एकेकाळी झिरो फिगर म्हणून प्रसिद्धी मिळवणारी बॉलीवूडची बेबो अर्थात करिना कपूर खान (Kareena Kapoor Khan), आपल्या फिटनेस आणि निखळ सौंदर्यासाठी ओळखली जाते. पंजाबी असूनही ती आपल्या डाएटकडे बारकाईने लक्ष देते. पण तुमच्या-आमच्या प्रमाणेच तिलाही चमचमीत स्नॅक्स खाण्याचे वेड आहे. आहार आणि फिटनेस रूटीन फॉलो केल्यानंतर करीना फेवरीट स्नॅक्स खाऊन भूक भागवते (Fitness).
करीना आवडीने स्नॅक्समध्ये केळीचे कुरकुरीत चिप्स खाते. कपिल शर्मा शोच्या एका एपिसोडमध्ये स्नॅक्समध्ये आवडीने केळ्याचे चिप्स खाते, असे तिने सांगितले होते (Healthy Food). पण वजन कमी करताना किंवा फिटनेसची काळजी घेताना केळीचे चिप्स खाणे योग्य ठरते का? यामुळे वजन वाढते की कमी होते?(Kareena Kapoor Khan's Favourite Kela Or Banana Chips, Are They Healthy).
केळीचे चिप्स हेल्दी असतात का?
एलएनजेपी हॉस्पिटलच्या आहारतज्ज्ञ जया जोहरी यांनी केळीचे चिप्स खावे की टाळावे? केळीचे चिप्स हेल्दी असतात का? याबद्दल हर जिंदगी या वेबसाईटला माहिती दिली आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार केळीचे चिप्स फ्राईड असतात. त्यामुळे त्या खाण्याचा सल्ला देत नाहीत. आपण अधून-मधून महिन्यातून एक किंवा २ वेळा केळीचे चिप्स स्नॅक्स म्हणून खाऊ शकता. पण हे हेल्दी स्नॅक्सचा प्रकार नाही.
दुपारच्या जेवणात न चुकता खा डाळभात, वजन होईल कमी; हाडं होतील बळकट-तज्ज्ञ सांगतात..
केळीचे चिप्स खाण्याचे दुष्परिणाम
वाढते वजन
केळीच्या चिप्समध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. शिवाय ते फ्राईड असल्यामुळे कॅलरीजचे प्रमाणही जास्त असते. शिवाय जास्त प्रमाणात केळ्याच्या चिप्स खाल्ल्याने मधुमेह आणि हृदयाच्या निगडीत धोकाही वाढतो. जर आपण वेट लॉस करण्याच्या प्रोसेसमध्ये असाल तर, केळीच्या चिप्स खाणे टाळा. यामुळे कमी झालेलं वजन पुन्हा वाढू शकते.
बेक करून खा केळीचे चिप्स
फ्राईड केळ्याचे चिप्स हेल्दी नसतात. पण आपण तळण्यापेक्षा बेक करून केळीचे चिप्स खाऊ शकता. बेक केल्याने चिप्सची चव वाढते. शिवाय स्नॅक्स खाल्ल्याचे समाधानही वाटेल.
कोण म्हणतं घरातली कामे केल्याने वजन कमी होत नाही? न चुकता ३ कामं करा, काही दिवसात घटेल वजन
केळीचे चिप्स खाण्याचे फायदे
केळ्याच्या चिप्समध्ये पोटॅशियम, फायबर, कार्बोहायड्रेट्स सारखे गुणधर्म आढळतात. ज्याचा आरोग्याला पुरेपूर फायदा होतो. जे शरीरातील थकवा, अस्वस्थता आणि पचनशक्ती वाढवण्यास मदत करते.