Lokmat Sakhi >Fitness > अंगकाठी बारीक पण पोट खूप सुटले? झोप कमी झाल्याचा परिणाम, वाढतोय पोटाचा घेर कारण

अंगकाठी बारीक पण पोट खूप सुटले? झोप कमी झाल्याचा परिणाम, वाढतोय पोटाचा घेर कारण

Lack of sleep increases unhealthy abdominal fat झोप कमी झाल्याने पोट सुटते असं तज्ज्ञ सांगतात, तुमचं तर तसं होत नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2023 02:09 PM2023-08-01T14:09:09+5:302023-08-01T14:10:25+5:30

Lack of sleep increases unhealthy abdominal fat झोप कमी झाल्याने पोट सुटते असं तज्ज्ञ सांगतात, तुमचं तर तसं होत नाही?

Lack of sleep increases unhealthy abdominal fat | अंगकाठी बारीक पण पोट खूप सुटले? झोप कमी झाल्याचा परिणाम, वाढतोय पोटाचा घेर कारण

अंगकाठी बारीक पण पोट खूप सुटले? झोप कमी झाल्याचा परिणाम, वाढतोय पोटाचा घेर कारण

वजन वाढीची समस्या सध्या जगतिक समस्या बनली आहे. वजन वाढीमुळे अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे वजन कमी करणे आरोग्यासाठी गरजेचं आहे. लठ्ठपणाची समस्या लहानग्यांपासून थोरामोठ्यांना छळते. बिघडलेल्या लाईफस्टाईलमुळे संपूर्ण शरीराचे वजन वाढते. तर काही जणांचे शरीर सडपातळ पण पोटाची चरबी वाढते.

फक्त पोट वाढल्यामुळे शरीराचा आकार तर बिघडतोच, परंतु खाल्लेलं अन्न देखील लवकर पचत नाही. पण आपण कधी विचार केला आहे का की, पोटाचीच चरबी का वाढते? पोटाची चरबी वाढण्यामागे कारण काय? पोटाची चरबी आपल्याकडून नकळत घडणाऱ्या चुकिंमुळे वाढते. त्या कोणत्या चुका आहेत हे पाहूयात(Lack of sleep increases unhealthy abdominal fat).

अपुरी झोप

यासंदर्भात, डॉ. अबरार मुलतानी सांगतात, ''खराब आहार आणि व्यायामाचा अभाव यामुळे शरीरातील चरबी तर वाढतेच, परंतु, झोप न लागणे हे देखील मोठे कारण आहे. उशिरा झोपेच्या सवयीमुळे किंवा अपुऱ्या झोपेमुळे पोटाची चरबी वाढू शकते.''

खूप घाम आला तर वजन कमी होते, फळे खाल्ली तर लवकर घटते? हे समज खरे की खोटे?

दररोज किती तास झोपावे?

डॉ. अबरार मुलतानी सांगतात, ''उत्तम आरोग्यासाठी किमान शरीराला ८ तासांची झोप आवश्यक. दिवसा झोप घेणे टाळावे. रात्री उशिरा झोपणे, किंवा कमी झोप घेणे, यामुळे लठ्ठपणाचा धोका जास्त वाढतो. ही समस्या पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त दिसून येते.''

उत्तम आरोग्यासाठी किती वाजता झोपावे?

दररोज रात्री १० वाजता झोपणे आरोग्यासाठी उत्तम ठरू शकते. रात्री १० वाजता झोप घेतल्याने लठ्ठपणाचा धोका लक्षणीयरीत्या कमी होतो. व ८ तासांची झोप पूर्ण होते. यासह झोप घेण्याच्या एक तास आधी जेवण करावे.

इतर कारणे

- बहुतांश वेळी बैठी जीवनशैलीमुळे पोटाची चरबी वाढते. ८ तासांच्या कामात कोणतीही शारीरिक हालचाल होत नाही. त्यामुळे अधून - मधून वॉशरूम ब्रेक घ्या, भरपूर पाणी प्या आणि दर तासाला ऑफिसमध्ये फिरा. यासह व्यायाम करण्यासाठी वेळ काढा.

वजन कमी करायचंय? उपाशी राहू नका, पोटभर खा ६ पदार्थ, वजन झरझर घटेल

- स्ट्रेस आणि हार्मोनल असंतुलनामुळे वजन वाढू शकते. तणावाच्या काळात आपल्या अॅड्रेनल ग्रंथी अॅड्रेनालाईन आणि कॉर्टिसॉल सारखे हार्मोन्स सोडतात. यामुळे शरीरात चरबी जमा होते.

- साखर खाल्ल्याने पोटाची चरबी सर्वात जास्त वाढते. त्यामुळे मिठाई, गोड पदार्थ कमी प्रमाणात खावे. किंवा साखर टाळणे देखील उत्तम ठरू शकते. 

Web Title: Lack of sleep increases unhealthy abdominal fat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.