आजकाल प्रत्येकालाच कोणत्या ना कोणत्या प्रकारचा मानसिक ताण (anxiety and mental stress) असतोच. कुणाला घर, संसार, जबाबदाऱ्या, मुलं यांचा ताण असतो. तर कुणाला करिअर, स्पर्धा, प्रमोशन याची चिंता असते. काही जणं हा ताण सहज पेलू शकतात. तर कुणाकुणाला अगदी असह्य होऊन जातं. मनावर प्रचंड ताण, दडपण येतं. त्यामुळे मग सारखं अस्वस्थ होऊन एन्झायटीचा त्रास सुरू होतो. तुम्हालाही असंच होत असेल तर आलिया भट (Alia bhatt), करीना कपूर (Kareena Kapoor) यांच्यासारख्या अनेक सेलिब्रिटींच्या फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी यांचा हा सल्ला एकदा वाचायलाच पाहिजे.(Kalesvara mudra for reducing anxiety)
अंशुका यांनी इंस्टाग्रामवर नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये मनावरचा ताण कमी करण्यासाठी, एन्झायटी घालविण्यासाठी कालेश्वर योग मुद्रा करावी, असा सल्ला त्यांनी दिला आहे.
फोटो काढताना सुटलेलं पोट कसं लपवायचं? पाहा ३ टिप्स, इंस्टाग्रामवर मिळतील चिक्कार लाइक्स
मानसिक स्वास्थ्य टिकविण्यासाठी ३ ते ५ मिनिटे शांत बसून एकाग्र मनाने ही मुद्रा केल्यास एन्झायटी तर कमी होतेच, पण त्यासोबतच कामावरची एकाग्रता वाढते. मन स्थिर, शांत होण्यास मदत होते आणि मानसिक स्थैर्य, मनोबल वाढू लागते. भावभावनांवर ताबा मिळविण्यासाठीही कालेश्वर योगमुद्रेचा फायदा होतो.
कशी करायची कालेश्वर मुद्रा?
ही मुद्रा करण्यासाठी तुमच्या दोन्ही हातांची करंगळी आणि तिच्या बाजूचे बोट तसेच अनामिका म्हणजे पहिले बोट दुमडून घ्या आणि त्यांची टोके तळहाताला टेकवा. यानंतर दोन्ही हातांच्या मधल्या बोटाचे वरचे टोक एकमेकांना चिटकवा.
सूर्यनमस्कार घालताना तुम्हीही नकळत ३ चुका करता का? वाचा तज्ज्ञांचा सल्ला, तरच होईल नमस्काराचा फायदा
त्याचप्रमाणे दोन्ही हातांचे अंगठे आणि दुमडलेली बोटेही एकमेकांना जोडून घ्या. अशाप्रकारे कालेश्वर मुद्रा केलेले हात तुमच्या छातीजवळ ठेवा आणि ३ ते ५ मिनिटांसाठी डोळे मिटून शांत बसा. ज्यांना एन्झायटीचा खूप जास्त त्रास असेल त्यांनी सगळ्यात आधी डॉक्टरांचा सल्ला घेणे कधीही चांगले, असेही अंशुका यांनी सांगितले आहे.