सैफ अली खान आणि करिना कपूर (Kareena Kapoor and Saif Ali Khan ) हे बॉलीवूडच्या (bollywood) अशा काही जोडप्यांपैकी आहेत, जे सतत लाईमलाईटमध्ये राहतात. त्यासाठी त्यांना वेगळं काही करण्याची मुळीच गरजही पडत नाही. पण दोघांची, त्यांच्या मुलांची त्यांच्या पर्सनल आणि सोशल लाईफची नेहमीच चर्चा असते. सध्या अशीच एक चर्चा रंगली आहे ती त्या दोघांमध्ये झालेल्या बॅडमिंटन मॅचची (badminton match). अवघ्या काही सेकंदांचा हा व्हिडिओ. पण तो सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.
बॅडमिंटन खेळण्याचा हा व्हिडिओ करिना कपूरने तिच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. अवघ्या १ दिवसापुर्वी शेअर झालेल्या या व्हिडिओला ४ लाखांपेक्षाही जास्त लाईक्स मिळाले आहेत. या व्हिडिओमध्ये असं दिसत आहे की करिना आणि सैफ बंगल्याच्या आसपास असणाऱ्या मोकळ्या पटांगणात आहेत. दोघेही स्पोर्ट्स लूकमध्ये असून बॅडमिंटन खेळण्यात ते गढून गेले आहेत. बॅडमिंटन खेळात करिना सैफपेक्षा अधिक पारंगत दिसत असून ती एक से एक स्ट्रोक मारून सैफला चांगलंच दमवते आहे. "Some Monday sport with the husband… not bad…" असं कॅप्शनही तिनं या व्हिडिओला दिलं आहे. शिवाय तिची बेस्ट फ्रेंड अभिनेत्री अमृता अरोरा (Amruta Arora) हिला टॅग करून "Amuuu are you ready for the game?" असं देखील विचारलं आहे.
दररोज अर्धा तास बॅडमिंटन खेळल्याने मिळणारे जबरदस्त फायदे
(Benefits of playing Badminton)
१. बॅडमिंटन खेळताना शरीराची जी काही हालचाल होते, त्यामुळे एण्डोर्फिन नावाचा हार्मोन स्त्रवतो. तो मूड चांगला ठेवण्यासाठी मदत करतो.
२. संपूर्ण शरीराचा व्यायाम होणारा उत्तम खेळ.
३. बॅडमिंटनमुळे एकाग्रता वाढते.
४. मेटाबॉलिझम वाढून भूक वाढण्यास मदत होते.
५. ज्यांना अनिद्रेचा त्रास आहे, त्यांनी दररोज सायंकाळी अर्धा तास बॅडमिंटन खेळावे.