Join us  

Kareena's Fitness Tips: करिना कपूरसारखं परफेक्ट बॉडी पोश्चर, तिच्यासारखाच ग्लो हवा? करा ती करते 'तेच' एक योगासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2022 2:29 PM

Fitness Tips: बेबो म्हणजेच करिना कपूरने (Kareena kapoor) तिच्या चाहत्यांना जे आसन (yogasana) करून दाखवले आहे, त्यामुळे तिचा फिटनेस तर मेंटेन राहतोच, पण तिचा चेहरादेखील चमकदार होतो... बघा ती नेमकं कोणतं योगासन करतेय ते..

ठळक मुद्देहे आसन नियमित केल्याने चेहरा तेजस्वी आणि कांतीमय होतो. 

करिनासारखी फिगर, तिच्यासारखं बॉडी पोश्चर, तिच्यासारखे केस आणि तिच्यासारखी नितळ, चमकदार त्वचा असावी, असं बहुतांश तरूणींना वाटतं.. आता सौंदर्याची तिच्यावर जी मुक्तहस्ते उधळण झाली आहे, त्यापैकी बराचसा भाग तिच्याकडे कपूर खानदानाचा वारसा म्हणून आला आहे, हे अगदी खरं.. पण तिने तो उत्तम प्रकारे राखला आहे आणि वाढवलाही आहे, हे पण तेवढंच खरं.. योगाभ्यास आणि आहार हे तिच्या फिटनेसचं आणि चमकदार त्वचेचं सगळ्यात मोठं सिक्रेट आहे..(kareena kapoor's glowing skin)

 

करिना नेहमीच तिच्या योगाभ्यासाचे किंवा वर्कआऊटचे फोटो आणि व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर (instagram share) करत असते. आताही नुकताच तिने तिची एक योगा पोझ इन्स्टाग्रामवर शेअर केली असून तिचा हा फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे. यामध्ये ती वसिष्ठासन (side plank pose) करताना दिसत आहे. तिने फक्त वसिष्ठासनच केले नाही, तर साईड प्लँक ट्री पोज देखील तिने यात करून दाखवली आहे. Balance, breath, concentration and focus .... या चार गोष्टी जर लक्षात ठेवल्या तर तुम्ही योगासन करताना कधीच चुकणार नाही, असं ती फोटो कॅप्शनमध्ये म्हणते आहे.

 

कसे करायचे वसिष्ठासन?- चटईवर पालथं झोपा आणि दोन्ही हातांचे तळवे छातीच्या बाजूला ठेवा. - आता दोन्ही हातांचे तळवे आणि तळपायाची बोटे एवढेच जमिनीवर टेकवा आणि संपूर्ण शरीर उचलून घ्या.- आता एका हातावर बॅलेन्स सांभाळा आणि दुसरा हात हळूहळू वर घ्या. शरीरही त्या हाताच्या दिशेने फिरवा.- एका हाताच तळवा आणि दोन्ही तळपाय यावर तुमचा बॅलेन्स सांभाळायचा प्रयत्न करा. ही अवस्था काही सेकंद टिकवल्यानंतर हळूहळू आसनस्थिती सोडा. - करिनाने या पोजमध्ये वरील बाजूने असणारा पाय दुमडून घेतला आहे.

 

वसिष्ठासन करण्याचे फायदे- पाय, पोट, पाठ आणि हात यांना मजबूत देण्यासाठी उपयुक्त- हे आसन नियमित केल्याने चेहरा तेजस्वी आणि कांतीमय होतो. - बिघडलेले बॉडी पोश्चर सुधारण्यासाठी हे आसन उपयुक्त ठरते.- एकाग्रता वाढविण्यासाठी उपयुक्त आसन- हे आसन केल्याने नवी उर्जा, उर्मी मिळते. - फुफ्फुसांची क्षमता वाढवून श्वासांची गती नियंत्रित ठेवण्यासाठी हे आसन उपयुक्त आहे. 

 

टॅग्स :फिटनेस टिप्सकरिना कपूरसेलिब्रिटीयोगासने प्रकार व फायदेव्यायामत्वचेची काळजी