Join us  

फक्त डाएट किंवा फक्त व्यायाम करताय? नाहीच होणार वजन कमी , रिसर्चचा खुलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2021 3:11 PM

वजनावर व्यायाम आणि आहाराचा कसा परिणाम होतो याबाबतचा अभ्यास झालेला आहे. हा अभ्यास सांगतो की वजन कमी करण्यासाठी नियमित व्यायाम आणि आहार दोन्हीही आहे महत्त्वाच.

ठळक मुद्देआपण दिवसभरात किती उष्मांक सेवन केले आणि शरीरातले किती उष्मांक जळाले ही बाब वजनावर परिणाम करते. 80 टक्के आहार आणि 20 टक्के व्यायाम याद्वारे आपण वजन कमी आणि नियंत्रित करु शकतो.अभ्यास सांगतो की जर नियमित व्यायाम केला पण अधिक उष्मांक असलेला आहार घेतला तर व्यायामामुळे शरीरातील केवळ एक टक्का उष्मांकच जळतील.

 

आधुनिक जीवनशैलीचा नकारात्मक परिणाम म्हणजे वाढत्या वजनाची समस्या. वजन वाढल्यानं मग इतर व्याधीही चिकटतात. वजन वाढतं पटकन पण ते कमी करणं अतिशय अवघड जातं. अनेकजण तर वजन कमी करण्यासाठी औषधं, शस्त्रक्रिया हा मार्गही निवडतात. तर अनेकजण व्यायाम आणि आहार या दोघांचाही हात धरुन वजन कमी करु पाहातात. वजन कमी करण्यात व्यायाम आणि आहार या दोघांचीही भूमिका महत्त्वाची आहे. पण अनेकांना व्यायामापेक्षा आहार महत्त्वाचा वाटतो. केवळ डाएटिंग करुन वजन घटवू असा विश्वास त्यांना वाटतो. पण डाएटिंगचे कितीही अवघड नियम पाळले तरी वजन कमी होत नाही. वजनावर व्यायाम आणि आहाराचा कसा परिणाम होतो याबाबतचा अभ्यास झालेला आहे. हा अभ्यास सांगतो की वजन कमी करण्यासाठी नियमित व्यायाम आणि आहार दोन्हीही महत्त्वाचं आहे. वजन कमी करण्यासाठी केवळ नियमित भरपूर व्यायाम महत्त्वाचा हे मानणारे अनेकजण आहाराकडे दुर्लक्ष करतात. काहीबाही खातात. अभ्यासक म्हणतात की असा चुकीचा आहार घेऊन नियमित व्यायाम करणारे आपली व्यायामाची मेहनत वाया घालवतात.

आपण दिवसभरात किती उष्मांक सेवन केले आणि शरीरातले किती उष्मांक जळाले ही बाब वजनावर परिणाम करते. 80 टक्के आहार आणि 20 टक्के व्यायाम याद्वारे आपण वजन कमी आणि नियंत्रित करु शकतो. पण अभ्यासक म्हणतात की आहार म्हणजे योग्य, आरोग्यदायी आहार हा वजन कमी करण्यासाठी महत्त्वाचा असतो. असा आहार ज्यात प्रथिनं जास्त असतील आणि कबरेदकं आणि फॅटस अगदीच कमी किंवा प्रमाणात असतील. केवळ व्यायाम किंवा केवळ डाएटिंग यामुळे वजन कमी होत नाही असं अभ्यासक सांगतात.

 

 

अभ्यास सांगतो की जर नियमित व्यायाम केला पण अधिक उष्मांक असलेला आहार घेतला तर व्यायामामुळे शरीरातील केवळ एक टक्का उष्मांकच जळतील. आपण जे अन्न खातो ते पचवण्यासाठी शरीराद्वारे 10 टक्के उष्मांक वापरले जातात. याचा अर्थ अशा परिस्थितीत केवळ 10 ते 30टक्केच उष्मांक शारीरिक क्रियेतून जाळले जातात. आणि उरलेले उष्मांकाचं मग मेदात रुपांतर होतं. म्हणूनच आपण व्यायाम किती करतो हे जितकं महत्त्वाचं तितकंच आपण काय आणि किती खातो हे देखील महात्त्वाचं आहे.  व्यायाम आणि आहार या दोन्हीचे नियम पाळले तर अपेक्षेनुसार वजन कमी होतं. योग्य आहारातून आपल्या शरीरास आवश्यक तेवढेच उष्मांक जातात आणि व्यायामाद्वारे शरीरात उरणारे जास्तीचे उष्मांक जळून जातात.

नियमित व्यायामाचे फायदे

* व्यायामाचा सर्वात जास्त फायदा हदयाच्या आरोग्यावर होतो. शिवाय स्नायुंची ताकद वाढते आणि त्यांना घोटीवपणाही प्राप्त होतो. व्यायामामुळे हाडं मजबुत होतात. सांधे लवचिक होतात.* निरोगी राहाण्यासाठी रोंज 30 ते 40 मिनिटं व्यायाम करणं गरजेचं आहे.*  व्यायामामुळे शरीरास ताकद आणि लवचिकता दोन्हीही मिळते.* नियमित व्यायाम करण्यासाठी जिम किंवा क्लासलाच जायला हवं असं नाही तर घरच्या घरी व्यवस्थित व्यायाम करता येतो.*  मानसिक स्थिती उत्तम राखण्यासाठी व्यायाम गरजेचा असतो.

 

 

योग्य आहाराची गरज

योग्य आहाराचा सरळ अर्थ म्हणजे निरोगी आरोग्य. योग्य आहार घेतला तरच शरीर पळतं आणि मेंदू चालतो. वजन कमी करण्यासाठी , नियंत्रित ठेवण्यासाठी तर योग्य आहार खूप महत्त्वाचा आहे. नियमित व्यायामासोबतच योग्य आहार हा नियम बनवला तर वजनासारख्या संवेदनशील समस्येवर आपला ताबा नक्की राहिल.