Join us  

ओटी पोट-मांड्या जाड दिसतात? १ ग्लास पाण्यात हे २ पदार्थ घालून प्या, सुडौल दिसाल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 4:10 PM

Lemon And Ginger For Weight Loss : आलं. ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहते.

इंटरनेटवर वजन कमी करण्यासाठी बऱ्याच रेसेपी, होम रिमेडीज, व्हायरल होत असतात. जे फॉलो करून तुम्ही वजन कमी करू  शकतात. एक घरगुती उपाय म्हणजे आलं आणि लिंबू. ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होऊ शकते. लिंबाच्या सालीत एंटी ऑक्सिडेंट्स असतात. (How To Do For Weight Loss Using Weight Loss Drink) आलं सूज विरोधी गुणांसाठी ओळखले जाते. ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहते आणि शरीर तृप्त झाल्यासारखे वाटतं. (Lemon And Ginger For Weight Loss)

2017 च्या एका रिपोर्टनुसार आल्यात झिंजरॉन  नाावाचे कम्पाऊंड असते ज्यामुळे वजन कमी  करण्यास मदत होते. ज्यामुळे फॅट स्टोअर होत नाही.  2015 मध्ये करण्यात आलेल्या अभ्यासात आल्याची पावडर 12 आठवडे घेतलेल्या  महिलेची भूक नियंत्रणात आली होती आणि शरीराचे मोजमापही कमी झाले होते. एकंदरीत आल्याच्या सेवनानं सहभागींच्या शरीराचे वजन, कंबर टू  हिप गुणोत्तर आणि रक्तातील ग्लुकोज चयापचन प्रतिबिंबित करणारे काही घटक कमी झाल्याचे दिसून आले (Ref). बीएमआय आणि एकूण कोलेस्टेरॉल यांसारख्या इतर गोष्टींवर आल्याचा परिणाम दिसून आला नाही.  शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार या विषयांवर अधिक संशोधन करणं आवश्यक आहे.

लिंबू आणि आल्याचं पाणी कसं तयार करायचं

सगळ्यात आधी आलं  बारीक करून  घ्या नंतर बारीक तुकड्यांमध्ये कापा.  त्याला लिंबाच्या सालीसोबत एक ग्लास पाण्यात उकळवून घ्या. नंतर गाळून या पाण्याचे सेवन करा. हे मिश्रण तयार करण्याचा दुसरा उपाय म्हणजे लिंबाची सालं आणि आल्याचे सुके तुकडे बारीक करून ही पावडर एका एअरटाईट डब्यात ठेवा.  पाणी गरम करून १ चमचा पावडर मिक्स करून याचे सेवन करा. 

दुसरी पद्धत

हे ड्रिंक पिण्याचे बरेच फायदे आहेत. ज्यामुळे शरीर डिटॉक्स होते. पोटाशी संबंधित त्रास टाळता येतात. लिंबात एंटी ऑक्सिडेंट्स असतात ज्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते. सकाळी तुम्ही याचे पाणी प्यायलात तर दुप्पट फायदे मिळतात. 

टॅग्स :हेल्थ टिप्सफिटनेस टिप्स