Join us  

अभिनेत्री भाग्यश्री करतेय केटलबेल स्विंग, नेमका हा व्यायाम आहे कसा आणि काय त्याचे फायदे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2022 8:10 AM

Kettlebell Swings by Actress Bhagyashree: अभिनेत्री भाग्यश्री हिने नुकताच पोस्ट केलेला एक वर्कआऊट व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

ठळक मुद्देहा व्यायाम केल्यामुळे वजन तर कमी होतेच, पण कॅलरी बर्न होऊन उर्जा मिळण्यासाठी तसेच शारिरीक क्षमता वाढविण्यासाठी या व्यायामाचा उपयोग होतो. 

अभिनेत्री भाग्यश्री नेहमीच सोशल मिडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांना वेगवेगळ्या फिटनेस टिप्स (fitness tips by Actress Bhagyashree) देत असते. कधी डाएटबाबत माहिती देते तर कधी एखादा व्यायाम सांगते. ती तिच्या व्यायामाबाबत अतिशय शिस्तीची असून त्यामुळेच तर ती वयाची पन्नाशी आली, तरीही जबरदस्त ॲक्टीव्ह दिसते. तिने नुकताच जो व्हिडिओ पोस्ट केला आहे, त्यात ती केटलबेल स्विंग (Kettlebell Swings) हा व्यायाम करताना दिसते आहे (Benefits of Kettlebell Swings). 

 

केटलबेल स्विंग व्यायाम म्हणजे काय?या प्रकारचा व्यायाम पुर्वी प्रामुख्याने रशियामध्ये केला जायचा. तिथेही रशियन सैनिक अशा पद्धतीचा व्यायाम करायचे.

मुलं खूपच टीव्ही पाहतात, ऐकतच नाहीत? ४ उपाय, टीव्ही बघणं होईल कमी..

हळूहळू या व्यायामाचे फायदे लक्षात घेता, अनेक जणांनी तो व्यायाम शिकून घेतला. अमेरिकेतही आता हा व्यायाम बराच प्रचलित झाला असून भारतातही आता या व्यायामाची उपकरणे मिळतात. हा व्यायाम केल्यामुळे वजन तर कमी होतेच, पण कॅलरी बर्न होऊन उर्जा मिळण्यासाठी तसेच शारिरीक क्षमता वाढविण्यासाठी या व्यायामाचा उपयोग होतो. 

 

केटलबेल स्विंग करण्याचे फायदेया पोस्टमध्ये भाग्यश्री म्हणते की हा व्यायाम दिसायला जेवढा सोपा आणि सहज वाटतो, तसा मुळीच नाही. तुम्ही जेव्हा प्रत्यक्ष करता, तेव्हाच तो किती अवघड आहे, याची जाणीव होते.

नातीने आपल्या नावाचा टॅटू बनवलेला पाहून आजी- आजोबा झाले भावूक, बघा इमोशनल व्हिडिओ

हा व्यायाम असा आहे जो शिकायला थोडा वेळ लागतो, पण एकदा तो करता आला की मग कॅलरी बर्न करण्यासाठी हा व्यायाम सुपर इफेक्टीव्ह ठरतो. मांड्या, हिप्स, कंबर आणि पाठ यांच्या स्नायूंसाठी हा व्यायाम परफेक्ट असून याठिकाणी अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. पण हा व्यायाम तज्ज्ञांकडून शिकून घेतल्याशिवाय कधीही करू नका. कारण मनानेच व्यायाम करायला जाल तर कंबरेला दुखापत होऊ शकतो.  

 

टॅग्स :फिटनेस टिप्सभाग्यश्रीव्यायामयोगासने प्रकार व फायदे