Join us

फक्त १० मिनिटांचा १ व्यायाम! मांड्या आणि पोटावरची चरबी होईल महिनाभरात कमी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2022 08:10 IST

How to Burn Belly Fat, Thigh Fat and Hips Fat: व्यायामाचा कंटाळा येतो ना, मग हा एकच व्यायाम करा... मांड्या, पोट आणि हिप्सवरील चरबी होईल कमी.

ठळक मुद्देपोटावरची, मांडीवरची आणि हिप्सवरची चरबी कमी करण्यासाठी एकच सोपा व्यायाम (exercise) आणि तो ही फक्त १० मिनिटांचा मिळाला, तर क्या बात है...

आवडीच्या पदार्थांवर आपण यथेच्छ ताव मारतो. पण नंतर मात्र सुटलेलं पोट, हिप्स, मांड्या आणि कंबरेवरची वाढलेली चरबी ( Belly Fat, Thigh Fat and Hips Fat) याची चिंता करत बसतो. त्यात पुन्हा व्यायामाचा जाम कंटाळा येतो. अर्धा- एक तास जीममध्ये घालवायला किंवा योगा, सायकलींग, रनिंग असे इतर व्यायाम (How ) करायला काही जणांना तर खरोखरच वेळही नसतो. मग अशावेळी पोटावरची, मांडीवरची आणि हिप्सवरची चरबी कमी करण्यासाठी एकच सोपा व्यायाम (exercise) आणि तो ही फक्त १० मिनिटांचा मिळाला, तर क्या बात है...

 

असाच एक सोपा आणि मस्त व्यायाम इन्स्टाग्रामच्या sumanhealthcity या पेजवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये असं सांगितलं आहे की सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही तुमच्या वेळेनुसार हा व्यायाम करू शकता. व्यायाम करण्यासाठी १० मिनिटांचा वेळ मात्र राखून ठेवा. दररोज नियमितपणे फक्त १० मिनिटांसाठी हा एकच व्यायाम जरी केला तरी महिनाभरातच तुम्हाला पोट, मांड्या, कंबर आणि हिप्स या भागात इंचेस लॉस, वेटलॉस झाल्यासारखं जाणवेल. 

 

कसा करायचा व्यायाम?१. हा व्यायाम करण्यासाठी सगळ्यात आधी जमिनीवर योगा मॅट किंवा सतरंजी टाकून बसा. दोन्ही पाय लांब करा आणि ताठ बसा.

गॅस बर्नरच्या आजुबाजुला काळपट डाग पडले? २ उपाय, डाग होतील स्वच्छ- गॅस चमकेल नव्यासारखा

२. यानंतर एक पाय गुडघ्यात दुमडून उभा करा आणि शक्य तेवढा पोटाजवळ ओढून घ्या. दोन्ही हातांनी हा पाय पकडून ठेवा. यानंतर दुसरा पाय जो पुढे लांब केलेला आहे, तो जमिनीपासून थोडा वर उचला.

अशी कंजूस बहीण बाई! भावाला आइस्क्रिम खावू घालायचं म्हणून ७- ८ दुकानं फिरवले पण..

३. वर उचलल्यानंतर डावीकडून उजवीकडे आणि उजवीकडून डावीकडे अशा पद्धतीने हा पाय फिरवा. दोन्ही बाजूंनी शक्य तेवढा पाय नेण्याचा प्रयत्न करावा. दोन्ही बाजूने प्रत्येकी १०- १० वेळा झाल्यानंतर हा पाय खाली ठेवा आणि दुसऱ्या पायाने अशाच पद्धतीने व्यायाम करा.

४. एकेक करून दोन्ही पायांनी १० मिनिटांमध्ये जेवढ्या वेळा होईल तेवढ्या वेळा हा व्यायाम रिपिट करावा. 

 

टॅग्स :फिटनेस टिप्सव्यायाम