Lokmat Sakhi >Fitness > फक्त ४ स्टेप्समध्ये शिका प्लँक एक्सरसाईज, ५ चुका टाळल्या तर प्लँक जास्त वेळ होल्डही करता येईल!

फक्त ४ स्टेप्समध्ये शिका प्लँक एक्सरसाईज, ५ चुका टाळल्या तर प्लँक जास्त वेळ होल्डही करता येईल!

Learn the plank exercise in just 4 steps, avoid 5 mistakes & hold the plank longer : प्लँक एक्सरसाईज करताना ३० सेकंदांपर्यंत सुद्धा प्लॅंक होल्ड करता येत नाही? त्यासाठी हे उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2023 07:18 PM2023-02-10T19:18:29+5:302023-02-10T19:20:48+5:30

Learn the plank exercise in just 4 steps, avoid 5 mistakes & hold the plank longer : प्लँक एक्सरसाईज करताना ३० सेकंदांपर्यंत सुद्धा प्लॅंक होल्ड करता येत नाही? त्यासाठी हे उपाय

Learn the plank exercise in just 4 steps, avoid 5 mistakes and hold the plank longer! | फक्त ४ स्टेप्समध्ये शिका प्लँक एक्सरसाईज, ५ चुका टाळल्या तर प्लँक जास्त वेळ होल्डही करता येईल!

फक्त ४ स्टेप्समध्ये शिका प्लँक एक्सरसाईज, ५ चुका टाळल्या तर प्लँक जास्त वेळ होल्डही करता येईल!

शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी दररोज योगासन आणि व्यायाम करणे हा उत्तम पर्याय मानला जातो. शारीरिक तंदुरुस्ती राखण्यासाठी, स्नायू-हाडांची ताकद वाढवण्यासाठी आपण  प्लँक एक्सरसाईज करण्यावर भर देतो. प्लँक एक्सरसाईज दिसण्यास अतिशय साधी सोपी एक्सरसाईज वाटते. आपण ही एक्सरसाईज करायला जाता तेव्हा समजते की किती कठीण एक्सरसाईज आहे. पोटाची चरबी घटवण्यासोबतच पोटाचे स्नायू मजबूत करण्यासोबतच प्लँक एक्सरसाईजचे अनेक फायदे आहेत.

प्लँक एक्सरसाईज करायला अगदी साधा सोपा वाटत असला तरीही केवळ मिनिटभरही प्लॅन्क स्थितीमध्ये रहायला नियमित सरावाची गरज असते. प्लँक एक्सरसाईज करणे सोपी गोष्ट नाही. कित्येकांना जिममधील अनेक एक्सरसाईज येत असतील परंतु प्लँक एक्सरसाईज करताना आपल्यासारख्यांची फारच दमछाक होतेच. प्लँक एक्सरसाईज करताना कित्येक लोकांना कमीत कमी ३० सेकंदांपर्यंत सुद्धा प्लॅंक होल्ड करता येत नाही. काहीवेळा आपण प्लँक एक्सरसाईज चुकीच्या पद्धतीने करतो त्यामुळे देखील आपल्याला प्लँक एक्सरसाईज व्यवस्थितरीत्या करता येत नाही. त्यामुळे प्लँक एक्सरसाईज करताना कोणत्या चुका टाळाव्यात आणि प्लँक एक्सरसाईज करण्याची योग्य पद्धत काय आहे ते समजून घेऊयात(Learn the plank exercise in just 4 steps, avoid 5 mistakes & hold the plank longer).

प्लँक एक्सरसाईज करताना या चुका टाळा... 

१. आपले हिप्स जास्तही वर उचलू नका किंवा जास्तही खाली ठेऊ नका.
२. आपली कंबर तटस्थ ठेवा आणि आपले ग्लूट्स स्क्वीज करा. 
३. व्यायामा दरम्यान आपल्याला शरीराची स्थिती सरळ ठेवावी लागते. बरेच लोक शरीराची स्थिती एका रेषेत सरळ ठेवण्यात गोंधळतात. 

४. आपले खांदे आणि कोपर खाली एकमेकांच्या सरळ रेषेत असले पाहिजेत.
५. प्लॅंक करताना आपले हात एकत्र धरू नका. यामुळे व्यायामाचा परिणाम कमी होतो.

प्लँक एक्सरसाईज करण्याची योग्य पद्धत :- 
१. सर्वप्रथम जमिनीवर पोटावर झोपा. यानंतर आपल्या पायांची बोटे आणि कोपरांच्या जोरावर संपूर्ण शरीर वर उचला.
२.  यामध्ये आपले हात आपल्या खांद्यांच्या अगदी खाली असतील आणि आपल्या खांद्यांइतकेच हातही रुंद असले पाहिजेत. यावेळी आपले पाय खांद्यांच्या रुंदीपेक्षा किंचित आत असतील.
३. आपल्याला आपले संपूर्ण शरीर सरळ ठेवावे लागेल, म्हणजेच आपले पोट किंवा हिप्स जास्त उंचही उचलायचे नाहीत किंवा जास्त खाली देखील ठेवायचे नाहीत. आपली मान सरळ रेषेत ठेवावी आणि नजर खाली ठेऊन जमिनीकडे पाहावे.
४. या स्थितीत आपल्याला कमीतकमी १० ते ३० सेकंद रहावे लागेल. आपण एका मिनिटासाठी हे आसन होल्ड करून ठेवल्यास अधिक फायदेशीर ठरेल. 

प्लँक एक्सरसाईज शरीराच्या स्नायूंना टोनिंग आणि बळकट करण्यात विशेष मदत करतात. विशेषत: या योगाचा सराव पोटासाठी खुप फायदेशीर मानला जातो. कोर मजबूत करण्यासोबतच प्लँक एक्सरसाईज पोटातून अतिरिक्त चरबी कमी करण्यास आणि फिटनेस अधिक चांगला राखण्यास उपयुक्त आहे. प्लँक एक्सरसाईजचा नियमित सराव केल्याने शरीराची क्षमता सुधारते. तसेच रोज काही सेकंद वाढवत नेल्यास प्लँक एक्सरसाईज करणे सोपे जाईल.

Web Title: Learn the plank exercise in just 4 steps, avoid 5 mistakes and hold the plank longer!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.