Join us

पन्नाशी गाठत आलेली करिष्मा दिसते तितकीच तरुण, जाणून घ्या तिचे डेली रुटीन..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2023 12:11 IST

Karishma Kapoor Daily Routine आपल्या मोहक अदाकारांनी भुरळ घालणारी करिष्मा दिसते तितकीच यंग - कुल, फिट राहण्यासाठी फॉलो करा तिचे डेली रुटीन

सिनेसृष्टीतील लोलो अर्थात करिष्मा कपूरने आपल्या मोहक अदांनी बॉलिवूडचा एक काळ प्रचंड गाजवला. तिच्या सोज्वळ अभिनयाचे चाहते आजही तिचे चित्रपट आवर्जून पाहतात. ४८ व्या वयात पदार्पण करणारी ही अभिनेत्री अजूनही तितकीच फिट आणि तरुण दिसते. ती स्वतःच्या आरोग्याची प्रचंड काळजी घेते. यासाठी ती नेहमी वर्कआउट आणि योग्य संतुलित आहाराचे सेवन करते. याने केवळ चयापचय वाढत नाही तर रोगप्रतिकारशक्ती देखील मजबूत होते. आपल्याला देखील करिष्मा सारखे फिट राहायचं असेल तर तिचा रुटीन फॉलो करा. चला तर मग जाणून घेऊया अभिनेत्री कोणत्या प्रकारचे रुटीन फॉलो करते.

योग महत्वाचे

करिष्माने दिलेल्या मुलाखतीत आपण नियमित योग करत असल्याचं सांगितलं आहे. नियमित योगासना केल्याने शरीरातील मेटाबॉलिज्म सुधारते. यासह रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. योग केल्याने शरीरात लवचिकता येते. मन स्थिर राहते. आणि अतिरिक्त चरबी देखील कमी होते.

पायी चालणे

करिष्माच्या म्हणण्यानुसार जिममध्ये व्यायाम करून घाम गाळणे उत्तम आहे. मात्र, यासह नियमित चालणे आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे. दररोज ३० मिनिटे चालल्याने मेटाबॉलिज्म सुधारते. हृदयाच्या संबंधित त्रास कमी करण्यास मदत होते. यासह ब्लड शुगर देखील नियंत्रणात राहते. पायांच्या संबंधित त्रास होत नाही.

मसाज

करिश्माला मसाज घ्यायला प्रचंड आवडते. आठवड्यातून एक वेळ मसाज घेणं आवश्यक आहे. याने आपण स्ट्रेस फ्रि राहतो. याशिवाय करिष्मा कार्डिओ वर्कआउट, मेडिटेशन, एरियल योग आणि व्यायाम इ. देखील करते.

हेल्दी डाएट

उत्तम वर्कआउटसह हेल्दी आहाराचे सेवन करणे महत्वाचे आहे. हेल्दी डाएटमध्ये करिष्मा बदामाचे दूध, ड्रायफ्रुट्स, फळे खाते. तिला नाश्त्यात बेरी खायला आवडते. या बेरीमध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. जे केवळ तुम्हाला निरोगी ठेवण्यास मदत करत नाहीत तर ते तुमची त्वचा चमकदार ठेवण्यासाठी देखील उपयुक्त आहेत. तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी तुम्ही अशा पदार्थांचा आहारात समावेश करू शकता.

टॅग्स :फिटनेस टिप्सकरिश्मा कपूरहेल्थ टिप्सआरोग्य