Lokmat Sakhi >Fitness > अष्टवक्रासन करता करता पडली करिष्मा तन्ना, अवघड योगासने करताना काय काळजी घ्याल?

अष्टवक्रासन करता करता पडली करिष्मा तन्ना, अवघड योगासने करताना काय काळजी घ्याल?

Fitness tips: करिष्मा तन्ना ही काही नव्याने योगा करणाऱ्यातली नाही, पण तरीही योगा करताना ती पडली... म्हणूनच तर अवघड योगासनं (rules to know before doing yoga) करताना कोणती काळजी घ्यावी, हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2022 05:43 PM2022-01-12T17:43:54+5:302022-01-12T17:44:54+5:30

Fitness tips: करिष्मा तन्ना ही काही नव्याने योगा करणाऱ्यातली नाही, पण तरीही योगा करताना ती पडली... म्हणूनच तर अवघड योगासनं (rules to know before doing yoga) करताना कोणती काळजी घ्यावी, हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे....

Karishma Tanna fell down while doing yoga, must follow these guide lines while performing yoga | अष्टवक्रासन करता करता पडली करिष्मा तन्ना, अवघड योगासने करताना काय काळजी घ्याल?

अष्टवक्रासन करता करता पडली करिष्मा तन्ना, अवघड योगासने करताना काय काळजी घ्याल?

Highlightsअवघड योगासनं ट्राय करत असाल किंवा नव्याने योगा करण्याचा विचार करत असाल, तर आयुष मंत्रालय जो सल्ला देत आहे, तो एकदा नक्की वाचा....

करिष्मा तन्ना.... छोट्या पडद्यावरचं एक मोठं नाव.. करिष्माच्या अभिनयाबाबत जेवढं बोललं जातं, तेवढीच चर्चा तिच्या फिटनेसची होत असते. फिटनेस आणि ग्लॅमर या दोन्ही बाबतीत ती अग्रेसर आहे. सोशल मिडियावरही ती कायमच ॲक्टीव्ह असते आणि त्या माध्यमातून तिच्या चाहत्यांना फिटनेस मोटीव्हेशन देत असते.

 

सध्या तिचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर (social media) चांगलाच व्हायरल होत आहे. त्याचं झालं असं की करिष्मा नेहमीप्रमाणे वर्कआऊट (yoga workout) करत होती. वर्कआऊटदरम्यान तिने योगाचा एक अवघड प्रकार ट्राय करायला घेतला. अष्टवक्रासन हे त्या योगासनाचं नावं. यामध्ये दोन्ही हातांच्या तळव्यांवर शरीराचा तोल सांभाळायचा असतो. हे आसन करायला अतिशय अवघड असून ज्यांच्या शरीराला हेवी वर्कआऊटची, व्यायामाची, योगाभ्यासाची सवय असते, त्यांनाच ते जमू शकतं. करिष्मा तिच्या ट्रेनरच्या मार्गदर्शनाखाली हे आसन करत होती.

 

आसनाची पोझही तिने अलमोस्ट घेतली होती. दोन्ही पाय शरिराच्या एका बाजूला वळवायचे आणि दोन्ही हातांच्या तळव्यांवर शरीराचा भार पेलायचा, अशी अवघड कसरत करताना तिचा तोल ढासळला आणि ती पडली. अर्थातच ती पडली तरी तिला या आसनादरम्यान खूप काही इजा झालेली नाही असं दिसतं. कारण असा तोल गेल्यावर ती खळखळून हसली आणि try try till u succeed. Koi baat nahi. Kal phir try karenge 💪Yoga se hi hoga. It’s not always a cake walk. Struggle is constant.
Kya samjhe ? असे म्हणत तिची पोस्ट शेअर केली आहे. 

 

करिष्मासोबत तिचे ट्रेनर होते आणि सुदैवाने तिला इजा झाली नाही, हे खरे असले तरी योगा करताना काही गोष्टींची काळजी घेतलीच पाहिजे. योगा करताना कोणत्या गोष्टी कराव्या आणि कोणत्या टाळाव्या याची एक गाईडलाईन आयुष मंत्रालयाने (ayush ministry guidelines for yoga) प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे अवघड योगासनं ट्राय करत असाल किंवा नव्याने योगा करण्याचा विचार करत असाल, तर आयुष मंत्रालय जो सल्ला देत आहे, तो एकदा नक्की वाचा....

 

योगा करताना लक्षात ठेवा या ५ गोष्टी
- मन शांत करून मगच योगाला सुरुवात करा. अशांत, अस्वस्थ मनाने योगा करू नका.
- योगा करताना थेट आसनाला सुरुवात करू नका. त्याच्या आधी वार्मअप व्यायाम किंवा स्ट्रेचिंग करा. 
- कोणतेही आसन करताना ते अतिशय शांत चित्ताने आणि मन एकाग्र करून करा. घाईघाईने आसन उरकण्याचा प्रयत्न करू नका.
- शिर्षासन, मयुरासन, अष्टवक्रासन यासारखी काही आसने तुम्ही तुमच्या ट्रेनरच्या मार्गदर्शनाखालीच केली पाहिजेत. जो पर्यंत मार्गदर्शकांकडून ही आसने व्यवस्थित शिकत नाही, तोपर्यंत ती एकट्याने करण्याचा प्रयत्न करू नये.
- योगासन करताना श्वासावर लक्ष ठेवा. श्वासातील चढउतार व्यवस्थित टिपा आणि जोवर शक्य होईल तोवरच योगस्थिती टिकवून ठेवा.
- जेवण झाल्यानंतर लगेचच व्यायामाला सुरुवात नका. काही खाल्ले असल्यात २ ते ३ तासांनी याेगा करा.
योगा करताना काेणत्या गोष्टी कराव्या आणि कोणत्या टाळाव्या, याची सविस्तर माहिती वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकला क्लिक करा.. 

https://yoga.ayush.gov.in/blog?q=58
 

Web Title: Karishma Tanna fell down while doing yoga, must follow these guide lines while performing yoga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.