Join us  

Workout tips: मुलांप्रमाणे तुम्हालाही वाटतं ट्रॅम्पोलिनवर उड्या माराव्यात? मुळीच लाजू नका, बिंधास्त मारा!! कारण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2022 3:21 PM

Fitness tips: पुन्हा लहान होऊन ट्रॅम्पोलिनवर उड्या माराव्या वाटतात, मग मारा ना... ते ही अजिबात न लाजता... 

ठळक मुद्देट्रॅम्पोलिनवर जम्पिंग हा कार्डिओ वर्कआऊटचा एक उत्तम आणि अतिशय मजेशीर प्रकार आहे.

शाळा, बगिचा, मॉल किंवा एखादं डे केअर.. या प्रत्येक ठिकाणीच आजकाल लहान मुलांसाठी ट्रॅम्पोलिन (Jumping on trampoline) दिसून येतं. त्यालाच काही ठिकाणी जम्पिंग बेड असंही म्हणतात. या बेडवर लहान मुलं चढतात आणि मस्त  उड्या मारतात. या बेडवर उड्या मारल्या की तो बाऊन्स होतो आणि मुलं मग आणखी उंच उडाल्याप्रमाणे होतात. त्यामुळेच तर ही खेळणी लहान मुलांची अगदी आवडीची असते..

 

ट्रॅम्पोलिनवर मुलांना असं मनसोक्त हुंदडताना पाहून मोठ्या माणसांनाही त्यांचा हेवा वाटू लागतो. वय विसरून आपणही ट्रॅम्पोलिनवर उड्या मारण्याचा आनंद घ्यावा असं खूप खूप वाटतं. पण असं काय मुलांसारखं उड्या मारणार, असं म्हणून आपण लाजतो.. पण असं लाजू नका. उड्या माराव्या वाटल्या तर बिंधास्त मारा आणि तुमच्या मुलांनाही ट्रॅम्पोलिनवर खेळायला आवडत असेल, तर त्यांनाही कधी अडवू नका.  कारण व्यायामाचा हा नवा फंडा आहे, असं सांगतेय अभिनेत्री भाग्यश्री (actress Bhagyashree). 

 

आपल्याला माहितीच आहे की भाग्यश्री सोशल मिडियावर चांगलीच ॲक्टीव्ह असते. तिने नुकतीच एक इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली असून यामध्ये ती ट्रॅम्पोलिनवर खेळण्याचे फायदे समजावून सांगत आहे. माझी नवी खेळणी तुम्हाला दाखवते, असं म्हणत तिने तिच्या चाहत्यांना ट्रॅम्पोलिन दाखवलं आहे. ती म्हणते की ट्रॅम्पोलिनवर खेळणे हा blood circulation सुधारण्याचा एक उत्तम पर्याय आहे. ट्रॅम्पोलिनवर जम्पिंग हा कार्डिओ वर्कआऊटचा एक उत्तम आणि अतिशय मजेशीर प्रकार आहे. हे सांगतानाच तिने ट्रॅम्पोलिनवर उड्या मारण्याचे अनेक फायदे सांगितले आहेत. 

 

ट्रॅम्पोलिनवर उड्या मारण्याचे फायदे (benefits of trampoline jump)१. कार्डिओ वर्कआऊटचा हा एक उत्तम प्रकार आहे.२. स्पायनर कॉर्डवरचा ताण कमी करण्यासाठी मदत होते.३. या व्यायामामुळे मनावरचा ताण कमी होतो.४. बोन डेन्सिटी वाढविण्यासाठी हा व्यायाम उपयुक्त आहे. ५. शरीराची balancing power वाढविण्यासाठी हा व्यायाम चांगला आहे.६. कंबरेचे स्नायू मजबूत होण्यासाठी हा व्यायाम करावा. 

Get on the Mat, मलायका अरोरा विचारतेय; आज योगासने केली का? तिच्यासारखी फिगर हवी तर..

कुणी किती वेळ करावा हा व्यायाम- ट्रॅम्पोलिनवर कुणी किती वेळ व्यायाम करावा, हे देखील भाग्यश्रीने सांगितलं आहे. ती सांगते की सुरुवातीला हा व्यायाम अर्धा ते पाऊण मिनिटेच करावा. त्यानंतर दर आठवड्याला व्यायामाची वेळ वाढवत नेऊन तो २ मिनिटांपर्यंत वाढवावा.   

टॅग्स :फिटनेस टिप्सआरोग्यव्यायामभाग्यश्री