Join us  

वजन कमी करायचं म्हणून साखर बंद करुन गुळ किंवा मध खाता? आहारतज्ज्ञ सांगतात, फायद्याचं नेमकं काय..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2024 5:39 PM

Jaggery or honey which is better for weight loss : वजन कमी करण्यासाठी साखर वगळून गुळ खाता की मध?

वाढत्या वजनामुळे प्रत्येकजण त्रस्त आहे (Weight Loss). यामागे अनेक कारणे असू शकतात. खराब जीवनशैली, अपुरी झोप, आहारात बदल, फास्ट फूडचे प्रमाण वाढणे यामुळे वजन झपाट्याने वाढते (Fitness). लठ्ठपणामुळे रक्तदाब, मधुमेह आणि हृदयाचे आजार होतात (Jaggery v/s Honey). वजन वाढल्यावर आपण आहारातून चपाती, भात, गोड पदार्थ, तेलकट पदार्थ आणि मुख्य म्हणजे साखर वगळतो.

मधुमेहग्रस्त रुग्ण आणि लठ्ठ व्यक्तीला आहारातून साखर वर्ज्य करण्याचा सल्ला मिळतो. त्याऐवजी गुळ किंवा मध खाण्याचा सल्ला दिला जातो. पण मग आरोग्यासाठी गुळ चांगले की मध? वजन कमी करताना गुळ खावे की मध?(Jaggery or honey which is better for weight loss).

बच्चन कुटुंबात वाढदिवसाला करतात तो मिल्क केक असतो कसा? पाहा रेसिपी-हव्या फक्त ३ गोष्टी

मध खाण्याचे फायदे

नैसर्गिक गोडव्यासाठी आपण साखर ऐवजी मध खातो. वजन कमी करण्यासाठी लोक कोमट पाण्यात मध घालून पितात. मधामध्ये इलेक्ट्रोलाइट्स आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. जे शरीराला डिटॉक्सिफाय करतात. मधामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. याशिवाय मध त्वचा आणि हृदयासाठीही उत्तम मानले जाते.

कतरिना कैफही डाएटमध्ये आवडीने खाते लाल रंगाचे हे सूपरफूड, स्वस्तात मस्त-वजनही घटेल

गुळ खाण्याचे फायदे

नैसर्गिक गोडव्यासाठी गुळ हा उत्तम पर्याय आहे. गुळाचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, ज्यामुळे मधुमेहग्रस्त रुग्णही मर्यादित प्रमाणात खातात. गुळामध्ये लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम, खनिजे आणि अँटी-ऑक्सिडंट्स आढळतात. गुळ खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती आणि हिमोग्लोबिन वाढते.

वजन कमी करण्यासाठी गुळ उत्तम की मध?

आहारतज्ज्ञ स्वाती सिंह यांच्या मते, 'वजन कमी करण्यासाठी मध आणि गुळ हे दोन्ही पर्याय उत्तम आहेत. दोन्हींमध्ये कॅलरीचे प्रमाण कमी आणि नैसर्गिक स्वीटनर आहेत. साखरेऐवजी आपण गुळ किंवा मध खाऊ शकता. पण दोन्ही गोष्टी मर्यादित प्रमाणात खायला हवे. बऱ्याचदा दोन्हींमध्ये भेसळ असते. त्यामुळे नैसर्गिक गुळ आणि मधाचा वापर करावा.

टॅग्स :वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्स