Join us  

जगण्याचे निर्णय असोत नाहीतर व्यायाम, कीप इट सिम्पल! शिल्पा शेट्टी हे नक्की काय सांगतेय..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2021 7:17 PM

बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिने तिच्या चाहत्यांना या आठवड्यासाठी एक फिटनेस मोटीव्हेशन दिलं आहे. फिटनेस मोटीव्हेशन देताना शिल्पा सांगत आहे की जगण्याचे निर्णय असो किंवा व्यायाम असो.... कीप इट सिम्पल!

ठळक मुद्दे'Trust me, it’ll work its magic'' असंही शिल्पाने या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

बॉलीवूड ॲक्ट्रेस शिल्पा शेट्टी योगाभ्यास आणि वर्कआऊट याबाबतीत अतिशय परफेक्ट आहे. आयुष्यात कितीही खडतर आणि गंभीर प्रसंग का असेना, पण त्या काळातही योगाभ्यास करा, असं तिचं मत आहे. तिच्या मते जर तुम्हाला आरोग्याच्या म्हणजेच काही शारीरिक समस्या उद्भवल्या तरी योगाभ्यासाची मदत घेऊन त्या समस्या दूर करता येतात. तसेच एखाद्या गोष्टीचा मानसिक त्रास होऊ लागला, डिप्रेशन येऊ लागले, मानसिक धीर खचू लागला, तरी त्यातून तुम्हाला बाहेर काढण्यासाठीही योगाचीच मदत होते. त्यामुळे ''योगा से ही होगा...'' या गोष्टीवर शिल्पा ठाम असून तिच्या चाहत्यांनाही ती वारंवार तेच सांगण्याचा प्रयत्न करत असते. 

 

इन्स्टाग्रामवर शिल्पा अतिशय ॲक्टीव्ह आहे. त्यावरील तिच्या बहुसंख्य पोस्ट या फिटनेसशी निगडीतच असतात. यात सगळ्यात मुख्य आकर्षण असतं ते दर आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजेच दर सोमवारी शिल्पा देत असलेला फिटनेस मंत्र. कधी योगा तर कधी वर्कआऊट तर कधी डाएट अशा वेगवेगळ्या माध्यमातून शिल्पा तिच्या चाहत्यांना फिटनेस जपण्याविषयी प्रोत्साहीत करत असते. शिल्पाच्या या ॲक्टीव्हिटीतून आजवर अनेक जणांना मोटीव्हेट केलं आहे. म्हणूनच तर शिल्पाचे #mondaymotivation सध्या सोशल मिडियावर चांगलेच गाजते आहे.

 

या आठवड्यात शिल्पाने वेट लिफ्टिंग वर्कआऊट दाखवलं असून त्यामुळे आरोग्याला होणारे फायदेही समजावून सांगितले आहेत. हे वर्कआऊट करतानाच शिल्पाने कीप इट सिम्पल, असा सल्ला तिच्या चाहत्यांना दिला आहे. वेटलिफ्टिंग करण्यासाठी शिल्पाने एका रॉडप्रमाणे दिसणाऱ्या वेट लिफ्टिंग इक्वीपमेंटचा वापर केला आहे. या व्हिडियोमध्ये सगळ्यात आधी तर तिने ते इक्विपमेंट तिच्या हातात पकडले आहेत. यानंतर हात कोपरात दुमडून ते छातीजवळ आणले आहेत. यानंतर पुन्हा एकदा हात खाली केले. यानंतर एक दिर्घ श्वास घेऊन ती कंबरेतून खाली वाकली आणि ते इक्वीपमेंट थेट पायापर्यंत खाली नेले. अशाप्रकारे तिचा संपूर्ण वर्कआऊटचा व्हिडियो आहे.

 

हे वर्कआऊट करताना शिल्पा अतिशय घामाघूम झालेली दिसत आहे. वरवर पाहता ही ॲक्टीव्हिटी सोपी वाटत असली, तरी ती तशी अजिबातच नाही. शिल्पा म्हणते की या व्यायामाचे तुम्ही ४ राऊंड केले पाहिजेत. एक राऊंड १ मिनिटाचा या हिशोबाने करावा. प्रत्येक राऊंडनंतर ३० सेकंदाचा ब्रेक घ्यावा आणि पुन्हा दुसरा राऊंड सुरू करावा. शिल्पा म्हणते की हे वर्कआऊट पाहून ते किती साधे आहे, असे तुम्हाला निश्चितच वाटत असेल. पण ते दिसते तेवढे साधे नाही.

 

या वर्कआऊटमुळे शरीराला जबरदस्त फायदे होतात. पाठ, कंबर, पाय आणि हात या सगळ्या भागातील स्नायूंचा व्यायाम होण्यासाठी हे वर्कआऊट अतिशय उपयुक्त आहे. शिल्पा म्हणते की माझ्यावर विश्वास ठेवा आणि हे वर्कआऊट दररोज नियमितपणे करा. हे वर्कआऊट केल्यामुळे तुम्हाला निश्चितच फायदा होईल...  ''Trust me, it’ll work its magic'' असंही शिल्पाने या पोस्टमध्ये लिहिलं आहे. आता शिल्पा एवढं सांगतेय म्हटल्यावर हे वर्कआऊट करून बघायला आणि त्याचे जादूई फायदे अनुभवायला काहीच हरकत नाही. नाही का?

 

टॅग्स :फिटनेस टिप्सशिल्पा शेट्टीयोगासने प्रकार व फायदेसेलिब्रिटी