Lokmat Sakhi >Fitness > व्यायामाचा हा प्रकार तुम्हाला माहिती आहे का? लावा भिंतीला पाय, वाचा ५ फायदे

व्यायामाचा हा प्रकार तुम्हाला माहिती आहे का? लावा भिंतीला पाय, वाचा ५ फायदे

Fitness Tips: या आसनाचे फोटो पाहून हा कोणता भलताच व्यायाम, असं वाटू शकतं. पण या आसनाला विपरित करणी (how to do Viparit Karani or Viparit Kriya) असं म्हणत असून हा एक उत्तम व्यायाम आहे. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2022 08:09 AM2022-10-02T08:09:20+5:302022-10-02T08:10:01+5:30

Fitness Tips: या आसनाचे फोटो पाहून हा कोणता भलताच व्यायाम, असं वाटू शकतं. पण या आसनाला विपरित करणी (how to do Viparit Karani or Viparit Kriya) असं म्हणत असून हा एक उत्तम व्यायाम आहे. 

Legs Up The Wall Stretch Pose, Benefits of Viparit Karani or Viparit Kriya | व्यायामाचा हा प्रकार तुम्हाला माहिती आहे का? लावा भिंतीला पाय, वाचा ५ फायदे

व्यायामाचा हा प्रकार तुम्हाला माहिती आहे का? लावा भिंतीला पाय, वाचा ५ फायदे

Highlightsया व्यायामाला Legs Up The Wall Stretch Pose असं म्हणतात. सुरुवातीला कदाचित अवघड वाटू शकते. पण हा व्यायाम करायला बराच सोपा असून थोड्याशा सरावाने तो चांगल्याप्रकारे करता येईल. 

अंबिका याडकीकर, फिजिओथेरपीस्ट
लहान मुलं बऱ्याचदा अशा प्रकारचा व्यायाम नकळत करत असतात. उगाच खेळत खेळत भिंतीपाशी लोळत जातात. त्यानंतर पाय वर करून भिंतीला लावतात आणि याच पोझिशनमध्ये काही काळ राहतात. आपण मोठी माणसं त्यांना "हे काय चाललंय" म्हणून ओरडतो. पण ते जे काय करत आहेत, तो खरोखरच एक व्यायाम असून विपरित क्रिया किंवा विपरित करणी (Benefits of Viparit Karani or Viparit Kriya) म्हणून तो ओळखला जातो. या व्यायामाला Legs Up The Wall Stretch Pose असं म्हणतात. सुरुवातीला कदाचित अवघड वाटू शकते. पण हा व्यायाम करायला बराच सोपा असून थोड्याशा सरावाने तो चांगल्याप्रकारे करता येईल. 

 

विपरित क्रिया कशी करायची?
१. हा व्यायाम करण्यासाठी कंबरेखाली एक पातळ उशी घ्या. किंवा टॉवेलची घडी घालून ती कंबरेखाली ठेवा.

२. भिंतीला चिटकून झोपा आणि दोन्ही पाय भिंतीवर ठेवून वर घ्या. 

World Vegetarian Day: ८ सेलिब्रिटी, जे आज आहेत शुद्ध शाकाहारी! बघा का सोडलं त्यांनी कायमचं नॉनव्हेज

३. पाय वर करताना हळूहळू शरीर भिंतीकडे नेण्याचा, भिंतीच्या अधिकाधिक जवळ जाण्याचा प्रयत्न करा.

४. दोन्ही हात दोन्ही बाजूला पसरवून ठेवा किंवा मग पोटावर ठेवा. 

५. डोळे बंद करून काही सेकंद ही आसनस्थिती टिकविण्याचा प्रयत्न करा. श्वासोच्छवास संथ गतीने असावा.

 

विपरित क्रिया करण्याचे फायदे
१. शरीरातील रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होते.

२. पाय दुखत असतील, पायाच्या घोट्यामध्ये, टाचेमध्ये वेदना असतील, तर त्या कमी होतात. थकलेल्या, दुखणाऱ्या पायांना आराम मिळतो.

World Coffee Day: अबब! एक कप कॉफी चक्क ७००० रुपयांना! एवढी का महाग ही कॉफी?

३. व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास कमी होतो.

४. पाळीदरम्यान पायात गोळे येण्याचा त्रास होत असेल, तर तो देखील कमी होतो.

५. पोटाचे स्नायू रिलॅक्स होतात. त्यामुळे पचनक्रिया अधिक चांगली होते.

६. शरीर आणि मन रिलॅक्स होण्यासाठी उपयुक्त व्यायाम.

 

७. शांत झोप येते.

८. डोकेदुखीचा त्रास कमी होतो.

९. पाठदुखीचा त्रास कमी होण्यासाठी फायदेशीर. 

 

Web Title: Legs Up The Wall Stretch Pose, Benefits of Viparit Karani or Viparit Kriya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.