Join us  

कार्तिक आर्यनने सोडली वर्षभरासाठी साखर, साखर सोडल्याने खरंच ब्लड शुगर आणि वजन कमी होते की..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2024 3:43 PM

Kartik Aaryan Consumes Sugar After 1 Year, Here’s What Happens If You Eliminate It Completely : वर्षाभरासाठी साखर सोडण्याचं कारण काय? कार्तिक म्हणतो अॅडिक्शन सोडण्यासाठी गरजेचं होतं...

चुलबुला अभिनेता कार्तिक आर्यनने (Kartik Aryan) कमी कालावधीत प्रसिद्धी मिळवली. तो आपल्या अभिनय आणि फिटनेससाठी ओळखला जातो. बरेचसे कलाकार अभिनयासाठी आपल्या फिटनेसमध्ये बदल आणतात. काहीजण वजन कमी करतात किंवा वाढवतात. पण आगामी चित्रपटासाठी आर्यनने ३६५ दिवस म्हणजेच संपूर्ण एका वर्षासाठी साखर सोडली. पण आहारातून साखर वर्ज्य करण्याचं कारण काय?

यासंदर्भातील माहिती त्याने आपल्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत दिली आहे. कार्तिकने साखर सोडण्यामागे एक विशेष कारण असल्याचं सांगितलं आहे (Sugar Elimination). ते कारण नेमके काय? आणि साखर सोडल्याने शरीरात कोणते बदल घडतात पाहूयात(Kartik Aaryan Consumes Sugar After 1 Year, Here’s What Happens If You Eliminate It Completely).

या कारणासाठी कार्तिकने सोडली साखर..

कार्तिकने आपल्या आगामी चित्रपटासाठी एका वर्षासाठी साखर सोडली. चंदू चॅम्पियन हा त्याचा आगामी प्रोजेक्ट असून, शेवटच्या शॉट दरम्यान त्याने त्याची आवडती रसमलाई खाऊन आपले हे वर्षभराचे व्रत मोडले. दिगदर्शक कबीर खान रसमलाई भरवत असल्याचा हा व्हिडीओ कार्तिकने आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

भूक लागल्यावर करिना कपूर खाते केळीचे कुरकुरीत चिप्स? पण याने वजन वाढते की कमी होते? तज्ज्ञ सांगतात..

पोस्टच्या कॅप्शनमध्ये कार्तिक लिहितो, 'रसमलाई खाऊन घेतला विजयाचा आस्वाद. अखेर वर्षभरानंतर साखरयुक्त पदार्थ खाल्ला. माझ्या आवडत्या रसमलाईसारखा हा आनंद गोड आहे. ज्याने माझ्यासाठी हा आव्हानांचा मार्ग तयार केला होता त्याच माणसाच्या हातून रसमलाई खात आहे, तुम्ही खूप प्रेरणादायी आहात सर' 

खरंतर, कार्तिक साखर अॅडिक्ट झाला होता, आणि त्यातून सुटका मिळवण्यासाठी चित्रपटाची शुटींग पूर्ण होईपर्यंत त्याने साखरयुक्त पदार्थ खाणं सोडून दिलं होतं.

वर्षभर साखर नाही खाल्ल्यास..

- हेल्थसाईट. कॉम या वेबसाईटनुसार, साखर किंवा साखरयुक्त पदार्थात कॅलरीजचे प्रमाण जास्त असते. यामुळे वजन तर झपाट्याने वाढतेच, शिवाय पोटाची चरबीही वाढते.

- महिना किंवा वर्षभर साखर सोडल्याने आरोग्यावर सकारात्मक बदल दिसून येतात. साखर सोडल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. ज्यामुळे मधुमेहाचा धोका वाढत नाही.

कोण म्हणतं घरातली कामे केल्याने वजन कमी होत नाही? न चुकता ३ कामं करा, काही दिवसात घटेल वजन

- साखरेच्या अतिसेवनामुळे यकृत आणि हृदयावरही परिणाम होतो. यामुळे नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर रोग होऊ शकतो. ज्यामुळे यकृताचे नुकसान होऊ शकते.

- वर्षभरासाठी साखर सोडल्याने कामाच्या गुणवत्तेत सुधारणा होते. शिवाय झोपेतही कोणते अडथळे येत नाही. एकूणच आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो.

टॅग्स :कार्तिक आर्यनहेल्थ टिप्सफिटनेस टिप्स