेले राहते.
नैसर्गिक गोडवा
वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी कलिंगड मदत करते. जर आपल्याला गोड खाण्याची इच्छा होत असेल तर, आपण कलिंगड खाऊ शकता. काही लोक गोड खाण्याची इच्छा झाल्यास मिठाई किंवा अधिक साखरयुक्त फळं खातात. पण हे पदार्थ न खाता आपण कलिंगड खाऊ शकता. कलिंगडामध्ये फ्रक्टोज असते. जे शरीरातील रक्तातील साखरेची पातळी न वाढवता, उर्जा प्रदान करते.
फायबर समृद्ध
कलिंगडामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. फायबरमुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. ज्यामुळे आपण अरबट-चरबट खाणं टाळतो. कलिंगड खाल्ल्याने वजन तर कमी होतेच, शिवाय पचनक्रियाही सुधारते, व पोटाचे विकार दूर राहतात.
उन बाधणारच नाही, प्या ५ घरगुती थंड पेय- पोटावरची चरबी घटेल हा बोनस
जीवनसत्त्वे आणि खनिजे समृद्ध
कलिंगडामध्ये विविध प्रकारचे जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात. त्यात पोटॅशियम, जीवनसत्त्वे ए आणि सी असते. जे आरोग्यासाठी उपयुक्त, स्नायूंचे कार्य आणि चयापचय वाढवून वजन कमी करण्यास मदत करते.