अनेक हिंदी मालिकांमधून आशा नेहमीच तिच्या चाहत्यांच्या भेटीला येत असते. तिचा ट्रॅडिशनल लूक तिच्या चाहत्यांना जेवढा आवडतो, तेवढीच चर्चा तिच्या हॉट लूक्सचीही होत असते. प्रत्येक लूकमध्ये परफेक्ट दिसणाऱ्या आशाचे फिटनेस सिक्रेट आहे केटलबेल वर्कआऊट. जिममध्ये वर्कआऊट करतानाचा आशाचा एक व्हिडियो तिने नुकताच इन्स्टाग्रामवर शेअर केला होतो. यामध्ये ती kettlebell workout सोबतच स्क्वॅट्स करताना दिसून आली.
रशियन केटलबेल वर्कआऊट्स हा व्यायामाचा प्रकार सध्या बराच लोकप्रिय आहे. विशिष्ट उपकरणं घेऊन हा व्यायाम प्रकार करावा लागतो. याप्रकारात प्रामुख्याने वेटलिफ्टिंग करण्यावर भर दिला जातो. यामध्ये अनेक वेगवेगळे प्रकार असतात. शरीराची ताकद आणि फिटनेस वाढविण्यासाठी हा एक महत्त्वाचा व्यायाम प्रकार मानला जातो. ज्याप्रकारे वेगवेगळ्या वजनाचे डंबेल्स उचलून व्यायाम करतात, त्याचप्रमाणे केटलबेल वर्कआऊट करताना वेगवेगळ्या वजनाचे लोखंडी इन्स्ट्रुमेंट्स उचलले जातात किंवा त्यांच्या साहाय्याने व्यायाम केला जातो.
अशी काळजी घ्या...
केटलबेल एक्सरसाईज ही प्रशिक्षकाकडून शिकणे गरजेचे आहे. या व्यायाम प्रकाराबाबत योग्य ती माहिती घेऊन तज्ज्ञांच्या मदतीने व्यायाम करण्यास प्राधान्य द्यावे. चुकीचे इन्स्ट्रुमेंट चुकीच्या पद्धतीने उचलले गेले, तर स्नायूंना दुखापत होऊ शकते. यासाठी सगळ्यात आधी कमी वजनापासून सुरुवात करावी. या वजनाचा जेव्हा व्यवस्थित सराव होईल, तेव्हा प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली जास्त वजनाचा सराव करावा. केटलबेल स्विंग, केटलबेल स्नॅच, केटलबेल रशियन ट्विस्ट, केटलबेल रिव्हर्स लंजेस, केटलबेल क्लीन, टर्किश गेटअप असे अनेक व्यायाम प्रकार यामध्ये करता येतात. प्रत्येक व्यायाम करण्याची पद्धत वेगवेगळी आहे.
केटलबेल वर्कआऊटचे फायदे
१. केटलबेल प्रकारातील वर्कआऊटमुळे स्नायू बळकट होतात.
२. बॉडी टोनसाठी हा एक उत्तम व्यायाम मानला जातो.
३. हृदयरोग टाळण्यासाठी केटलबेल वर्कआऊट करण्याचा सल्ला दिला जातो.
४. अतिरिक्त फॅटबर्न होऊन शरीर सुडौल होण्यासाठी हा व्यायाम प्रकार परफेक्ट आहे.
५. एकाचवेळी सगळ्या शरीराचा व्यायाम याद्वारे होऊ शकतो.