Join us  

42 व्या वर्षीही तरूण दिसणाऱ्या जुही परमारचं फिटनेस सिक्रेट; 'अशी' राहते फिट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2023 10:11 AM

Juhi Parmar Fitness Secrets : वेळेअभावी अनेक महिला रोज व्यायाम करू शकत नाहीत. अशा स्थितीत फिजिकल एक्टिव्हीज पूर्णपणे बंद ठेवण्यापेक्षा तुम्ही स्वत:ला मेटेंन ठेवण्यासाठी डान्स वर्कआऊट करू शकता.

टेलिव्हिजनवर जवळपास ७ वर्षांपर्यंत चालणारी मालिका कुमकम- एक प्यारा सा बंधन. ही सगळ्यांच्याच कायम आठवणीत राहील या मालिकेतून अभिनेत्री जुही परमारला (Juhi Parmar) वेगळी ओळख मिळाली.  जुही आजही लोकांच्या मनावर राज्य करते. एका मुलीची आई असूनही ती  वयाच्या ४२ व्या वर्षी फिट दिसते. महिला तिचा फिटनेस आणि सुंदरतेच्या चाहत्या आहेत. तिच्यासारखं दिसण्याची अनेकांची इच्छा असते. (Juhi Parmar Fitness Secrets)

जुही एक अभिनेत्री असण्याबरोबर इंफ्लएंसरही आहे. इंस्टाग्रामवर ती नेहमीच हेल्थ, न्युट्रिशन आणि एक्सरसाईजचे व्हिडिओ अपलोड करते. ती आपली हेल्थ आणि फिटनेसकडे पुरेपूर लक्ष देते. जुही परमारचे  सोपे फिटनेस सिक्रेट्स समजून घेऊया. चांगल्या आरोग्यासाठी आणि आजारांना रोखण्यासाठी  फिट राहणं गरजेचं आहे.

चांगल्या आरोग्यासाठी आणि आजारांना रोखण्यासाठी फिट राहणं गरजेचं आहे. बॅलेंन्स डाएट आणि हेल्दी लाईफस्टाईलनं तुम्ही  शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेऊ शकता. यामुळे एनर्जी लेव्हल वाढून अनेक आजारांचा धोकाही टळतो. वेळेअभावी अनेक महिला रोज व्यायाम करू शकत नाहीत. अशा स्थितीत फिजिकल एक्टिव्हीज पूर्णपणे बंद ठेवण्यापेक्षा तुम्ही स्वत:ला मेटेंन ठेवण्यासाठी डान्स वर्कआऊट करू शकता.

डान्स करताना तुम्ही एक्टीव्ह आणि हेल्दी राहू शकता. अभिनेत्री जुही काही दिवसांपूर्वी असाच डान्स वर्कआऊट करताना दिसली. तिनं व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडियोच्या कॅप्शनमध्ये जुहीनं लिहिलं की, जेव्हा तुम्ही वर्कआऊट करू इच्छित नाही.  तेव्हा तुम्हाला डान्स एक्टीव्ह ठेवतो.

डान्स करण्याचे फायदे

डान्स हा महिलांसाठी बेस्ट वर्कआऊट आहे.  ज्यामुळे फिटनेस लेव्हल सुधारते. डान्स कार्डिओवॅस्क्यूलर वर्कआऊट आहे. ज्यामुळे हार्ट रेट आणि श्वासांची गती सुधारते आणि कॅलरीज बर्न होण्यास मदत होते. डान्स करून तुम्ही  ३० मिनिटात २०० ते ४०० कॅलरीज बर्न करू शकता. यामुळे संपूर्ण शरीरातील ब्लड सर्क्युलेशन सुधारण्यास मदत होते. 

बॅटल रोप व्यायामाचे फायदे

या व्यायामानं कमीत वेळात संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. यामुळे मेटाबॉलिड्म रेट वाढतो. वजन वेगानं कमी होते आणि शरीर टोन राहते.  स्नायू बळकट होतात आणि कॅलरीज बर्न होतात. या व्यायामाच्या मदतीनं तुम्ही पाय, गुडघे, हिप्स आणि हातांचे मसल्स मजबूत बनवू शकता.

टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्य