Lokmat Sakhi >Fitness > करीना कपूर उत्तम फिटनेससाठी रोज घालते सूर्यनमस्कार, पाहा ‘तिची’ सुपरहिट योगा पद्धत आणि स्टॅमिना...

करीना कपूर उत्तम फिटनेससाठी रोज घालते सूर्यनमस्कार, पाहा ‘तिची’ सुपरहिट योगा पद्धत आणि स्टॅमिना...

Kareena Kapoor Doing Surya Namaskar Will Give You Fitness Goals : Kareena Kapoor Khan doing 'Surya Namaskar' will definitely give you fitness goals : करीना कपूरचा फिटनेस फंडा अगदी सोपा आहे, प्रत्येकीला अगदी सहज आणि घरच्याघरी जमण्यासारखा, करून तर बघा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2024 05:13 PM2024-10-26T17:13:15+5:302024-10-26T17:27:27+5:30

Kareena Kapoor Doing Surya Namaskar Will Give You Fitness Goals : Kareena Kapoor Khan doing 'Surya Namaskar' will definitely give you fitness goals : करीना कपूरचा फिटनेस फंडा अगदी सोपा आहे, प्रत्येकीला अगदी सहज आणि घरच्याघरी जमण्यासारखा, करून तर बघा...

Kareena Kapoor Khan doing 'Surya Namaskar' will definitely give you fitness goals Kareena Kapoor Doing Surya Namaskar Will Give You Fitness Goals | करीना कपूर उत्तम फिटनेससाठी रोज घालते सूर्यनमस्कार, पाहा ‘तिची’ सुपरहिट योगा पद्धत आणि स्टॅमिना...

करीना कपूर उत्तम फिटनेससाठी रोज घालते सूर्यनमस्कार, पाहा ‘तिची’ सुपरहिट योगा पद्धत आणि स्टॅमिना...

सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) तिच्या फिटनेस आणि झिरो फिगरसाठी प्रसिद्ध आहे. करीना दोन मुलांची आई असूनही आज तितकीच फिट आहे. याच सगळं श्रेय जात ते तिच्या वर्कआऊटला. करीना तिच्या फिटनेससाठी वर्कआऊट सोबतच इतरही अनेक गोष्टींवर अतिशय बारकाईने लक्ष देते. करिना सहजासहजी तिचं वर्कआऊट चुकवत नाही. यातही जीममध्ये जाऊन वर्कआऊट करण्यापेक्षा घरच्या घरी व्यायाम करण्यावर तिचा अधिकाधिक भर असतो(fitness bollywood actress kareena kapoor khan telling importance suryanamaskar).

करीनाची फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी हिने नुकताच करीनाचा सूर्यनमस्कार (Kareena Kapoor Doing Surya Namaskar Will Give You Fitness Goals) घालतानाचा एक व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये करीना सूर्यनमस्कार घालताना दिसत आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने म्हटले आहे की, Here’s your weekend reminder with @kareenakapoorkhan to practice your daily Surya Namaskaras असे म्हणत विकेंड दरम्यान योगा रुटीनमध्ये सूर्यनमस्कार घालण्याचा रिमाइंडर देताना दिसत आहे(Kareena Kapoor Doing Surya Namaskar Will Give You Fitness Goals).

नियमितपणे योग करणे हा करीनाचा नियम आहे. आणि योगची सुरुवात ती सूर्यनमस्कार घालून करते. आपल्या फिटनेसमधे सूर्यनमस्काराचं महत्त्व करीनाने  अनेक मुलाखतीतून सांगितलेलं आहे. आपल्यात काम करण्याची ऊर्जा आणि उत्साह हा सूर्यनमस्काराने येतो त्यामुळे सूर्यनमस्कार हा आपल्या रोजच्या वर्कआउटचा महत्त्वाचा भाग असल्याचं करीना सांगते(Importance of Suryanamaskar and Perfect Method).

तासंतास उभं राहून घरातील काम करताय? करा २ सोपे एक्सरसाइज, पाय-टाचा दुखणार नाही, मिळेल आराम...


सामोसा-गुलाबजाम खाल्ले भरपूर तर तेवढ्या कॅलरी जाळायला तुम्हाला किती चालावं लागेल, माहिती आहे?

सूर्यनमस्काराच्या बारा आसनांमधे स्ट्रेचिंगचा व्यायाम असतो. या आसनामधे स्नायूंवर ताण येतो, आणि हा ताण देताना शरीराला ताकद लावावी लागते. सूर्यनमस्कारांमुळे हदयाची गती समतोलित राखण्यास, स्नायुंमधे संतुलन राखण्यास मदत होते. सूर्यनमस्कार करताना प्रत्येक आसन हे कमीत कमी एक मिनिट होल्ड कराव. सुरुवातीला प्रत्येक आसन हे ३० सेकंद होल्ड कराव. सूर्यनमस्कार तंत्रशुध्दपणे घातल्यास त्याचा जास्तीत जास्त फायदा आपल्या शरीराला मिळतो. सूर्यनमस्कार घालताना एक लय आणि गती असते. वजन कमी करण्यासाठी वेगाने सूर्यनमस्कार घातले जातात तर शरीर लवचिक करण्यासाठी प्रत्येक आसन काही काळ होल्ड केल जातं. व्यायामाच्या बाबतीत सूर्यनमस्काराला परिपूर्ण व्यायाम संबोधलं जात.

सूर्यनमस्कार घालण्याची योग्य पद्धत :- 

१. सर्वप्रथम स्तब्ध उभे राहून, पायाच्या टाचांमध्ये ४५ अंशांचा कोन करून उभे राहावे. हात नमस्कार स्थितीमध्ये छातीजवळ ठेवून मान सरळ ताठ ठेवावी. 
२. नमस्कार स्थितीमध्ये असलेले हात तसेच पुढे घेऊन आकाशाकडे पाहत थोडेसे मागे वळावे.(श्वास घ्या.)
३. या स्थितीमध्ये कानाशी चिकटलेले हात तसेच ठेवून कंबरेपासून समोर वाकावे. हात जमिनीवर टेकावे. गुडघे न वाकवता हे करावे. (श्वास सोडा.)
४. आता डावा पाय पुढे घेत दोन्ही हातांच्यामध्ये ठेवून उजवा पाय लांब मागे ताणावा. छाती उंच करून वर आकाशाकडे पाहावे.(श्वास घ्या.)
५. या प्रकारामध्ये दोन्ही पाय मागे घेऊन हात पुढे घेऊन कंबरवर उचलावी. आपल्या शरीराचा भार हातपायांवर ठेवावा. (श्वास सोडा.)
६. आता गुडघे जमिनीवर टेकावेत व हनुवटीही जमिनीवर टेकवून हात पुढे करावेत. (श्वास रोखून धरावा.)

७. या प्रकारामध्ये पाय जमिनीवर ठेवून म्हणजे झोपून हात कोपऱ्यातून दुमडावे व जमिनीवर ठेवावे व मानेपासून वर पाहावे.(श्वास घ्या.)
८. आता पाय जमिनीवर सरळ ठेवा आणि नितंबांना वर उचला. श्वास सोडताना खांदे सरळ ठेवा आणि डोके आतल्या बाजूला ठेवा.(श्वास सोडा.)
९. डावा पाय सरळ मागच्या बाजूला न्या. सरळ पायाचा गुडघा जमिनीशी समांतर असला पाहिजे. आता दुसरा पाय गुडघ्यात वाकवा आणि तळहात जमिनीवर सरळ ठेवा. आपले डोके वरच्या बाजूला ठेवा.(श्वास घ्या.)
१०. त्यानंतर कंबरेपासून खाली वाकावे. गुडघे न वाकवता हात जमिनीवर टेकावेत.(श्वास सोडा.)
११. पहिल्या स्थितीत उभे राहून, आपले हात आपल्या डोक्यावर करा आणि ते सरळ ठेवा. आता प्रणाम अवस्थेत हात मागे घ्या आणि कंबर मागच्या बाजूला वाकवा. या दरम्यान तुमची स्थिती अर्ध चंद्राच्या आकारासारखी दिसते.(श्वास घ्या.)
१२. आता सरळ ताठ उभे राहून, हात जोडलेल्या अवस्थेमध्ये छातीजवळ ठेवावे. (श्वास सोडा.)

Web Title: Kareena Kapoor Khan doing 'Surya Namaskar' will definitely give you fitness goals Kareena Kapoor Doing Surya Namaskar Will Give You Fitness Goals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.