Lokmat Sakhi >Fitness > क्रिती सेनॉन नेमका कोणता व्यायाम करतेय पाहा; फिट होण्यासाठी तुम्हाला जमेल का हे इतकं अवघड काम?

क्रिती सेनॉन नेमका कोणता व्यायाम करतेय पाहा; फिट होण्यासाठी तुम्हाला जमेल का हे इतकं अवघड काम?

Kriti Sanon does Weighted Walking Lunges with her 'tribe' in new workout video : सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन प्रचंड फिट आहे, पण पाहा तिचा अवघड व्यायाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2023 02:17 PM2023-02-27T14:17:29+5:302023-02-27T14:22:35+5:30

Kriti Sanon does Weighted Walking Lunges with her 'tribe' in new workout video : सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन प्रचंड फिट आहे, पण पाहा तिचा अवघड व्यायाम

Kriti Sanon does Weighted Walking Lunges with her 'tribe' in new workout video | क्रिती सेनॉन नेमका कोणता व्यायाम करतेय पाहा; फिट होण्यासाठी तुम्हाला जमेल का हे इतकं अवघड काम?

क्रिती सेनॉन नेमका कोणता व्यायाम करतेय पाहा; फिट होण्यासाठी तुम्हाला जमेल का हे इतकं अवघड काम?

बॉलिवूडमधील फिट अँड फाईन दिसणाऱ्या अभिनेत्रींपैकी क्रिती सेनॉन ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन आपल्या जिम, डाएट, योगासन, हेव्ही वर्कआऊट यांसारख्या गोष्टींकडे काळजीपूर्वक लक्ष देते. क्रिती नेहमीच आपल्या इंस्टाग्राम पेजवरून तिच्या वर्कआऊट रुटीन व डाएटबद्दलचे व्हिडीओ आपल्या चाहत्यांसाठी शेअर करत असते. आपल्या शरीराच्या कमरे खालील भागाला तसेच स्नायूंना मजबूत करण्यासाठी खास लंज वर्कआऊट किंवा एक्सरसाइज केले जातात.

लंज वर्कआऊट केल्यामुळे आपले शरीर लवचिक बनते त्याचबरोबर आपला स्ट्रेसदेखील कमी होतो. आपल्यापैकी काहीजण फिट राहण्याच्या नादात फकत अप्पर बॉडीवरच (Upper Body) लक्ष केंद्रित करतात. परंतु असे न करता फिट राहण्यासाठी आपल्याला संपूर्ण बॉडीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. एखाद्या झाडाची जर मूळ मजबूत असतील तर त्याचा मोठा वृक्ष होऊ शकतो. तसेच अप्पर बॉडीसोबतच लोअर बॉडी देखील मजबूत असणे गरजेचे आहे. लोअर बॉडी वर्कआऊट केल्यामुळे आपले पाय, हीप्स, तळवे, मांड्या अशा सर्व अवयवांचा एक्सरसाइज केला जातो. सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन वेटेड वॉकिंग लंज (Weighted Walking Lunges) हा वर्कआऊटचा प्रकार करताना दिसत आहे(Kriti Sanon does Weighted Walking Lunges with her 'tribe' in new workout video).

क्रिती नेमका कोणता वर्कआऊटचा प्रकार करत आहे? 
या व्हिडिओत, क्रिती वेटेड वॉकिंग लंज (Weighted Walking Lunges) हा वर्कआऊटचा प्रकार करताना दिसत आहे. क्रिती सेनॉनचा जिम ट्रेनर करण सहानी याने इंस्टाग्रामवर "ट्रिबिंग टूगेदर" असे कॅप्शन देत क्रिती सेनॉन आणि तिच्या जिम मधील मित्र - मैत्रिणींचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओ क्लिपमध्ये क्रिती जिममध्ये तिच्या गँगसोबत वेटेड वॉकिंग लंजचा (Weighted Walking Lunges) सराव करताना दिसत आहे. न्यूड रंगाची स्पोर्ट्स ब्रा व त्याखाली काळ्या रंगाची जिम ट्रॅक पॅन्ट घालून क्रितीने आपला हटके जिम लूक तिच्या चाहत्यांना दाखवून दिला आहे. क्रिती मोठमोठ्या, वजनदार पंचिंग बॅग आपल्या खांद्यावर घेऊन वॉकिंग लंज करताना दिसत आहेत. लोअर बॉडीमधील सर्वात महत्वाचे मसल्स जसे की, ग्लूट्स (glutes), क्वाड्रिसेप्स (quadriceps), हॅमस्ट्रिंग्स (hamstrings) मसल्स टोन्ड करण्यासाठी लंज एक्सरसाइज करणे फायदेशीर ठरते.

 वेटेड वॉकिंग लंज (Weighted Walking Lunges) नेमके कसे करावे? 

१. सर्वप्रथम ताठ उभे राहून या व्यायामाला सुरुवात करावी. यामध्ये आपल्या खांद्याचा व हातांचा उपयोग करावा. 
२. आता आपल्या हातात वजन किंवा पंचिंग बॅग उचलून घ्या. 
३. त्यानंतर उजवा पाय पुढे घ्या. गुडघा वाकवून पुढे जा.  
४. त्यानंतर दुसऱ्या पायानेही तसंच करा. 
५. खांदा आणि हात हे एकाच सरळ रेषेत ठेवा.  
६. आपल्याला जितक्या वेळा हा व्यायाम करता येईल तितके वेळा या व्यायामाचे रिपिटेशन करावे. 
७. आपल्याला स्वतःला जितकं जास्त वजन हातात ठेवता येईल तितकं जास्त वजन हातात घेऊन चालण्याचा प्रयत्न करावा. 


 

वेटेड वॉकिंग लंज एक्सरसाइज (Weighted Walking Lunges) करण्याचे फायदे :- 

१. पायांत ताकद येईल. 
२. मांड्या ताकदवान होतील. 
३. मेटॅबॉलिझम सुधारते. 
४. रक्ताभिसरण चांगले होते.
५. हातांच्या व खांद्यांच्या स्नायूंना बळकटी मिळवून देण्यास मदत होते.

Web Title: Kriti Sanon does Weighted Walking Lunges with her 'tribe' in new workout video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.