Join us  

उंचीनुसार आपलं वजन किती हवं माहितीये? हा पाहा चार्ट; तपासा तुम्ही ओव्हरवेट की अंडरवेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2022 5:16 PM

Know The Height and Weight Chart for Female : वजन प्रमाणापेक्षा जास्त किंवा खूप कमी असेल तर त्यामुळे आपल्या सौंदर्यातही बाधा येते.

ठळक मुद्देवजन आणि उंची योग्य प्रमाणात असेल तर आरोग्य चांगले राहण्यास मदत होतेपाहा तुमच्या उंचीनुसार तुमचं वजन नेमकं किती असायला हवं..

आपली वजन हे आपल्या उंचीला साजेसं असावं असं आपण नेहमी ऐकतो. पण उंचीला साजेसं म्हणजे नेमकं किती हे मात्र आपल्याला सांगता येत नाही. गेल्या काही वर्षात लठ्ठपणा ही जगभरातील एक महत्त्वाची समस्या झालेली असताना आपल्याला आपली उंची आणि वजन नेमके किती असावे याबाबत पुरेशी माहिती असायला हवी. हे वाढलेलं वजन कमी करण्यासाठी मग आपण जीम लावणे, डाएटचे वेगवेगळे प्रकार करुन बघणे असे काही ना काही उपाय करत असतो (Know The Height and Weight Chart for Female). 

वजन वाढण्यासाठी फार वेळ लागत नाही. पण ते कमी करताना मात्र आपल्या नाकात दम येतो. वाढते वजन अनेक आजारांना निमंत्रण देणारे असते. त्यामुळे वजनावर वेळीच नियंत्रण आणणे केव्हाही सोयीचे असते. व्यायाम, आहार आणि जीवनशैलीतील इतर गोष्टींकडे योग्य पद्धतीने लक्ष दिल्यास वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. केवळ आरोग्यासाठी जास्त वजन चांगले नाही असे नाही, तर वजन प्रमाणापेक्षा जास्त किंवा खूप कमी असेल तर त्यामुळे आपल्या सौंदर्यातही बाधा येते. 

(Image : Google)

वजन वाढले की नकळत आपला आत्मविश्वास कमी होतो आणि आपल्याला वेगवेगळ्या फॅशनचे कपडे म्हणावे तसे कॅरी करता येत नाहीत. त्यामुळे फिगर योग्य त्या मापात हवी असेल आणि आपले वजन हे आपल्या उंचीच्या गुणोत्तरानुसार असायला हवे असेल तर वेळीच योग्य त्या उपाययोजना केलेल्या चांगल्या. राष्ट्रीय आरोग्य संस्थेने प्रकाशित केलेल्या चार्टनुसार प्रत्येक महिलेचे वजन हे त्यांच्या उंचीनुसार योग्य त्या प्रमाणातच असायला हवे, ते किती पाहूया...

उंची वजन
४ फूट १० इंच ४१ ते ५२ किलो 
५ फूट४४ ते ५५ किलो 
५ फूट २ ते ४ इंच४९ ते ६३ किलो 
५ फूट ६ इंच५३ ते ६७ किलो 
५ फूट ८ इंच६५ ते ७१ किलो 
५ फूट १०  इंच५९ ते ७५ किलो 
६ फूट ६३ ते ८० किलो 

 

टॅग्स :फिटनेस टिप्सवेट लॉस टिप्सलाइफस्टाइल