Lokmat Sakhi >Fitness > परफेक्ट डाएट, परफेक्ट फिटनेससाठी सोपी वन-टू-थ्री मेथड ! अघोरी आचरट उपाय सोडा, फिट व्हा!

परफेक्ट डाएट, परफेक्ट फिटनेससाठी सोपी वन-टू-थ्री मेथड ! अघोरी आचरट उपाय सोडा, फिट व्हा!

तुमचं डाएट ८० टक्के तुमच्या सध्याच्या खाण्याच्या सवयींशी जुळत असेल तरच तुम्ही ते दीर्घ काळासाठी करू शकाल आणि त्यातून टिकतील असे ‘रिझल्टस’ तुम्हाला मिळू शकतील.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:03 PM2021-04-20T16:03:30+5:302021-04-20T16:12:32+5:30

तुमचं डाएट ८० टक्के तुमच्या सध्याच्या खाण्याच्या सवयींशी जुळत असेल तरच तुम्ही ते दीर्घ काळासाठी करू शकाल आणि त्यातून टिकतील असे ‘रिझल्टस’ तुम्हाला मिळू शकतील.

jordan syatt 123 method, simple diet, change your habbits and try to be fit & happy. | परफेक्ट डाएट, परफेक्ट फिटनेससाठी सोपी वन-टू-थ्री मेथड ! अघोरी आचरट उपाय सोडा, फिट व्हा!

परफेक्ट डाएट, परफेक्ट फिटनेससाठी सोपी वन-टू-थ्री मेथड ! अघोरी आचरट उपाय सोडा, फिट व्हा!

Highlightsतीस दिवसांपैकी जर तुम्ही पंचवीस दिवस करू शकलात तर तुम्ही तुमच्या सवयी बदलत आहेत आणि या वजन कमी करण्याच्या दिशेने तुम्ही पाहिलं पाऊल टाकलाय अस नक्की समजा. 

-स्वप्नाली बनसोडे

तुम्हालाही वजन कमी करायचंय? पण मग कृपा करून अगदी टोकाचे डाएट जसं की अजिबात काहीच खायचं नाही किंवा अगदी थोडंसंच खायचं असे उपाय करायला जाऊ नका. कारण असे शॉर्टकट्स दीर्घकाळ टिकणारे परिणाम देऊ शकणार नाही, उलट शरीरावर दुष्परिणाम करतील. हे असे टोकाचे उपाय तुम्ही जास्त काळ करूही शकणार नाही. लाभ कमी तोटेच जास्त होतील.
आपण पाहतो की वाढलेलं वजन आणि त्यातून उद्भवणाऱ्या समस्यांमुळे बहुतांश लोक, विशेषत: स्त्रिया त्रस्त असतात. त्यात आजूबाजूला इतकी चुकीची माहिती उपलब्ध असते की, नेमकं काय करावं हे समजत नाही. म्हणूनच तुम्ही स्वतः असं वजन कमी करु इच्छित असाल किंवा अश्या काही लोकांना ओळखत असाल, जे ‘डाएटिंग’ हा प्रकार फार काळ करू शकत नाहीत तर विचार करा, नेमकं चुकतं कुठं?
 सर्वसाधारणपणे हे असतं, की ही डाएट्स एक तर खूप टोकाची अघोरी म्हणजे काही खायचंच नाही अशी असतात किंवा त्यात खूप पथ्य असतात. आता ‘नव्याचे नऊ दिवस’ म्हणून उत्साहाने लोक काही दिवस अशी डाएट्स करतात. पण दीर्घ काळासाठी दैनंदिन जीवनात हे डाएट तुम्ही नियमित नाही करू शकत, उदारणार्थ किटो डाएट. होतं असं की किटो डाएट मध्ये जास्त फॅट्स आणि प्रथिने खायची असतात, आणि कार्बोहायड्रेटस किंवा कर्बोदके नसतात. पण भारतीय जीवनशैली मध्ये दीर्घ काळासाठी कर्बोदके अजिबात न खाणे हे शक्य नाहीये. आता मला हे ही माहिती आहे की वाचकांमध्ये किटो करणारे किंवा आवडणारे अनेक असतील. मतितार्थ इतकाच आहे तुम्ही त्या डाएटवर प्रदीर्घ काळ टिकून राहणार असाल तर नक्की ते डाएट करा. 

मात्र फक्त किटोच वजन कमी करायला मदत करतो, हा गैरसमज आहे. तुम्ही कोणतंही डाएट जरी निवडलंत तरी तुम्ही जेंव्हा कॅलरी डेफिसिट म्हणजेच म्हणजे गरजेपेक्षा कमी कॅलरीज आहारातून घेताय, आणि त्याहून अधिक तुम्ही कॅलरीज तुम्ही दिवसभरात खर्च करताय, तर तुमचे वजन कमी होईलच, मग ते कोणतंही डाएट असो.
फिटनेसच्या क्षेत्रात जर तुम्ही नवखे असाल आणि तुम्हाला वजन कमी करण्यासाठी कुठे सुरूवात करायची हे समजत नसेल तर, म्हणूनच आज आज आपण बोलणार आहोत याविषयी. 


याला आपण म्हणूया १, २, ३ पद्धत.

जॉर्डन स्यात ह्या प्रसिद्ध आहारतज्ज्ञ या पद्धतीचा जनक. त्यांनी सामान्यांसाठीच ही पद्धत सुरू केली. आता हीच पध्दत भारतीय जीवनशैलीला साजेशी होईल ह्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे. 
१. या पद्धतीनुसार तुम्हाला एक मोठा बाऊल सलाड, दोन फळांचे तुकडे आणि तीन बॉटल पाणी हे खाल्लंच पाहिजे. 
२. आता किती मोठं सलाड किंवा कोणत्या भाज्या हे काही ठरलेलं नाहीये. उद्देश हा आहे की भाज्या खाण्याची सवय लागायला हवी. आता खाण्याच्या सवयीनुसार तुम्हाला सलाड आवडत नसेल तर सलाड, किंवा त्याची भाजी बनवून खा किंवा सूप किंवा कोशिंबीर तुम्हाला जसं आवडेल तसं खा, पण रोज भाज्या खायची सवय लावूया.
३. त्यात दोन ते तीन दिवस किमान हिरव्या पालेभाज्या असायला हव्यात. 
४. दोन फळांचे तुकडे, भाज्या आणि फळं खूप सहज उपलब्ध होऊ शकणाऱ्या पौष्टिक गोष्टी आहेत . 
५. ही किती छोटीशी गोष्ट आहे खरं तर, चांगल्या आरोग्यासाठी सवयी लावायच्या तर त्या सहज पाळता येण्याजोग्या आणि साध्या सोप्या असायला हव्यात, तरच त्या आपण दीर्घकाळ अंमलात आणू शकतो आणि तरच तुमच्या शरीरात काही आरोग्यदायी बदल घडू शकतात. 
६. यातली शेवटची छोटी सवय म्हणजे ३ बाटल्या पाणी पिणे. किती पाणी, किती मोठी किंवा छोटी बाटली हा प्रश्न नाहीये पाणी नित्यनेमाने प्यायचं ही सवय लावायची आहे. यात लक्षात ठेवा, तुम्हाला कसल्याही आरोग्याच्या तक्रारी असतील किंवा तुमच्या डॉक्टरांनी पाणी किती प्यावं किंवा कुठल्या भाज्या अथवा फळं टाळावीत, असा काही सल्ला दिला असेल तर कृपया तो पाळावा.
७. जेंव्हा ह्या छोट्या सवयी आपण यशस्वीपणे अवलंबवू शकुत तरच ,पुढे आणखीन विशिष्ट डाएट वर आपण टिकू शकुत. जर आपण सावकाश सुरूवात करतोय आणि छोटे बदल अंमलात आणतोय तेंव्हा तुम्हाला आत्माविश्वास निर्माण होईल की हे मी नक्की करू शकेन. 
८. पुढच्या वेळेस कोणतंही डाएट सुरु करण्याआधी स्वतःला हे नक्की विचारा - हे डाएट मी इथून पुढे किमान एक वर्ष करू शकते का? ह्याचं उत्तर ‘हो’ असेल तरंच ते डाएट तुम्ही यशस्वीपणे करू शकाल. जर
९. तुमचं डाएट ८० टक्के  तुमच्या सध्याच्या खाण्याच्या सवयींशी जुळत असेल तरच तुम्ही ते दीर्घ काळासाठी करू शकाल आणि त्यातून टिकतील असे ‘रिझल्टस’ तुम्हाला मिळू शकतील. 
१०. ह्या सोप्या सवयी सोबत कोणताही एक आवडीचा व्यायाम मग तो १० मिनिटांचा का? असेना चालणं, डान्स, योगा, एखादा खेळ हे आठवड्यातले जितके दिवस शक्य आहे तितके दिवस जरूर करा. मात्र ठरवलंय तितके दिवस हे व्हायलाच हवं, भले ते चार दिवस का? असेना.
११. हे सगळे बदल करताना तुम्ही किती नियमित आहेत हे नक्की ट्रॅक करा. हे छोटे बदल जर तुम्ही एक दिवस नीट पाळले तर त्या दिवसाला कॅलेंडरवर लाल टिकमार्क करा. आणि ज्यादिवशी तुम्ही हे करू शकला नाहीत त्यादिवशी लाल फुली. तीस दिवसांपैकी जर तुम्ही पंचवीस दिवस करू शकलात तर तुम्ही तुमच्या सवयी बदलत आहेत आणि या वजन कमी करण्याच्या दिशेने तुम्ही पाहिलं पाऊल टाकलाय अस नक्की समजा. 
१२. लक्षात ठेवा, वर सांगितलेले बदल उत्तम सवयी लावण्यासाठी आहेत आणि हे कुठल्याही विशिष्ट प्रकारचं डाएट नाही. ह्या विषयावर आणखीन सविस्तर आपण बोलणार आहोत. तोवर किमान हे फॉलो करायला सुरूवात करा.


(लेखिका अमेरिकािस्थित डाएट आणि फिटनेस एक्सपर्ट आहेत.)
Instagram- the_curly_fit
https://www.facebook.com/fittrwithswapnali

Web Title: jordan syatt 123 method, simple diet, change your habbits and try to be fit & happy.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.