Lokmat Sakhi >Fitness > बाक काढून उभे राहता- बसता? १ व्यायाम करून पाहा, बॉडी पोश्चर सुधारण्यास होईल मदत

बाक काढून उभे राहता- बसता? १ व्यायाम करून पाहा, बॉडी पोश्चर सुधारण्यास होईल मदत

How to Reduce Hunchback: बाक काढून उभं राहण्याच्या- बसण्याच्या सवयीचा परिणाम तुमच्या पर्सनॅलिटीवर होतो. अनेकांचा आत्मविश्वासही कमी होतो. म्हणूनच ही सवय सोडायची तर असा प्रयत्न करून बघा....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2023 08:07 AM2023-01-15T08:07:29+5:302023-01-15T08:10:02+5:30

How to Reduce Hunchback: बाक काढून उभं राहण्याच्या- बसण्याच्या सवयीचा परिणाम तुमच्या पर्सनॅलिटीवर होतो. अनेकांचा आत्मविश्वासही कमी होतो. म्हणूनच ही सवय सोडायची तर असा प्रयत्न करून बघा....

Just 1 exercise to improve body posture, How to reduce hunchback? Exercise for reducing hunchback | बाक काढून उभे राहता- बसता? १ व्यायाम करून पाहा, बॉडी पोश्चर सुधारण्यास होईल मदत

बाक काढून उभे राहता- बसता? १ व्यायाम करून पाहा, बॉडी पोश्चर सुधारण्यास होईल मदत

Highlightsअशा पद्धतीने चालणं, उभं राहणं, बसणं आपल्या व्यक्तिमत्त्वासाठी अतिशय मारक ठरतं. म्हणूनच ही सवय सोडून द्यायची तर अगदी आतापासूनच या व्यायामाला लागा.

सतत चुकीच्या पद्धतीने बसल्यामुळे किंवा उभं राहिल्यामुळे अनेकांचं बॉडी पोश्चर खराब होतं. काही जणं मोठ्या आजारातून उठतात. अशावेळी अंगातली ताकद कमी झालेली असते. त्यामुळे मग पाठीत थोडासा बाक येतो (Exercise for reducing hunchback). नंतर आजार बरा होतो, पण बाक काढून चालण्याची, उभं राहण्याची किंवा बसण्याची सवय मात्र जात नाही. वारंवार त्याच अवस्थेत राहिल्याने पाठ गोलाकार दिसू लागते. अशा पद्धतीने चालणं, उभं राहणं, बसणं आपल्या व्यक्तिमत्त्वासाठी अतिशय मारक ठरतं. म्हणूनच ही सवय सोडून द्यायची तर अगदी आतापासूनच या व्यायामाला लागा.(Just 1 exercise to improve body posture)

पाठीला आलेला बाक घालविण्यासाठी व्यायाम
१. व्यायामाचा हा प्रकार इन्स्टाग्रामच्या postureguymike या पेजवर शेअर करण्यात आला आहे.

ब्लाऊजचा- ड्रेसचा समाेरचा गळा जास्त मोठा झाला? २ उपाय -गळा दिसेल लहान, फिटिंग होईल परफेक्ट

२. हा व्यायाम करण्यासाठी एका खुर्चीची मदत घ्यावी लागेल.

३. सगळ्यात आधी जमिनीवर योगा मॅट किंवा सतरंजी टाका आणि पाठीवर झोपा. 

 

४. खुर्ची अगदी तुमच्या शरीराजवळ असावी. त्यानंतर दोन्ही पाय उचला आणि खुर्चीवर ठेवा. हिप्स ते गुडघे आणि गुडघ्यांपासून तळपाय यांच्यात बरोबर काटकोन असावा, अशा पद्धतीने पाय ठेवा. 

रक्तदाब नियंत्रित ठेवणारे ५ पदार्थ, तब्येतीला जपायचं तर.... वाचा आहारतज्ज्ञांचा सल्ला

५. आता दोन्ही तळहात एकमेकांत गुंफून घ्या आणि छातीच्या वर सरळ रेषेत ठेवा. यानंतर असेच हात मागे घ्या आणि डोक्याच्या मागे जमिनीवर टेकवा. त्यानंतर पुन्हा सरळ रेषेत समोर आणा.

६. ही क्रिया किमान २५ वेळा करा. 

 

Web Title: Just 1 exercise to improve body posture, How to reduce hunchback? Exercise for reducing hunchback

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.