Join us  

"टायगर ३ साठी फिटनेस कमावणं म्हणजे स्वत:च्या लिमिट्स.....", कतरिना कैफ सांगितेय तिचा खडतर अनुभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2023 11:57 AM

Katrina Kaif's Viral Video About Her Fitness: कतरिना कैफ आणि सलमान खान (Katrina Kaif- Salman Khan) यांच्या प्रमुख भुमिका असणारा टायगर- ३ (Tiger 3) हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होतोय, त्या चित्रपटासाठी स्वत:ला फिट कसं ठेवलं, याबाबत सांगतेय कतरिना कैफ....

ठळक मुद्देकतरिनाने हे जे काही सांगितलंय ते थोडं जरी आपण मनावर घेतलं तरी आपली फिटनेसची घसरलेली गाडी पुन्हा रुळावर येण्यास नक्कीच मदत होऊ शकते.  

अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif- Salman Khan) यांचे चाहते सध्या त्यांच्या आगामी टायगर- ३ (Tiger 3) या चित्रपटाच्या प्रदर्शित होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटातला कतरिनाचा टॉवेल सीन आणि त्यातली गाणी यांची जबरदस्त चर्चा आहे. प्रदर्शनापुर्वीच या चित्रपटाने ॲडव्हान्स बुकींगच्या माध्यमातून करोडोंचा धंदा केला आहे. असं सगळं सकारात्मक पद्धतीने जुळून येण्यासाठी चित्रपटाशी संबंधित सगळ्यांनाच प्रचंड मेहनत घ्यावी लागते. याच विषयी सांगतेय कतरिना कैफ. या चित्रपटाच्या वेगवेगळ्या सीनमध्ये स्वत:ला फिट करण्यासाठी कतरिनाला तिच्या फिटनेसवर प्रचंड मेहनत घ्यावी लागली (Katrina Kaif's Viral Video About Her Fitness). याविषयीचीच माहिती तिने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.

 

या पोस्टमध्ये कतरिनाने तिचे काही वर्कआऊट करतानाचे फोटो, काही व्हिडिओ शेअर केले आहेत. त्यामध्ये ती खूप वेगवेगळे व्यायाम करताना दिसते आहे. एक व्हिडिओमध्ये तिला काहीतरी दुखापत झाल्याचेही दिसतेय.

आलिया ते परिणिती- बघा मिनिमम मेहेंदीचा लग्नातला नवा ट्रेण्ड

ही पाेस्ट शेअर करताना ती म्हणतेय की टायगरचं जेव्हा शुटिंग होतं तेव्हा त्या दिवसांमध्ये मला नेहमीच माझी सहनशक्ती आणि माझ्या अंगातली ताकद यांची कमाल मर्यादा ओलांडावी लागली. तेव्हा खूप त्रास व्हायचा. पण मला एका जणाने सांगितलं होतं की बाकीचे जसे सेन्सेशन्स असतात तसाच त्रास किंवा वेदना ही देखील एक संवेदनाच असते. त्याची कधी भीती वाटून घेऊ नको...तोच विचार मी नेहमी करायचे.

 

कधी कधी माझं शरीर खूप थकून जायचं. पण तेव्हा मी स्वत:ला सांगायचे की या परिस्थितीकडे एक चॅलेंज म्हणून बघ... तुमचं मन तुम्हाला खूप लवकर थकवतं. पण शरीर मात्र साथ देत असतं.

बाल्कनीत लावलेल्या टोमॅटोच्या रोपलाही येऊ शकतात भरपूर टोमॅटो, बघा कुंडीमध्ये कसं लावायचं रोप....

त्यामुळे मी मनातून निश्चय करायचे आणि पुन्हा माझी स्वत:शी लढाई सुरू व्हायची... एकदा ठरवलं आहे तर मग काहीही झालं तरी करायचंच... हा निश्चय मी मनात बांधला आणि हा सगळा अवघड प्रवास पुर्ण केला. I think we were able to deliver even more dynamic action than before, and that's always our intention……To be better…… कतरिनाने हे जे काही सांगितलंय ते थोडं जरी आपण मनावर घेतलं तरी आपली फिटनेसची घसरलेली गाडी पुन्हा रुळावर येण्यास नक्कीच मदत होऊ शकते.  

 

टॅग्स :फिटनेस टिप्सकतरिना कैफसलमान खानवाघ