तूप (Ghee) हा शब्द ऐकताच अनेकांना वजन वाढेल की काय अशी भीती वाटू लागते. पण तूप वजन वाढीसाठी नसून वजन कमी करण्यास यासह इतर आरोग्यदायी फायद्यांसाठी प्रभावी ठरते. सकाळची सुरुवात एक चमचा तुपाने केल्याने आरोग्यावर (Health Benefits of Ghee) अनेक चमत्कारी फायदे घडू शकतात. बरेच कलाकार आपल्या सकाळची सुरुवात एक चमचा तुपाने करतात. ज्यात अभिनेत्री जान्हवी कपूरचा (Janhvi Kapoor) देखील समावेश आहे. जान्हवी आपल्या फिटनेससाठी ओळखली जाते. तिची सुडौल शरीर प्रत्येकाला वजन कमी करण्यास प्रोत्साहित करते.
शिवाय तिच्या चमकदार (Glowinf Skin) चेहऱ्यामागचं रहस्य काय? असाही प्रश्न चाहत्यांना पडतो. चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो, वजन कमी करणे (Weight Loss) यासह इतर आरोग्यदायी फायदे हवे असतील तर, जान्हवीने एका मुलाखतीत एक चमचा तूप खाण्याचा सल्ला दिला आहे. जान्हवीचं नसून, शिल्पा शेट्टी, रकुल प्रीत सिंह, मलायका अरोरा यासह इतर कलाकार आपल्या दिवसाची सुरुवात एक चमचा तुपाने करतात(Janhvi Kapoor Has 1 Tsp Ghee Every Morning, Here's Why You Should Too).
तुपातील पौष्टीक घटक
भारतीय घरांमध्ये तुपाचा वापर सर्रास होतो. विविध पदार्थांमध्ये तुपाचा वापर हमखास केला जातो. तुपात अनेक पौष्टीक घटक असतात. त्यात जीवनसत्त्वे ए, डी, ई, के इ. ओमेगा ३ आणि ओमेगा ६ फॅटी अॅसिड सारखी काही निरोगी फॅटी अॅसिड असतात. जे शरीराला दिवसभर काम करण्याची उर्जा देतात.
डाळ शिजताना त्यावर फेस तयार होतो? आरोग्यासाठी चांगला की वाईट? ठेवावा की फेकून द्यावा?
पचनक्रिया सुधारते
तूप प्रोटीन, अँटिऑक्सिडंट्स, हेल्दी फॅट्स, यासह खनिजांनी समृद्ध असतात. सकाळी एक चमचा तूप खाल्ल्याने सिस्टम डिटॉक्सिफाय होते. ज्यामुळे शरीरात नवीन सेल्स निर्माण होतात. सकाळी रिकाम्या पोटी एक चमचा तूप खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते. यासह बद्धकोष्ठता आणि मूळव्याध यांसारख्या समस्या टाळण्यास मदत होते.
हृदयाचे आरोग्य सुधारते
हृदय निरोगी राहावे असे वाटत असेल तर, नियमित तूप खा. बाजारातील तूप आणून खाण्यापेक्षा घरात ताजे तूप तयार करा. तूप हे संतृप्त चरबीचा उत्तम स्रोत आहे. योग्य प्रमाणात तूप खाल्ल्याने शरीरातील गुड कोलेस्टेरॉल वाढते, ज्यामुळे नसांमधून रक्तप्रवाह उत्तमरित्या चालते.
त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर
'खा तूप येईल रूप' ही म्हण तर आपण ऐकलीच असेल. नियमित तूप खाल्ल्याने त्वचा हायड्रेट होणे, मुरुमांचे डाग हलके होणे, डार्क सर्कलचे डाग कमी करणे, यासह फाटलेल्या ओठांवर प्रभावी ठरते. मुख्य म्हणजे स्काल्प देखील हायड्रेट करते. ज्यामुळे स्काल्पमध्ये ब्लड सर्क्युलेशन सुधारते, व टाळूला पोषण देऊन केसांची वाढ उत्तेजित करते.
तोंडाचा ताबा सुटतो? चॉकलेट-आइस्क्रीम खाऊनही वजन कमी होते, व्हॉल्यूमेट्रिक डाएटचा नवा फंडा
वाढते उर्जा
तूप हा उर्जेचा उत्तम स्त्रोत आहे. त्यात मध्यम- आणि शॉर्ट-चेन फॅटी अॅसिड असतात, ज्यापैकी लॉरिक अॅसिड एक शक्तिशाली बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आहे. यासाठी सकाळी नियमित रिकाम्या पोटी एक चमचा रवाळ तूप खाणे आवश्यक आहे.
वजन कमी करण्यास मदत
तूप दीर्घकाळ भूक नियंत्रित ठेवते, ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. नियमित सकाळी चमचाभर तूप खाल्ल्याने मेटॅबॉलिझम सुधारते. ज्यामुळे वजन आटोक्यात येते. शिवाय अतिरिक्त चरबी वाढत नाही.