आपण सुंदर आणि आकर्षक दिसावं हीच प्रत्येक स्त्रीची मनोमनी इच्छा असते. गोरापान रंग, लांबसडक केस, तुकतुकीत स्किन, टपोरे डोळे, गुलाबी ओठ, सडपातळ बांधा यासाठी स्त्रिया पार्लरमध्ये जाऊन खर्च करतात किंवा महागड्या शस्त्रक्रिया करतात.आपल्यापैकी अनेकजणी सुंदर दिसण्यासोबतच आपली फिगरसुद्धा आकर्षक दिसावी यासाठी जिम, योगा, झुंबा आणि वेगवेगळे डाएट फॉलो करताना दिसतात.सध्या आपल्याकडे ब्युटी आणि फिटनेसबाबतीत कोरियन स्त्रियांना फॉलो करण्याचा ट्रेंड सुरु झाला आहे. कोरियन स्त्रिया आपला सडपातळ बांधा व पांढऱ्या शुभ्र रंगांसाठी जगप्रसिद्ध आहेत. आपले व्यक्तिमत्व घडविण्यासाठी या महिला एका खास सिक्रेटचा वापर करतात. काय आहे ते सिक्रेट समजून घेऊयात.(Korean Weight Loss Diet).
कोरियन स्त्रिया नक्की काय फॉलो करतात ?
१. बॅलन्स डाएट - कोरियन महिला बॅलेन्स डाएट सक्तीने फॉलो करतात. रोजच्या जेवणात त्या प्रोटीन, कार्ब्रोहायड्रेटयुक्त पदार्थांचा जास्त समावेश करतात. इतकेच नव्हे तर कोरियन महिला मोजून - मापून खाण्यावर जास्त भर देतात. अश्याप्रकारे कोरियन महिला बॅलेन्स डाएट करताना जास्त न खाता योग्य ते आणि योग्य त्या प्रमाणातच खातात.
२. हिरव्या भाज्यांचा जास्त वापर - आपल्याकडे हिरव्या भाज्या ताटात बघून नाक मुरडली जातात परंतु कोरियन महिला आपल्या जेवणात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करतात. किंबहुना जेवण म्हणूनच त्या जास्तीत जास्त हिरव्या भाज्या खातात असं म्हणायला हरकत नाही. बहुतेक भाज्या तंतुमय, आरोग्यदायी आणि कमी कॅलरीज असलेल्या असतात. तसेच, भाज्यांमध्ये असलेल्या फायबरमुळे त्यांचे पोट दीर्घकाळ पोट भरलेले राहते.
३. घरगुती पदार्थांना प्राधान्य - फास्ट फूडपेक्षा घरगुती पदार्थांना कोरियन महिला जास्त प्राधान्य देतात. त्यांच्या मते, जर तुम्हाला सडपातळ बांधा हवा असेल तर तुम्हाला घरी शिजविलेले अन्न खाणे गरजेचे आहे. फास्ट फूड किंवा प्रोसेस फूड खाल्ल्याने तुमचे वजन वाढते हे तर खर आहेच. तसेच फास्टफूडमध्ये असणाऱ्या तेलामुळे तुमचे वजन जास्त वाढू शकते. म्हणून फास्टफूड न खाता घरी बनविलेल्या ताज्या अन्नपदार्थांना प्राधान्य देणे गरजेचे असते.
४. चालणे - कोरियन महिला बॅलेन्स डाएटसोबतच चालणे खूप पसंत करतात. जर तुम्हालाही कोरियन महिलांप्रमाणे फिट आणि निरोगी दिसायचे असेल, तर आजच चालायला सुरुवात करा.
५. फर्मेंटेड फूडचा समावेश - कोरियन महिला आपल्या जेवणासोबतच काही वेगवेगळ्या प्रकारचे फर्मेंटेड फूड खातात. फर्मेंटेड फूड खाल्ल्याने तुमची पचन क्षमता सुधारते व त्यामुळेच तुमचे वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होते.
६. ऍक्टिव्ह लाईफस्टाईल - ऍक्टिव्ह लाईफस्टाईल पद्धतीचा वापर करून कोरियन महिला आपले वजन कायम नियंत्रणात ठेवतात. वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटी व एक्सरसाइज करण्यावर त्या जास्त भर देतात.