Join us

करिश्मा तन्नाचं जबरदस्त वर्कआऊट, ‘इतका’ अवघड व्यायाम, पाहतच राहावे- व्हायरल व्हिडिओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2023 13:57 IST

Fitness Tips by Karishma Tanna: करिश्मा तन्नाचा एक वर्कआऊट व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच गाजतो आहे. ती जो काही हार्डकोअर व्यायाम  करतेय, तो पाहून तिचे चाहते तिचं जबरदस्त कौतूक करत आहे.

ठळक मुद्देतिने जो व्हिडिओ पोस्ट केला आहे, तो ही अतिशय जबरदस्त असून तिचा फिटनेस आणि ती करत असलेला अतिशय  अवघड व्यायाम पाहून तिचे चाहते तिचे कौतूक करत आहेत.

बॉलीवूडचे काही सेलिब्रिटी त्यांच्या व्यायामाच्या, फिटनेसच्या बाबतीत अतिशय काटेकोर असतात. काहीही झालं तरी त्यांचं वर्कआऊट सेशन सहसा चुकत नाही. अशा सेलिब्रिटींपैकीच एक म्हणजेच अभिनेत्री करिश्मा तन्ना. करिश्मा तिच्या फिटनेसच्या  बाबतीत अतिशय जागरुक आहे. इन्स्टाग्रामवरही ती तिचे वेगवेगळे वर्कआऊट व्हिडिओ (Karishma Tanna's intense workout) नेहमीच शेअर करत असते. आता सध्या तिने जो व्हिडिओ पोस्ट केला आहे, तो ही अतिशय जबरदस्त असून तिचा फिटनेस आणि ती करत असलेला अतिशय  अवघड व्यायाम पाहून तिचे चाहते तिचे कौतूक करत आहेत.

 

नेमका कोणता व्यायाम करतेय करिश्मा?Growth and comfort do not co exist.. Push yourself everyday असं प्रेरणादायी कॅप्शन तिने या व्हिडिओला दिलं आहे. यात पहिल्या व्यायाम प्रकारात ती हॅण्डस्टॅण्ड करते आहे. पण हॅण्डस्टॅण्ड करण्याचा तिचा प्रकारही वेगळा असून ती हाताखाली बॉलचा वापर करते आहे. हॅण्डस्टॅण्ड या व्यायामामुळे रक्ताभिसरण उत्तम होण्यास मदत होते तसेच हात, मान, पाठीच्या स्नायूंची आणि फुफ्फुसांची ताकद वाढते.  

 

यानंतर तिने वेटलिफ्टिंग, बॅलेन्सिंग या प्रकारातलेही अनेक व्यायाम केले आहेत. त्यासोबतच ती ट्रेडमिलच्या साहाय्यानेही व्यायाम करताना दिसते आहे. ट्रेडमिल सुरू असताना त्यावर बॅलेन्सिंग करणे, असा वेगळ्याच पद्धतीचा तिचा व्यायाम आहे. ती करत असलेले हे सगळे व्यायाम हार्डकोअर वर्कआऊट या प्रकारातले असून ते करण्यासाठी रोजची व्यायामाची सवय तर असायलाच लागते शिवाय तुमचा फिटनेसही खूप जास्त लागतो. ती असा सगळा व्यायाम नियमितपणे करते, म्हणूनच तर अशी स्लिम- ट्रिम दिसते, अशी चर्चाही तिचे चाहते करत आहेत. 

 

टॅग्स :फिटनेस टिप्सव्यायामकरिश्मा तन्ना