Join us  

बिझी शेड्युलची कारणे सांगाल तर लवकर मरण अटळ, धडधाकट जगायचे तर करा १ गोष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2023 2:09 PM

Know Why Strength Training Is Important For Women's : जास्त वर्ष जगायचं तर स्वत:साठी थोडा वेळ काढायलाच हवा...

मनाली मगर-कदम

मनुष्याची जन्मापासून ते मृत्यूपर्यंत, झोपेत किंवा जागेपणी, शरीराची हालचाल चालू असते. अंतर्गत किंवा बाह्य हालचाल ही शक्यतो मरेपर्यंत थांबत नाही. झोपेतही अंतरइंद्रिये  म्हणजेच मेंदू , ग्रंथी, चयापचय क्रिया यांचे कार्य चालू असते. दैनंदिन जीवनात आपण नियमितपणे एक शब्द वापरतो तो म्हणजे “ताकद”. इंग्रजीमध्ये आपण त्याला स्ट्रेंथ म्हणतो. कुठलीही गोष्ट करण्यासाठी आपल्याला ताकदीची गरज असते. ही ताकद शारीरिक असू देत किंवा मानसिक. एखादी गोष्ट उचलण्यासाठी किंवा ढकलण्यासाठी ताकतीची गरज (Know Why Strength Training Is Important For Women's).

स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये ताकद वेगवेगळ्या प्रमाणात असते. उदाहरणार्थ, पुरुषाला 50 किलो वजन उचलण्यासाठी जे श्रम करावे लागतात त्यापेक्षा दुपटीने स्त्रियांना श्रम लागतात . म्हणजेच स्त्रियांची ताकद ही पुरुषांपेक्षा कमी असते. ही ताकद आपल्या मांसपेशींवर अवलंबून असते. जेवढ्या मांसपेशी जास्त तेवढी ताकद जास्त. दैनंदिन जीवनात विविध प्रकारची कामे करण्यासाठी स्त्रियांनाही ताकदीची खूप गरज असते. 

(Image : Google)

कपाट हलवणे, कळशी उचलणे, सिलेंडर उचलणे, नारळ सोलणे किंवा बाटलीचे झाकण उघडणे या साध्या साध्या गोष्टींसाठीही ताकदीची खूप गरज असते. ओढणे आणि ढकलणे, या दोन्हींसाठी ताकतीची गरज आहे. किचनमध्ये बाटलीचे झाकण स्त्रियांना जर उघडले नाही तर अगदी सहज घरातील पुरुषांना ते उघडण्यासाठी दिसे जाते. पूर्वीच्या काळी, विहिरीतून पाणी काढण्यासाठी, जात्यावरती दळण दळण्यासाठी, कपडे धुणे , भांडी घासण्यासाठी , नदीवरून हंड्यात पाणी आणणे या सर्व गोष्टींसाठी ताकदीचा वापर केला जात होता. पण हल्ली यांची जागा आधुनिक यंत्रांनी घेतली आहे . त्यामुळे शरीराची हालचाल कमी झाली आहे व त्यामुळे मांस पेशींचा भाग वापरला जात नाही. शरीरातील ही ताकद वाढावी यासाठी मांसपेशी वाढवणारे व्यायाम करणे स्त्रियांना गरजेचे आहे.  

स्ट्रेंथ ट्रेनिंग का महत्त्वाचे? 

स्त्रियांमध्ये असा गैरसमज आहे जर आपण वेट ट्रेनिंग केले तर आपण पुरुषी दिसू, पणहे पूर्णतः चुकीचे आहे. पुरुषांच्या शरीरात टेस्टोस्टेरॉन नावाचे संप्रेरक असते जे स्त्रियांमध्ये फक्त 1/10 एवढे सापडते. म्हणजे,  स्त्रियांमध्ये फक्त दहा टक्के हे टेस्टोस्टेरॉन सापडते व इस्ट्रोजनचे प्रमाण जास्त आढळते. 

1) स्ट्रेन ट्रेनिंग केल्यामुळे स्त्रियांचे शरीर हे पुरुषी न दिसता त्याला एक आकार प्राप्त होतो. 

2)पचनक्रिया सुधारते, कारण 0शरीरातल्या मांसपेशी वाढल्याने जास्त कॅलरीज जळतात. 

3) टेस्टोस्टेरॉन आणि इस्ट्रोजन हे दोन्ही स्त्री आणि पुरुषांमध्ये आढळते. जसे वय वाढू लागते, तसे पुरुषांमधील टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण कमी होऊ लागते, नियमित वेट ट्रेनिंग केल्यामुळे हे प्रमाण नियंत्रित राहते.

(Image : Google)

4) वेट ट्रेनिंगमुळे पुरुष आणि स्त्रीयांचे हार्मोन्स बॅलन्स राहण्यास मदत होते. ज्यामुळे जागोजागी चरबी साठवून न राहता शरीराच्या प्रत्येक भागात एकसारख्या प्रमाणात चरबी साठवली जाते. 

5) मेटाबोलिक म्हणजे चयापचय दर वाढतो. ज्यामुळे अन्नाचे पचन व्यवस्थित होते व वजन नियंत्रित राहते. 

6) साखरेचे प्रमाण नियंत्रित होऊन मधुमेह आटोक्यात येतो 

7) मासिक पाळी बंद झाली तरी हाडांना मांसपेशीचा आधार असल्यामुळे हाडे बळकट राहतात.

8) गुडघेदुखीचे प्रमाण कमी होते. 

9) स्किन, त्वचा घट्ट राहिल्याने तारुण्य टिकून राहते, चेहऱ्याला सुरकुत्या कमी पडतात.

10) सतत लहान सहान कारणाने थकवा येत असेल तर याचे प्रमाण कमी होते. 

(लेखिका योग शिक्षिका आहेत)

manali227@gmail.com

टॅग्स :फिटनेस टिप्सव्यायामलाइफस्टाइलआरोग्य