Lokmat Sakhi >Fitness > करिना कपूरची फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी सांगतेय, पोटावरची चरबी कमी करण्यासाठी ५ व्यायाम, पोट करा कमी

करिना कपूरची फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी सांगतेय, पोटावरची चरबी कमी करण्यासाठी ५ व्यायाम, पोट करा कमी

How To Reduce Belly Fat: पोटावरची चरबी कमी कशी करायची. हा अनेकींना पडलेला प्रश्न.. त्याचंच तर खास उत्तर देत आहे अभिनेत्री आलिया भट, करिना कपूर (Alia Bhatt and Kareena Kapoor) यांची फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी (Anshuka Parwani).

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2022 03:27 PM2022-09-17T15:27:54+5:302022-09-17T15:29:09+5:30

How To Reduce Belly Fat: पोटावरची चरबी कमी कशी करायची. हा अनेकींना पडलेला प्रश्न.. त्याचंच तर खास उत्तर देत आहे अभिनेत्री आलिया भट, करिना कपूर (Alia Bhatt and Kareena Kapoor) यांची फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी (Anshuka Parwani).

Kareena Kapoor's fitness trainer Anshuka Parwani giving 5 Yogasana for reducing belly fat  | करिना कपूरची फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी सांगतेय, पोटावरची चरबी कमी करण्यासाठी ५ व्यायाम, पोट करा कमी

करिना कपूरची फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी सांगतेय, पोटावरची चरबी कमी करण्यासाठी ५ व्यायाम, पोट करा कमी

Highlightsसकस- संतुलित आहार तसेच नियमित योगासनं यामुळे पोटावरची चरबी कमी करता येते. 

साधारण पंचविशीनंतर बहुसंख्य मैत्रिणींना हा प्रश्न छळू लागतो. बाकी शरीर शेपमध्ये दिसत असलं तरी पोट मात्र सुटत जातं. सुटत जाणारं पोट वेळीच कंट्रोल (How To Reduce Belly Fat) केलं नाही, तर मात्र नंतर त्याच्या वाढत्या आकारावर नियंत्रण मिळवणं मोठं कठीण काम असतं. त्यामुळे बेली फॅट म्हणजेच पोटावरची चरबी (exercises to burn excess fats on belly) कमी करण्यासाठी अगदी वेळेतच काही योगासनं सुरू करा, असा सल्ला करिना कपूर, आलिया भट यांच्यासारख्या सेलिब्रिटींची योगा ट्रेनर अंशुका परवानी (Anshuka Parwani) देत आहे. 

 

अंशुका यांनी नुकतीच एक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. यात त्यांनी पोटावरची चरबी कमी करण्यासाठी काही व्यायाम सांगितले आहेत. पोटावरची चरबी का वाढते याची कारणं देताना त्या सांगतात की जीवनशैलीत झालेला बदल, जंकफूड खाण्याचं वाढलेलं प्रमाण, व्यायामाचा अभाव यामुळे पोटावरची चरबी वाढत जाते. मात्र सकस- संतुलित आहार तसेच नियमित योगासनं यामुळे पोटावरची चरबी कमी करता येते. 

 

पोटावरची चरबी कमी करण्यासाठी योगासनं...
१. नौकासन

नौकासन करण्यासाठी सगळ्यात आधी जमिनीवर पाय पुढे सरळ करून बसा. दोन्ही हाता पायांना समांतर वर उचला. यानंतर पायही वर उचला आणि संपूर्ण शरीराचा भार हिप्सवर पेलण्याचा प्रयत्न करा. २० ते ३० सेकंद ही आसनस्थिती टिकवावी.

 

२. चतुरंग दंडासन
चतुरंग दंडासन हे plank pose प्रमाणे आहे. यासाठी जमिनीवर पोटावर झोपा. दोन्ही तळहात कोपऱ्यात दुमडून छातीच्या आसपास ठेवा. आता केवळ तळहात आणि तळपायाची बोटे जमिनीला टेकलेली असू द्या. बाकी  संपूर्ण शरीर हळूहळू  वर उचला आणि ही अवस्था टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करा.

 

३. वसिष्ठासन
यासाठी सगळ्यात आधी चतुरंग दंडासनाची अवस्था करा. या अवस्थेत आता संपूर्ण शरीर उजव्या बाजूला वळवा. डावा हात हळूहळू वर न्या. संपूर्ण शरीराचा भार उजव्या हातावर आणि तळपायावर पेला. काही सेकंद ही अवस्था टिकवल्यानंतर पुन्हा दुसऱ्या बाजूने अशाच पद्धतीने आसन करा.

 

४. पार्श्व उर्ध्व हस्तासन
सरळ ताठ उभे रहा. उजवा हात वर करा आणि सगळे शरीर कंबरेतून शक्य तेवढे डाव्या बाजूला करा. ही अवस्था काही सेकंद टिकवून ठेवा. आता पुन्हा दुसऱ्या बाजूने अशाच पद्धतीने व्यायाम करा. 

 

५. पवनमुक्तासन
जमिनीवर पाठीवर झोपा. दोन्ही पाय गुडघ्यात दुमडा आणि पोटावर घ्या. दोन्ही हातांनी दोन्ही पाय घट्ट पकडून ठेवा. 

 

Web Title: Kareena Kapoor's fitness trainer Anshuka Parwani giving 5 Yogasana for reducing belly fat 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.