Lokmat Sakhi >Fitness > करिना कपूर म्हणते डाएटच्या नादात लोकं जगणं विसरून गेले, मला आता डाएटिंग शक्य नाही कारण.... 

करिना कपूर म्हणते डाएटच्या नादात लोकं जगणं विसरून गेले, मला आता डाएटिंग शक्य नाही कारण.... 

Kareena Kapoor Khan: सध्या भारतभर गाजणारे डाएटचे वेगवेगळे प्रकार आणि त्यानिमित्ताने लोकांची सुरू असणारी ओढाताण याविषयी भाष्य करणारा करिना कपूरचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे...(Kareena Kapoor about weight loss tips) 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2024 12:04 IST2024-12-15T09:21:00+5:302024-12-16T12:04:04+5:30

Kareena Kapoor Khan: सध्या भारतभर गाजणारे डाएटचे वेगवेगळे प्रकार आणि त्यानिमित्ताने लोकांची सुरू असणारी ओढाताण याविषयी भाष्य करणारा करिना कपूरचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे...(Kareena Kapoor about weight loss tips) 

Kareena Kapoor khan spoke about vegan diet and sugar free diet, kareena kapoor about weight loss tips  | करिना कपूर म्हणते डाएटच्या नादात लोकं जगणं विसरून गेले, मला आता डाएटिंग शक्य नाही कारण.... 

करिना कपूर म्हणते डाएटच्या नादात लोकं जगणं विसरून गेले, मला आता डाएटिंग शक्य नाही कारण.... 

Highlightsकरिना असंही म्हणते की निरोगी असणं, आपली तब्येत सांभाळणं हे सगळं गरजेचंच आहे. पण ते मिळविण्यासाठी असे कोणकोणते वेगवेगळे डाएट प्लॅन करणं हे मात्र तिला पटत नाही.

बॉलीवूडची सुपरस्टार करिना कपूर खान ही अनेक बाबतीत ट्रेण्डसेटर ठरली आहे. बॉलीवूडमध्ये पहिल्यांदा झीरो फिगरचा ट्रेण्ड तिनेच आणला. तिला पाहून सर्वसामान्य तरुणीही तिच्यासारखी फिगर मिळविण्यासाठी दिवस दिवस डाएटिंग करायच्या. त्यानंतर करिना आणि तिचा अभिनय दोन्हीही जास्त परिपक्व होत गेलं. तिचं लग्न झालं आणि लग्नानंतर काही वर्षांतच तिच्या पहिल्या मुलाचा तैमूरचा जन्म झाला. नंतर दुसऱ्या मुलाचा म्हणजेच जेहचा जन्म झाला. या दोन्ही बाळंतपणानंतर अवघ्या काही महिन्यांतच करिनाने तिचं काम पुन्हा जोमात सुरू केलं आणि मुलं झाली म्हणजे अभिनेत्रीचं करिअर संपलं हा आजवर चालत आलेला ट्रेण्ड खाेडून काढला... आता अनेक अभिनेत्री करिनाप्रमाणेच आई झाल्यानंतरही यशस्वी करिअर करत आहेत.(Kareena Kapoor khan spoke about vegan diet and sugar free diet)

 

वयानुसार शरीरात, मानसिकतेत कसा बदल होत जातो हेच सांगणारा करिनाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. sheinspirevibes या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून यामध्ये करिना वेगवेगळ्या डाएट प्लॅनविषयी भरभरून बोलत आहे.

ऑक्सिजन फेशियलचा नवा ट्रेण्ड! बाकी सगळं सोडा, सुंदर-तरुण त्वचेसाठी हा उपाय करा

करिना म्हणते की आता सोशल मिडियाचा खूपच जबरदस्त परिणाम लोकांवर होत आहे. त्यामुळे हल्ली प्रत्येकीचीच बिकीनी फिगर मिळविण्यासाठी धडपड सुरू असते. त्या नादात मग वेगन डाएट, शुगर फ्री डाएट असं काय काय हल्ली येत आहे आणि लोक ते फॉलो करत आहेत.. करिना म्हणते की या सगळ्या गोष्टींमध्ये लोक जगणं विसरून गेले आहेत...

 

करिना असंही म्हणते की निरोगी असणं, आपली तब्येत सांभाळणं हे सगळं गरजेचंच आहे. पण ते मिळविण्यासाठी असे कोणकोणते वेगवेगळे डाएट प्लॅन करणं हे मात्र तिला पटत नाही.

तरुणाईमध्ये वाढते आहे 'या' कॅन्सरचे प्रमाण! कॅन्सरचा हा कोणता प्रकार, कशी ओळखायची लक्षणं?

ती म्हणते की असं काही वेगळं न करताही निरोगी राहाता येतं. करिनानेही पुर्वी डाएट करून झिरो फिगर मिळवलीच होती. ती म्हणते की आता वयामुळे असेल किंवा अन्य काही कारणांमुळे असेल पण आता माझ्याकडून असं कोणत्याच प्रकारचं डाएट होणं शक्य नाही. स्वत:चं वाढतं वय स्विकारून करिनाने त्याविषयी दिलेली प्रांजळ कबुली तिच्या चाहत्यांना अधिकच आवडून गेली आहे.. 



 

Web Title: Kareena Kapoor khan spoke about vegan diet and sugar free diet, kareena kapoor about weight loss tips 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.